# SVM RAJUR ## Posts - [माजी विद्यार्थी मेळावा: 1999-2000 Batch](https://www.svmrajur.com/alumni-reunion-1999-2000-batch/): December 27, 2025 जुन्या आठवणींना उजाळा देण्यासाठी, शिक्षकांशी आणि मित्रांशी पुन्हा जोडले जाण्यासाठी, तसेच शाळेशी व संस्थेशी असलेले आपले नाते अधिकाधिक घट्ट करण्यासाठी माजी विद्यार्थी मेळावा (Alumni Meet) आयोजित केला जातो. तब्बल २५ वर्षांपूर्वीच्या जुन्या आठवणींना उजाळा देत गुरुवर्य रा.वि.पाटणकर सर्वोदय विद्या मंदिर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या सन १९९९-२००० या वर्षातील इयत्ता १० वीच्या बॅचचा माजी विद्यार्थ्याचा स्नेहमेळावा विद्यालयात अतिशय उत्साहात पार पडला. या स्नेहमेळाव्यासाठी १९९९-२००० च्या बॅचचे ५० माजी विद्यार्थी हजर होते. मे‌ळाव्याच्या निमित्ताने पुन्हा एकदा एकत्र आलेले सर्व माजी विद्यार्थी जुन्या आठवणीत हरवून गेले होते. प्रत्येकजण आपली शाळा कशी आहे हे डोळ्यांमध्ये साठवून घेत होता. वर्गमित्र-मैत्रिणी भेटल्याचा […] - [तालुकास्तरीय राष्ट्रीय विज्ञान नाट्योत्सव स्पर्धा](https://www.svmrajur.com/national-science-drama-festival/): September 10, 2025 राष्ट्रीय विज्ञान नाट्योत्सव स्पर्धा (National Science Drama Festival) ही विज्ञान मंत्रालयाच्या राष्ट्रीय विज्ञान संग्रहालय परिषदेतर्फे (NCSM) आयोजित केली जाते. यामध्ये इयत्ता ६ वी ते १० वी चे विद्यार्थी विज्ञान संकल्पना नाट्यरूपात सादर करतात. सोप्या आणि मनोरंजक पद्धतीने विज्ञान सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविणे व विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन आणि सर्जनशीलता वाढवणे हा महत्वाचा उद्देश या स्पर्धा घेण्यामागचा आहे. ही स्पर्धा तालुका, जिल्हा, राज्य आणि विभागीय स्तरावरून राष्ट्रीय स्तरापर्यंत होते व विजेत्या संघांना अंतिम राष्ट्रीय महोत्सवासाठी निवडले जाते. पंचायत समिती व शिक्षण विभाग, अकोले यांच्या वतीने अगस्ति विद्यालय, अकोले येथे आयोजित केल्या गेलेल्या तालुकास्तरीय राष्ट्रीय विज्ञान नाट्योत्सव स्पर्धेमध्ये ‘मी पृथ्वी बोलते’ या […] - [श्रीहर्षा बिडवे: तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन २०२५](https://www.svmrajur.com/shriharsha-bidave-taluka-level-science-math-exhibition/): December 20, 2025 विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करणे, त्यांच्यामध्ये सर्जनशीलता आणि संशोधनाची आवड वाढीस लावणे व त्यांना पुस्तकी ज्ञानापलीकडे जाऊन व्यावहारिक ज्ञानाचा वापर करण्याची संधी देणे या प्रमुख उद्देशांनी गणित-विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन केले जाते. जिल्हा परिषद अहिल्यानगर, पंचायत समिती अकोले व विज्ञान-गणित अध्यापक संघ अकोले यांच्या संयुक्त विद्यमाने ५३ वे अकोले तालुकास्तरीय विज्ञान-गणित प्रदर्शन नुकतेच माडर्न हायस्कूल, अकोले या ठिकाणी भरविण्यात आले होते. या प्रदर्शनामध्ये गुरुवर्य रा.वि.पाटणकर सर्वोदय विद्या मंदिर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाची विद्यार्थिनी कुमारी श्रीहर्षा गौराम बिडवे या इयत्ता आठवीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थिनीने सहावी ते आठवी या गटामध्ये प्रथम क्रमांक मिळवून तालुक्यामध्ये विद्यालयाचा लौकिक वाढविला. अकोले तालुक्याचे आमदार डॉ.किरण […] - [वार्षिक स्नेहसंमेलन (Annual Gathering) २०२५](https://www.svmrajur.com/annual-gathering-2025/): December 22,23 & 24, 2025 विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी, त्यांच्यातील आत्मविश्वास वाढवण्यासाठी, सांघिक भावना निर्माण करण्यासाठी, संस्कृती आणि परंपरा जतन करण्यासाठी व त्याचबरोबर शैक्षणिक वर्षातील यशाचा आनंद साजरा करण्यासाठी शाळा कॉलेजेसमध्ये वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा आयोजित केला जातो. हा सोहळा म्हणजे केवळ एक मनोरंजन नसून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि शाळेच्या सकारात्मक वातावरणासाठी एक महत्त्वाचा उपक्रम आहे. याच अनुषंगाने गुरुवर्य रा.वि.पाटणकर सर्वोदय विद्या मंदिर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये तीन दिवस वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा पार पडला. दिनांक २२ डिसेंबर रोजी उच्च माध्यमिक विभागाचा व दिनांक २३ डिसेंबर रोजी माध्यमिक विभागाचा विविध गुणदर्शन कार्यक्रम अतिशय उत्साहात व यशस्विरीत्या पार पडला. विद्यार्थ्यांच्या उत्कृष्ट शैक्षणिक, […] - [श्री.एस.आर.देशमुख: 'राज्यस्तरीय बेस्ट NCC ऑफिसर पुरस्कार'](https://www.svmrajur.com/sr-deshmukh-state-level-best-ncc-award/): December 17, 2025 मुंबई असोसिएट एन.सी.सी. ऑफिसर वेल्फेअर बोर्ड, महाराष्ट्र राज्य यांच्या पुढाकाराने राष्ट्रीय छात्र सेना अधिकारी सन्मान सोहळा नुकताच कुर्ला, मुंबई येथे दिमाखात झाला. हा सोहळा ब्रिगेडिअर शिरीष ढोबळे, कॅप्टन मनोज भामरे, कॅप्टन आशिष दामले, मिस सुमनसिंग यांच्या हस्ते दिमाखात पार पडला. एनसीसीच्या माध्यमातून तरुण पिढीला शिस्तबद्ध, जबाबदार व देशप्रेमी घडवणाऱ्या अधिकारी वर्गाच्या कार्याचा गौरव करण्यासाठी या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. गुरुवर्य रा.वि.पाटणकर सर्वोदय विद्या मंदिर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक, फर्स्ट ऑफिसर श्री. संजय रामचंद्र देशमुख तसेच अ‍ॅड.एम.एन.देशमुख महाविद्यालयाचे प्रा. कॅप्टन रोहित मुठे यांना राज्यस्तरीय बेस्ट एनसीसी ऑफिसर अवॉर्ड देऊन सन्मानित करण्यात आले. विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्वगुण, […] - [आरोग्य तपासणी शिबीर](https://www.svmrajur.com/health-check-up-camp/): November 26, 2025 (माध्यमिक) December 17, 2025 (उच्च माध्यमिक) आजच्या वेगवान जीवनशैलीत विद्यार्थ्यांचे आरोग्य दिवसेंदिवस बिघडत चालले आहे. अशा परिस्थितीत शालेय आरोग्य तपासणी शिबिराचे महत्व अधोरेखित करणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांचे आरोग्य हे त्यांच्या शैक्षणिक यशाशी थेट जोडलेले आहे. विद्यार्थी, पालक आणि शिक्षक यांच्या सहकार्याने ही शिबिरे समाजात आरोग्यक्रांती घडवू शकतात. याच अनुषंगाने गुरुवर्य रा.वि.पाटणकर सर्वोदय विद्या मंदिर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये इयत्ता ५ वी ते १२ वीच्या विद्यार्थ्यांची मोफत प्राथमिक आरोग्य तपासणी करण्यात आली. तज्ञ डॉक्टरांच्या पथकांनी मुला-मुलींची स्वतंत्ररीत्या आरोग्य तपासणी करून विद्यार्थ्यांच्या शारीरिक व मानसिक तंदुरुस्तीचा अहवाल सादर केला. ५ वी ते १२ वीच्या एकूण १५०० विद्यार्थ्यांची प्राथमिक […] - [अग्निसुरक्षा (Fire Safety) मार्गदर्शन](https://www.svmrajur.com/fire-safety-guidance/): December 12, 2025 आग लागण्याची शक्यता कुठेही नाकारता येत नाही. अग्निसुरक्षा (फायर सेफ्टी) म्हणजे आग रोखण्यासाठी व आगीशी संबंधित अपघातांचा धोका कमी करण्यासाठी आणि आग लागल्यास व्यक्ती आणि मालमत्तेची सुरक्षितता करण्यासाठी घेतलेली खबरदारी व प्रक्रिया. गुरुवर्य रा.वि.पाटणकर सर्वोदय विद्या मंदिर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये मुंबई महानगरपालिकेतील अग्निशामक श्री.पंढरीनाथ मुठे यांनी विद्यार्थ्यांना आपत्कालीन परिस्थितीत अग्नीशमन व्यवस्थेचा वापर कसा करायचा यासंदर्भात माहीती दिली. Fire Extinguisher चा वापर कसा करावा याचे प्रात्यक्षिक त्यांनी विध्यार्थ्यांना दाखविले. श्री.पंढरीनाथ मुठे हे विद्यालयाचे माजी विद्यार्थी असून गेल्या १५ वर्षांपासून मुंबई महानगरपालिकेच्या अतिशय आव्हानात्मक अशा अग्निशमन दलामध्ये अग्निशामक पदावर कार्यरत आहेत. त्यांचा विद्यालयाच्या वतीने यथोचित सन्मान करण्यात […] - [सावित्रीबाई मदन आंतरविद्यालयीन तालुकास्तरीय मॅरेथॉन स्पर्धा 2025](https://www.svmrajur.com/savitribai-madan-marathon-spardha/): December 6, 2025 सत्यनिकेतन संस्था आयोजित ‘कै.सावित्रीबाई मदन स्मृतीचषक आंतरविद्यालयीन तालुकास्तरीय मॅरेथॉन स्पर्धा’ अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात पार पडल्या. ‘मैदानी खेळ हे एक उत्तम शिक्षण आहे, जे आपल्याला निरोगी, आनंदी आणि यशस्वी जीवन जगण्यासाठी आवश्यक गुण शिकविते. म्हणून दररोज किमान थोडा वेळ तरी खेळणे महत्वाचे आहे कारण मैदानी खेळातूनच विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होतो’ असे प्रतिपादन सत्यनिकेतन संस्थेचे कोषाध्यक्ष श्री. विवेकजी मदन यांनी याप्रसंगी आयोजित पारितोषिक वितरण समारंभप्रसंगी केले. याप्रसंगी राजूर पोलीस स्टेशनचे ए.पी.आय. श्री.किशोर पवार, हवालदार शंकर साठे, मेजर मच्छिंद्र पोटकुले, सत्यनिकेतन संथेचे ज्येष्ठ संचालक श्री.मिलिंद उमराणी, श्री.विजय पवार, श्री.श्रीराम पन्हाळे, प्राचार्य श्री.भाऊसाहेब बनकर, पर्यवेक्षक श्री.गोरक्ष मालुंजकर, श्री.विजय काळे, श्री.पप्पू टिंगीया, […] - [१ डिसेंबर: जागतिक एड्स दिन](https://www.svmrajur.com/words-aids-day/): December 1, 2025 एचआयव्ही संसर्गाबाबत जगभरातील लोकांना जागरूक करण्यासाठी दरवर्षी १ डिसेंबर रोजी जागतिक एड्स दिन साजरा केला जातो. HIV च्या संसर्गामुळे होणारा साथीचा रोग एड्स (AIDS) म्हणून ओळखला जातो. १९८८ मध्ये हा दिवस पहिल्यांदा साजरा करण्यात आला. १९९६ मध्ये संयुक्त राष्ट्र संघाने जागतिक स्तरावर एचआयव्ही-एड्सचा प्रचार आणि प्रसार करण्याचे काम हाती घेतले आणि १९९७ मध्ये ‘जागतिक एड्स मोहिमे’अंतर्गत संसर्ग, प्रतिबंध आणि शिक्षण यावर काम करण्यास सुरुवात झाली. त्यानंतर जगभरात ‘जागतिक एड्स दिन’ साजरा केला जाऊ लागला. गुरुवर्य रा.वि.पाटणकर सर्वोदय विद्या मंदिर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये १ डिसेंबर रोजी जागतिक एड्स दिनानिमित्त जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. ज्येष्ठ विज्ञान-विषय […] - [शैक्षणिक सहल २०२५: उच्च माध्यमिक विभाग](https://www.svmrajur.com/shaikshanik-sahal-2025-ucch-madhyamik/): November 28/29, 2025 GO TO HOME PAGE - [कायदेविषयक जागरूकता शिबिर](https://www.svmrajur.com/kayadevishayak-jagrukata-shibir/): November 27, 2025 तालुका विधी सेवा समिती, अकोले राजूर न्यायालय व राजूर-अकोले वकील संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आज गुरुवर्य रा.वि.पाटणकर सर्वोदय विद्या मंदिर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये इयत्ता ११ वी १२ वी च्या विद्यार्थ्यांसाठी आज कायदेविषयक जागरूकता शिबिराचे यशस्वी आयोजन करण्यात आले. याप्रसंगी राजूर न्यायालयाचे न्यायाधीश श्री.एस.यु.न्याहारकर, राजूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री.के.जी.पवार, अकोले तालुका वकील संघाचे उपाध्यक्ष ॲड.श्री.डी.एम.निगळे व सामाजिक कार्यकर्ते श्री.विनय सावंत या मान्यवरांनी वेगवेगळ्या विषयांवर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत कायदेविषयक जागरुक राहण्यासंदर्भात प्रबोधन केले. महिलांची सुरक्षितता व गोपनीयता, आदिवासी व दुर्गम भागातील नागरिकांना कायदेविषयक जागृत करणे, NALSA व MSLSA च्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती देणे, विद्यार्थ्यांना भारतीय […] - [२६ नोव्हेंबर: संविधान दिन](https://www.svmrajur.com/26-november-sanvidhan-in/): November 26, 2025 संविधान दिन किंवा राष्ट्रीय विधी दिन हा २६ नोव्हेंबर रोजी भारतभर साजरा केला जातो. २९ ऑगस्ट १९४७ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संविधानाच्या निर्मितीसाठी मसूदा समिती स्थापन झाली. अनेक बैठका व चर्चासत्रांनंतर या समितीने सादर केलेला अंतिम मसुदा २६ नोव्हेंबर १९४९ रोजी संविधान सभेने स्वीकारला. त्यामुळे २६ नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा केला जातो. भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सन्मानार्थ भारतीय संविधान दिन साजरा केला जातो. संविधानाबाबत जनजगृती करण्यासाठी आणि आंबेडकरांच्या विचारांचा प्रसार करण्याच्या उद्देशाने देशभरात २६ नोव्हेंबर हा दिवस ‘संविधान दिन’ म्हणून साजरा केला जातो. गुरुवर्य रा.वि.पाटणकर सर्वोदय विद्या मंदिर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये आज विविध […] - [सत्यनिकेतन संस्थांतर्गत गणित-विज्ञान प्रदर्शन २०२५](https://www.svmrajur.com/satyaniketan-science-maths-exhibition/): November 24, 2025 सत्यनिकेतन संस्थेच्या अंतर्गत असणाऱ्या सर्व माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालये, वरिष्ठ महाविद्यालय, आश्रम शाळा या सर्व विभागांचे एकत्रित गणित-विज्ञान प्रदर्शन भरविण्याची संकल्पना सत्यनिकेतन संस्थेचे माजी सचिव श्री.टी.एन.कानवडे यांनी ७ वर्षापूर्वी मांडली होती. सालाबादाप्रमाणे आज २४ नोव्हेंबर रोजी सत्यनिकेतन संस्थांतर्गत ७ व्या गणित-विज्ञान प्रदर्शनाचे यशस्वीरीत्या आयोजन करण्यात आले. या गणित-विज्ञान प्रदर्शनाच्या उदघाटन प्रसंगी सत्यनिकेतन परिवारातील सर्व शाळा-महाविद्यालयांतील स्पर्धक, संस्था पदाधिकारी, प्राचार्य-उपप्राचार्य, मुख्याध्यापक, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, वसतिगृह कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. संस्थेचे ज्येष्ठ संचालक श्री.विजय पवार यांच्या अध्यक्षतेखाली या गणित-विज्ञान प्रदर्शनाचा उदघाटन सोहळा पार पडला. यावेळी व्यासपीठावर सत्यनिकेतन संस्थेचे ज्येष्ठ संचालक श्री.व्ही.टी.पाबळकर, अ‍ॅड.एम.एन.देशमुख महाविद्यालयाचे प्राचार्य श्री.भाऊसाहेब देशमुख, […] - [वार्षिक क्रीडा महोत्सव: माध्यमिक](https://www.svmrajur.com/varshik-krida-mahotsav-secondary/): November 18/19/20/21, 2025 गुरुवर्य रा.वि.पाटणकर सर्वोदय विद्या मंदिर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचा वार्षिक क्रीडा महोत्सव आजपासून सुरु झाला. १८ नोव्हेंबर ते २१ नोव्हेंबर या कालावधीत माध्यमिक व उच्च माध्यमिक या दोन्ही विभागांचा वार्षिक क्रीडा महोत्सव पार पडणार आहे. क्रीडा शिक्षक श्री.जे.आर.आरोटे व श्री.व्ही.टी.तारू यांनी या वार्षिक क्रीडा महोत्सवाचे उत्कृष्ठ नियोजन केलेले आहे. १८ नोव्हेंबर रोजी माध्यमिक विभागाच्या क्रीडा महोत्सवाचा उदघाटन सोहळा पार पडला. विद्यालयाचे प्राचार्य श्री.बी.के. बनकर व पर्यवेक्षक श्री.जी.बी.मालुंजकर यांच्या हस्ते या स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. कलाशिक्षक श्री.फापाळे सर व श्री.मंडलिक सर हेदेखील उदघाटन प्रसंगी अतिथी म्हणून उपस्थित होते. माध्यमिक विभागाचे सर्व शिक्षक यावेळी उपस्थित होते. क्रीडा विभागाने […] - [वार्षिक क्रीडा महोत्सव: उच्च माध्यमिक](https://www.svmrajur.com/varshik-krida-mahotsav-higher-secondary/): November 19/20/21, 2025 गुरुवर्य रा.वि.पाटणकर सर्वोदय विद्या मंदिर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचा वार्षिक क्रीडा महोत्सव आजपासून सुरु झाला. १९ नोव्हेंबर ते २१ नोव्हेंबर या कालावधीत माध्यमिक व उच्च माध्यमिक या दोन्ही विभागांचा वार्षिक क्रीडा महोत्सव पार पडणार आहे. क्रीडा शिक्षक श्री.व्ही.टी.तारू व श्री.जे.आर.आरोटे यांनी या वार्षिक क्रीडा महोत्सवाचे उत्कृष्ठ नियोजन केलेले आहे.   उदघाटन- आज १९ नोव्हेंबर रोजी उच्च माध्यमिक विभागाच्या क्रीडा महोत्सवाचा उदघाटन सोहळा पार पडला. सत्यनिकेतन संस्थेचे ज्येष्ठ संचालक श्री.एस.टी.येलमामे व श्री.विजय पवार यांच्या शुभहस्ते नारळ वाढवून उदघाटन सोहळा पार पडला. उच्च माध्यमिक विभागाचे उपप्राचार्य श्री.डी.जी.बुऱ्हाडे यांनी सर्व उपस्थितांचे स्वागत केले. विद्यालयाचे प्राचार्य श्री.बी.के.बनकर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. […] - [महाविस्तार कृषी AI ॲप मार्गदर्शन](https://www.svmrajur.com/mahavistar-krushi-ai-app-guidance/): November 15 & 17, 2025 राज्य शासनाच्या कृषी विभागाने नुकतेच महाविस्तार AI ॲप विकसित केले आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक शेतकऱ्यास डिजिटल सेवेच्या माध्यमातून शास्त्रशुद्ध आणि रिअल-टाइम कृषिविषयक सल्ला देऊन त्यांचे सक्षमीकरण करणे हा महाविस्तार AI ॲप विकसित करण्यामागचा उद्देश आहे. राज्य शासनाच्या कृषी विभागाने विकसित केलेल्या या प्लॅटफॉर्मवर हवामान, माती, कृषी सल्ला, खाद-बियाणे, किड-रोग नियोजन, बाजारभाव, बाजारपेठ व त्याचबरोबर विविध शासकीय योजनांची माहिती एकत्रितपणे उपलब्ध आहे. मराठी तसेच इंग्रजी भाषेतील चॅटबॉटमार्फत शेतकऱ्यांना स्थानिक आणि त्यांच्या गरजेनुसार सल्ला अत्यंत सहज मिळू शकतो. क्लिष्ट माहिती आणि शेतीतील व्यवहार्य निर्णय यातील दरी दूर करण्याचे काम महाविस्तार करते. महाविस्तार हे शाश्वत शेती, डिजिटल सक्षमीकरण आणि […] - [लायन्स क्लब पुणे फ्युचर: चित्रकला स्पर्धा](https://www.svmrajur.com/lions-club-pune-drawing-competition/): November 13, 2025 जागतिक शांतता ही काळाची गरज आहे. युद्ध, हिंसाचार व दहशतवाद यामुळे आज संपूर्ण जगात भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे व त्याचबरोबर असुरक्षिततेचे सावट पसरलेले आहे. जागतिक शांतता ही केवळ युद्ध टाळण्यासाठीच नव्हे, तर मानवजातीच्या सर्वांगीण विकासासाठी आणि भविष्यातील पिढ्यांसाठी एक सुरक्षित आणि समृद्ध जग निर्माण करण्यासाठी अत्यावश्यक आहे. हेच उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेऊन लायन्स क्लब पुणे फ्युचर यांनी नुकतीच ‘पीस पोस्टर चित्रकला स्पर्धा (Peace Poster Drawing Competition)’ आयोजित केली. गुरुवर्य रा.वि.पाटणकर सर्वोदय विद्या मंदिर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील ११ ते १३ वयोगटातील १३० स्पर्धकांनी या स्पर्धेत सहभाग घेतला. ‘जागतिक शांतता (World Peace)’ ही या स्पर्धेची मुख्य थीम […] - [राजूर बस स्थानक: वृक्षारोपण व स्वच्छता](https://www.svmrajur.com/rajur-bus-stand-tree-plantation-cleanliness/): November 14, 2025 ‘आम्ही पर्यावरण प्रेमी’ फौंडेशन, महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ, राजूर आगार व गुरुवर्य रा.वि.पाटणकर सर्वोदय विद्या मंदिर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, राजूर यांचे संयुक्त विद्यमाने आज राजूर बस स्थानक परिसरामध्ये वृक्षारोपण व स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. याप्रसंगी राजुरचे ज्येष्ठ ग्रामस्थ श्री.किरणशेठ माळवे, आगार प्रमुख श्री.रखमा देशमुख, गुरुवर्य रा.वि.पाटणकर सर्वोदय विद्या मंदिर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक श्री.शरद तुपविहिरे व श्री.संतोष कोटकर, ‘आम्ही पर्यावरण प्रेमी’ फौंडेशनचे राहूल राऊत, रमेश लेंभे, किसन पिचड, दत्ता कोंडार, सुनिल बांडे व प्रवासी उपस्थित होते. आगार प्रमुख श्री.रखमा देशमुख, ‘आम्ही पर्यावरण प्रेमी’ फौंडेशनचे अध्यक्ष श्री.राहूल राऊत व गुरुवर्य रा.वि.पाटणकर सर्वोदय विद्या […] - [१४ नोव्हेंबर: बालदिन](https://www.svmrajur.com/14-november-baldin/): November 14, 2025 देशभरात दरवर्षी १४ नोव्हेंबर हा दिवस स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जन्मदिनानिमित्त बालदिन म्हणून साजरा केला जातो. नेहरुजींना लहान मुलांबद्दल खूप प्रेम होते. मुले त्यांना प्रेमाने ‘चाचा नेहरू’ म्हणत असत. बालदिन हा केवळ मुलांचा सण नसून देशाच्या भविष्याचा उत्सव आहे. गुरुवर्य रा.वि.पाटणकर सर्वोदय विद्या मंदिर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात आज १४ नोव्हेंबर रोजी पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीसोबतच बालदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी आयोजित कार्यक्रमामध्ये पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. ज्येष्ठ शिक्षक श्री.दीपक पाचपुते यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना नेहरूजींविषयी अतिशय अभ्यासपूर्ण माहिती दिली. यानिमित्त विद्यार्थ्यांसाठी मनोरंजनात्मक खेळांचे […] - [राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा २०२५](https://www.svmrajur.com/state-level-wrestling-competition/): November 6 & 7, 2025 क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय रायगड-अलिबाग आयोजित ६ ते ७ नोव्हेंबर २०२५ रोजी पार पडलेल्या राज्यस्तरीय शालेय कुस्ती क्रीडा स्पर्धेमध्ये ४८ किलो वजनी गटामध्ये सत्यनिकेतन संचलित गुरुवर्य रा.वि.पाटणकर सर्वोदय विद्या मंदिर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थी जयेश गणेश बोऱ्हाडे याने नेत्रदीपक कामगिरी करत कांस्यपदक मिळविले. राजूरसारख्या आदिवासी भागातील इयत्ता ११ वी वाणिज्य मध्ये शिकणाऱ्या जयेशने कुस्तीमध्ये अप्रतिम कामगिरी केल्याबद्दल सर्वत्र त्याचे कौतुक होत आहे. सत्यनिकेतन संस्थेचे अध्यक्ष ॲड.एम.एन.देशमुख, सचिव श्री.एम.एल.मुठे, कोषाध्यक्ष श्री.विवेकजी मदन, संचालक श्री.टी.एन.कानवडे, श्री.एस.टी.येलमामे, श्री.विजय पवार, प्राचार्य श्री.बी.वाय.देशमुख, प्राचार्य श्री.बी.के.बनकर व उपप्राचार्य श्री.डी.जी.बु-हाडे यांनी जयेशचे […] - [स्व.रा.वि.पाटणकर: २१ वा स्मृतिदिन](https://www.svmrajur.com/swargiy-rv-patankar-smrutidin/): November 12, 2025 गांधीवादी विचारांची कास धरून अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील राजुरसारख्या अतिशय दुर्गम भागात ज्यांनी शिक्षणाची मुहुर्तमेढ रोवत आदिवासी जनतेच्या विकासासाठी आपले संपूर्ण आयुष्य वेचले असे सत्यनिकेतन संस्थेचे संस्थापक सचिव तथा थोर गांधीवादी कार्यकर्ते स्व.रा.वि. पाटणकर यांना २१ व्या स्मृतीदीनानिमित्ताने आज  १२ नोव्हेंबर २०२५ रोजी सत्यनिकेतन संस्थेच्या वतीने आदरांजली वाहण्यात आली. याप्रसंगी सत्यनिकेतन परिवारातील सर्व पदाधिकारी, संचालक, सभासद, प्राध्यापक, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सकाळच्या प्रसन्न वातावरणामध्ये स्व.रा.वि. पाटणकर यांच्या स्मृतीस्थळावरील अर्धाकृती पुतळ्यास मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर गुरुवर्य रा.वि. पाटणकर सर्वोदय विद्या मंदिर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या प्रांगणामध्ये अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले. स्व.रा.वि. पाटणकर […] - [सर्वोदय: 'वंदे मातरम' १५० वा वर्धापन दिन](https://www.svmrajur.com/sarvoday-vande-mataram-150th-vardhapan-din/): November 7, 2025 बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी १८७५ साली लिहिलेल्या “वंदे मातरम” या गीतास स्वातंत्र्यलढ्यात तसेच स्वातंत्र्योत्तर कालखंडातही अनन्यसाधारण महत्व प्राप्त आहे. ‘आनंदमठ’ या कादंबरीतील हे गीत भारतमातेच्या स्तुतीचे प्रतिक असून स्वातंत्र्यलढ्यातील असंख्य क्रांतीकारकांना प्रेराणादाई ठरलेले आहे. या गीतास आज ७ नोव्हेंबर २०२५ रोजी १५० वर्षे पूर्ण झाले. गुरुवर्य रा.वि.पाटणकर सर्वोदय विद्या मंदिर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये आज माध्यमिक व उच्च माध्यमिक या दोन्ही विभागामध्ये “वंदे मातरम” या गीताचा १५० वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. याप्रसंगी आयोजित कार्यक्रमामध्ये ज्येष्ठ शिक्षक श्री.किशोर देशमुख यांच्यासह सर्व विद्यार्थी व शिक्षकांनी “वंदे मातरम” गीताचे अतिशय सुरेल असे सामुहिक गायन केले. याप्रसंगी सत्यनिकेतन संस्थेचे संचालक श्री.विजय […] - ['वंदे मातरम' १५० वा वर्धापन दिन](https://www.svmrajur.com/vande-mataram-150th-anniversary/): November 7, 2025 बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी १८७५ साली लिहिलेल्या “वंदे मातरम” या गीतास स्वातंत्र्यलढ्यात तसेच स्वातंत्र्योत्तर कालखंडातही अनन्यसाधारण महत्व प्राप्त आहे. ‘आनंदमठ’ या कादंबरीतील हे गीत भारतमातेच्या स्तुतीचे प्रतिक असून स्वातंत्र्यलढ्यातील असंख्य क्रांतीकारकांना प्रेराणादाई ठरलेले आहे. या गीतास आज ७ नोव्हेंबर २०२५ रोजी १५० वर्षे पूर्ण झाले. डॉ. पंकज आशिया, जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष वंदे मातरम सार्ध शताब्दी महोत्सव जिल्हा समिती यांचे आदेशाने क्रांतिकारक राघोजी भांगरे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, राजूर यांच्या उत्कृष्ठ अशा नियोजनाखाली “वंदे मातरम” गीताचा १५० वा वर्धापन दिन कार्यक्रम आज पार पडला. अ‍ॅड.एम.एन.देशमुख महाविद्यालयाच्या क्रीडा संकुलामध्ये हा दिमाखदार सोहळा आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमास तहसीलदार श्री.सिद्धार्थ मोरे, […] - [राष्ट्रीय एकता दिवस: एकता दौड](https://www.svmrajur.com/national-unity-day-ekata-daud/): October 31, 2025 सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त ३१ ऑक्टोबर हा दिवस दरवर्षी राष्ट्रीय एकता दिवस म्हणून देशभर साजरा केला जातो. भारतातील राष्ट्रीय आणि राजकीय एकात्मता व एकता वाढविण्याच्या दृष्टीने वल्लभभाई पटेल यांनी बजावलेल्या महत्त्वपूर्ण भूमिकेचा सन्मान करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. अहिल्यानगर जिल्हा पोलीस दल, राजूर पोलीस स्टेशन, गुरुवर्य रा.वि.पाटणकर सर्वोदय विद्या मंदिर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय NCC विभाग, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, राजूर व सत्वशील करिअर अकॅडमी, राजूर यांचे संयुक्त विद्यमाने आज सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त राजुरमध्ये एकता दौड (Run For Unity) आयोजित करण्यात आली. आय.टी.आय. कॉलेज पासून निघालेल्या या एकता दौडमध्ये विद्यार्थी, शिक्षक, पोलीस […] - [कै. सावित्रीबाई मदन पुण्यस्मरण](https://www.svmrajur.com/savitribai-madan-death-anniverary/): October 25, 2025 सत्यनिकेतन संस्थेच्या संस्थापक कोषाध्यक्षा तथा थोर गांधीवादी कार्यकर्त्या कै.सावित्रीबाई मदन यांना २९ व्या पुण्यतिथीनिमित्ताने शनिवार दिनांक २५ ऑक्टोबर २०२५ रोजी सत्यनिकेतन संस्थेतील त्यांच्या स्मृतीस्थळी अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी सत्यनिकेतन परिवारातील सर्व पदाधिकारी, संचालक, सभासद, प्राध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या निमित्ताने सर्वधर्मीय प्रार्थनेचे गायन करण्यात आले. उपस्थित मान्यवरांनी आपल्या मनोगतांमध्ये सावित्रीबाईंच्या पवित्र स्मृतींना उजाळा देत त्यांच्या कार्यकर्तुत्वाचा इतिहास सांगितला. गुरुवर्य रा.वि. पाटणकर, बापूसाहेब शेंडे व सावित्रीबाई मदन या त्रिमुर्तींचा सत्यनिकेतन संस्थेच्या उभारणीमध्ये असलेल्या योगदानाचा मान्यवरांनी उल्लेख केला. सत्यनिकेतन संस्थेचे जेष्ठ संचालक श्री.प्रकाश टाकळकर, श्री.विजय पवार, श्री.मिलिंद उमराणी, श्री.एस.टी.येलमामे, प्राचार्य श्री.बी.वाय. देशमुख, प्राचार्य श्री.बी.के.बनकर, […] - [वाचन प्रेरणा दिन: १५ ऑक्टोबर](https://www.svmrajur.com/vachan-prerna-din-15-october/): October 15, 2025 माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या स्मृती जतन करण्याच्या उद्देशाने १५ ऑक्टोबर हा त्यांचा जन्मदिवस ‘वाचन प्रेरणा दिन‘ म्हणून साजरा केला जातो. विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण करणे आणि समाजात वाचन संस्कृतीचा प्रसार करणे हे या दिनाचे मुख्य उद्दिष्ट आहे. या निमित्ताने शाळा, महाविद्यालये आणि शासकीय कार्यालयांमध्ये विविध उपक्रम आयोजित केले जातात. डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या ज्ञानाची आणि वाचनाची आवड लक्षात घेऊन हा दिवस वाचनाला प्रोत्साहन देण्यासाठी आणि समाजात वाचन संस्कृती वाढवण्यासाठी समर्पित केला गेला आहे. आजच्या विद्यार्थ्यांचे अभ्यासाच्या व्यतिरिक्त आवांतर वाचन होणे आवश्यक आहे. आवांतर वाचनामुळे विद्यार्थ्यांना अनेक संदर्भ मिळतात, त्यांची आकलन शक्ती वाढते तसेच इतरांवर […] - [पुणे विभागीय कुस्ती स्पर्धा २०२५](https://www.svmrajur.com/pune-vibhagiy-kusti-spardha-2025/): October 07/08/09, 2025 पुणे येथे नुकत्याच पार पडलेल्या विभागीय कुस्ती स्पर्धेमध्ये सत्यनिकेतन संचलित गुरुवर्य रा.वि.पाटणकर सर्वोदय विद्या मंदिर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी नेत्रदीपक कामगिरी करत इतिहास घडविला. या स्पर्धेमध्ये सुवर्णपदक मिळविलेल्या जयेश गणेश बोऱ्हाडे याची रायगड येथे होणा-या राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली आहे. १. जयेश गणेश बोऱ्हाडे (११ वी वाणिज्य), ४८ किलो वजनी गट सुवर्णपदक २. निलेश गणपत लोहरे (११ वी विज्ञान), ४८ किलो वजनी गट रौप्यपदक ३. अधिराज राधाकिसन देशमुख (११ वी विज्ञान) ४८ किलो वजनी गट कांस्यपदक राजूरसारख्या आदिवासी भागातील विद्यार्थ्यांनी कुस्तीमध्ये अप्रतिम कामगिरी केल्याबद्दल सर्वांचे सर्वत्र कौतुक होत आहे. सत्यनिकेतन संस्थेचे अध्यक्ष ॲड.एम.एन.देशमुख, सचिव श्री.एम.एल.मुठे, […] - [जिल्हास्तरीय ज्युदो स्पर्धा २०२५](https://www.svmrajur.com/district-level-judo-competition/): October 10, 2025 नेवासा, जिल्हा अहिल्यानगर येथे आज दिनांक १० ऑक्टोबर २०२५ रोजी क्रीडा व युवक सेवा संचालनालय व जिल्हा क्रीडा परिषद, अहिल्यानगर यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय ज्युदो स्पर्धा आयोजित करण्यात आली. या स्पर्धेमध्ये सत्यनिकेतन संचलित गुरुवर्य रा.वि.पाटणकर सर्वोदय विद्या मंदिर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी नेत्रदीपक कामगिरी करत पुणे विभागीय ज्युदो स्पर्धेसाठी आपले स्थान निश्चित केले. १. निलेश गणपत लोहरे (११ वी विज्ञान), ५० किलो वजनी गट प्रथम क्रमांक २. मुर्तडक सुरज संजय (११ वी वाणिज्य), ५५ किलो वजनी गट प्रथम क्रमांक पुणे विभागीय ज्युदो स्पर्धेसाठी निवड !!! ३. विराज नामदेव देशमुख (११ वी कला) ४५ किलो वजनी […] - [वन्यजीव सप्ताह २०२५: व्याख्यान](https://www.svmrajur.com/vanyajeev-saptah-2025-vyakhyan/): October 04, 2025 वनक्षेत्रपाल राजूर (भ.व.का.) व गुरुवर्य रा.वि.पाटणकर सर्वोदय विद्या मंदिर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, राजूर यांचे संयुक्त विद्यमाने ‘वन्यजीव सप्ताह’ उपक्रमांतर्गत नाशिक येथील नामांकित ‘इको’ या संस्थेचे संचालक तथा वन्यजीव अभ्यासक श्री.वैभवजी भोगले यांचे आज विद्यालयात व्याख्यान आयोजित करण्यात आले. यावेळी राजूर वनपरिक्षेत्र अधिकारी श्री.डी.डी.पडवळे, वनपाल श्री.डोंगरे साहेब, प्राचार्य श्री.बी.के.बनकर, पर्यवेक्षक श्री.जी.बी.मालुंजकर, पत्रकार श्री.प्रकाशजी महाले सर व त्याचबरोबर वनक्षेत्रपाल राजूर यांचे कार्यालयातील सर्व वनरक्षक व वनमजूर उपस्थित होते. विद्यालयाचे प्राचार्य श्री.बी.के.बनकर यांनी सर्व मान्यवरांचे स्वागत केले व त्यांचा यथोचित सन्मान केला. वनविभागाच्या या स्तुत्य उपक्रमाचे प्राचार्यांनी कौतुक केले. वनपरिक्षेत्र अधिकारी श्री.डी.डी.पडवळे यांनी ‘वन्यजीव साप्ताह’ उपक्रमाचा उद्देश स्पष्ट […] - [महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री जयंती](https://www.svmrajur.com/mahatma-gandhi-lal-bahaddur-shastri-jayanti/): October 02, 2025 गुरुवर्य रा.वि.पाटणकर सर्वोदय विद्या मंदिर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात आज २ ऑक्टोबर २०२५ रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. याप्रसंगी दोन्ही महापुरुषांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. विद्यालयातील ज्येष्ठ शिक्षक श्री.किशोर देशमुख व श्री.संतराम बारवकर यांच्या सुरेल संगीत साथीने सावित्रीबाई मदन कन्या निवासच्या मुलींनी सुश्राव्य अशा सर्वधर्मीय प्रार्थनांचे गायन केले. विद्यालयाचे प्राचार्य श्री.बी.के.बनकर, उपप्राचार्य श्री.डी.जी.बु-हाडे, पर्यवेक्षक श्री.जी.बी.मालुंजकर, वसतिगृह अधीक्षिका श्रीमती जोशी मॅडम, अधीक्षक श्री.ढगे सर, माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागाचे सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी याप्रसंगी उपस्थित होते. कार्यक्रमप्रमुख व ज्येष्ठ शिक्षक श्री.दिपक पाचपुते यांनी या कार्यक्रमाचे […] - [स्वच्छता मोहीम](https://www.svmrajur.com/swachhata-mohim/): October 01, 2025 राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीदिनाच्या पूर्वसंध्येला आज दिनांक १ ऑक्टोबर २०२५ रोजी गुरुवर्य रा.वि.पाटणकर सर्वोदय विद्या मंदिर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात स्वच्छता मोहीम राबविली गेली. विद्यार्थ्यांमध्ये स्वच्छतेबद्दल जागरूकता निर्माण करणे व त्यांच्यातील जबाबदारीच्या मूल्यांना प्रोत्साहन देणे हा या मोहिमेमागचा मुख्य उद्देश होता. याच मूल्यांचे स्वतः महात्मा गांधी यांनी समर्थन केले होते. सकाळच्या सत्रात उच्च माध्यमिक विभागाच्या व दुपारच्या सत्रात माध्यमिक विभागाच्या विद्यार्थ्यांनी या स्वच्छता मोहीमेमध्ये सक्रियपणे व उत्साहाने सहभाग घेतला होता. या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांनी शालेय परिसर स्वच्छ करून शाळेप्रती असलेली आपली निष्ठा व तळमळ व्यक्त केली. हा उपक्रम म्हणजे विद्यार्थ्यांमध्ये शाळेबद्दल तसेच पर्यावरणाबद्दल जागरूकता वाढवण्याच्या दृष्टीने […] - [तालुकास्तरीय मैदानी स्पर्धा: २०२५](https://www.svmrajur.com/taluka-level-athletics-competition/): September 26, 2025 ध्रुव ग्लोबल स्कूल, संगमनेर येथे नुकत्याच पार पडलेल्या तालुकास्तरीय मैदानी (Athletics) स्पर्धेमध्ये गुरुवर्य रा.वि.पाटणकर सर्वोदय विद्या मंदिर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी चमकदार कामगिरी करत उत्तम खेळाचे प्रदर्शन केले. बहुतांश विद्यार्थ्यांची जिल्हास्तरावर निवड झाली आहे. यशस्वी स्पर्धक पुढीलप्रमाणे- १. कोंडार उमेश विठ्ठल (१४ वर्षे वयोगट) गोळाफेक, प्रथम क्रमांक (जिल्हास्तरावर निवड) २. भोईर ऋतिक मानकू (१७ वर्षे वयोगट) उंचउडी, प्रथम क्रमांक (जिल्हास्तरावर निवड) ३. आढार वैभव (१९ वर्षे वयोगट) ५००० मी चालणे, प्रथम क्रमांक (जिल्हास्तरावर निवड) ४. भोईर ऋतिक मानकू (१९ वर्षे वयोगट) २०० मी रनिंग, द्वितीय क्रमांक (जिल्हास्तरावर निवड) ५. तळपे ओंकार युवराज (१९ वर्षे वयोगट) […] - [आंतरविद्यालयीन तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा](https://www.svmrajur.com/rvpatankar-antarvidyalayin-vaktrutv-spardha/): September 19, 2025 कै.रा.वि. पाटणकर स्मृतिचषक आंतरविद्यालयीन तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा: २०२५-२६ सत्यनिकेतन संस्थेच्या वतीने शुक्रवार दि. १९/०९/२०२५ रोजी कै.रा.वि. पाटणकर स्मृतिचषक आंतरविद्यालयीन तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा गुरुवर्य रा.वि. पाटणकर सर्वोदय विद्या मंदिर येथे आयोजित करण्यात आली. या स्पर्धेमध्ये इ. ५ वी ते ७ वी गटात ३१ विद्यार्थी तर इ. ८ वी ते १० वी गटात ४२ अशा एकूण ७३ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. स्पर्धेचे हे अकरावे वर्ष होते. स्पर्धेचे उद्घाटन सत्यनिकेतन संस्थेचे सचिव मा.श्री. मुठे एम. एल. साहेब यांनी केले. दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. कै.सावित्रीबाई मदन कन्या निवास अधिक्षिका जोशी मॅडम यांनी स्वागतगीताचे सादरीकरण केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे जेष्ठ संचालक श्री.विजय […] - [कला मंडळ व वाङमय मंडळ उदघाटन](https://www.svmrajur.com/kala-mandal-vangmay-mandal-inauguration/): September 19, 2025 गुरुवर्य रा.वि. पाटणकर सर्वोदय विद्या मंदिर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या उच्च-माध्यमिक विभागाच्या कला मंडळ व वाङमय मंडळाचा उदघाटन सोहळा आज लोकप्रिय कवी व ‘दंगल’कार श्री.नितीन चंदनशिवे यांचे शुभहस्ते पार पडला. यावेळी विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड उत्साह दिसून आला. अत्यंत साध्या व ओघवत्या शैलीमध्ये श्री.नितीन चंदनशिवे यांनी अनेक प्रसंग विनोदी शैलीमध्ये सांगत उपस्थितांना अक्षरशः पोट धरून हसविले. अधून-मधून आपल्या कविता सादर करताना त्यांनी उपस्थितांची मने जिंकली. आपल्या आयुष्यातील अनेक घटना व अनुभव सांगताना त्यांनी विद्यार्थ्यांना जीवनाचा खरा अर्थ उलगडून सांगितला. कला व वाङमय या दोन्ही गोष्टींनी आपले व्यक्तिमत्व कसे घडते हे त्यांनी अनेक उदाहरणे देऊन स्पष्ट केले. बदलत्या सामाजिक […] - [विद्यार्थी आधार कार्ड नोंदणी व दुरुस्ती कॅम्प](https://www.svmrajur.com/student-aadhar-card-registration-camp/): September 15-18, 2025 Mandatory Biometric Updation (MBU) Camp ‘अकोले गट साधन केंद्र, अकोले’ करिता तीन आधार कार्ड युनिट सुरु झालेले असून अकोले तालुक्यातील सर्व माध्यमाचे सर्व व्यवस्थापन शाळेतील इयत्ता १ ली ते १२ वी च्या विद्यार्थ्यांची आधार कार्ड नोंदणी व दुरुस्ती करायची आहे.   या अनुषंगाने शिक्षण विभाग, पंचायत समिती अकोले, भारतीय डाक विभाग व गुरुवर्य रा.वि. पाटणकर सर्वोदय विद्या मंदिर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, राजूर यांचे संयुक्त विद्यमाने आजपासून विद्यालयामध्ये मोफत आधार कार्ड नोंदणी व दुरुस्ती शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे. दिनांक १५ सप्टेंबर २०२५ ते १८ सप्टेंबर २०२५ या कालावधीमध्ये चार दिवस ही सुविधा विद्यार्थ्यांसाठी सुरु राहणार आहे. […] - [पालक मेळावा: माध्यमिक विभाग](https://www.svmrajur.com/parents-meet-secondary/): September 13, 2025 गुरुवर्य रा.वि. पाटणकर सर्वोदय विद्या मंदिर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या माध्यमिक विभागाचा (इयत्ता ५ वी ते १० वी) पालक मेळावा (विद्यार्थी-पालक-शिक्षक सहविचार सभा) शनिवार दिनांक १३ सप्टेंबर २०२५ रोजी आयोजित करण्यात आला. या मेळाव्याला पालकांची उपस्थिती लक्षणीय होती.      या सहविचार सभेत विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढ व सर्वांगीण विकास, शैक्षणिक समस्या, घटक चाचणी परीक्षा निकाल, विद्यार्थी उपस्थिती तसेच शाळेतील विविध उपक्रम या विषयांवर विचारविनिमय झाला. इयत्ता ५ वी ते १० वी च्या विद्यार्थ्यांना व पालकांना वर्गवार बसवून पालकांना आपल्या पाल्याच्या प्रगतीविषयी माहिती देण्यात आली. प्राचार्य श्री.बी.के.बनकर व पर्यवेक्षक श्री.जी.बी.मालुंजकर यांनी शाळेतील उपक्रम व शाळेच्या प्रगतीविषयी सविस्तर माहिती दिली. या प्रसंगी […] - [जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धा: २०२५](https://www.svmrajur.com/district-level-wrestling-competition/): September 11, 2025 तालुक्यापाठोपाठ सर्वोदयच्या विद्यार्थ्यांचा जिल्ह्यातही डंका…. क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य पुणे, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, अहिल्यानगर जिल्हा कुस्ती संघ व कोपरगाव तालुका क्रीडा समिती यांचे संयुक्त विद्यमाने कोपरगाव येथे भव्य जिल्हास्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या जिल्हास्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेत सत्यनिकेतन संचलित गुरुवर्य रा.वि.पाटणकर सर्वोदय विद्या मंदिर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील चार कुस्ती मल्लांनी सुवर्णपदक व दोन कुस्ती मल्लांनी रौप्यपदक पटकावले. या सर्व विद्यार्थ्यांची विभागीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली आहे. देशमुख अधिराज राधाकिसन ४५ किलो सुवर्णपदक बोराडे जयेश गणेश ४८ किलो सुवर्णपदक लोहरे निलेश गणपत ४८ किलो ग्रीकोरोमन सुवर्णपदक जाधव ईश्वरी […] - [पालक मेळावा: उच्च माध्यमिक विभाग](https://www.svmrajur.com/parents-meet-higher-secondary/): September 08 & 09, 2025 गुरुवर्य रा.वि.पाटणकर सर्वोदय विद्या मंदिर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात उच्च माध्यमिक विभागाचा (११ वी व १२ वी कला, वाणिज्य व विज्ञान) पालक मेळावा (विद्यार्थी-पालक-शिक्षक सहविचार सभा) मोठ्या उत्साहात पार पडला. दिनांक ८/९/२०२५ रोजी वाणिज्य व विज्ञान शाखेचा व दिनांक ९/९/२०२५ रोजी कला शाखेचा पालक मेळावा घेण्यात आला. या दोन्ही पालक मेळाव्यांना पालकांची उपस्थिती ही लक्षणीय होती. विद्यार्थी गुणवत्ता वाढ व विकास, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक समस्या सोडवणे, घटक चाचणी परीक्षा निकाल, विद्यार्थी उपस्थिती, शाळेतील विविध उपक्रम इत्यादी मुद्द्यांवर या सहविचार सभेमध्ये खेळीमेळीच्या वातावरणात चर्चा झाली. सत्यनिकेतन संस्थेचे सचिव श्री.एम.एल.मुठे यांच्या अध्यक्षतेखाली या सहविचार सभा पार पडल्या. […] - [आंतरराष्ट्रीय साक्षरता दिन २०२५](https://www.svmrajur.com/international-literacy-day/): September 08, 2025 आंतरराष्ट्रीय साक्षरता दिन (World Literacy Day) दरवर्षी ८ सप्टेंबरला संपूर्ण जगभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. जागतिक साक्षरता दिवस साजरा करण्याची सुरुवात १९६६ सालापासून झाली. हा दिवस साजरा करण्याचा मुख्य उद्देश म्हणजे लोकांमध्ये शिक्षणाविषयी जागरूकता निर्माण करणे आणि जगभरातील लोकांचे शिक्षणाकडे लक्ष वेधणे असा आहे. एक साक्षर आणि सक्षम समाज घडविण्यासाठी हा दिवस दरवर्षी साजरा केला जातो. जागतिक साक्षरता दिवसानिमित्ताने जगभर शिक्षणाविषयी जनजागृती केली जाते. २०२५ च्या जागतिक साक्षरता दिनाची थीम ‘डिजिटल युगात साक्षरतेला प्रोत्साहन देणे‘ आहे. आपण प्रगती करत असताना शिक्षण ही डिजिटल प्रगती, समावेशन आणि सुरक्षित भविष्य घडवणारी शक्ती आहे हा यामागचा उद्देश आहे. आज […] - [तालुकास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धा: २०२५](https://www.svmrajur.com/taluka-level-volleyball-competition/): September 7, 2025 तालुकास्तरीय शालेय व्हॉलीबॉल स्पर्धेत सर्वोदयच्या मुला-मुलींनी रचला इतिहास… क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य पुणे, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, अहिल्यानगर व तालुका क्रीडा समिती, अकोले यांचे संयुक्त विद्यमाने अकोले महाविद्यालयात नुकतेच भव्य तालुकास्तरीय शालेय व्हॉलीबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये सत्यनिकेतन संचलित गुरुवर्य रा.वि.पाटणकर सर्वोदय विद्या मंदिर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी (मुले व मुली) निर्विवाद वर्चस्व मिळवित तालुक्याच्या इतिहासात पहिल्यांदाच अशा पराक्रमाची नोंद केली. अतिशय महत्वाच्या समजल्या जाणा-या या स्पर्धेमध्ये विद्यालयाच्या मुलांच्या व मुलींच्या तीनही संघांनी तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावत जिल्हास्तरावर धडक मारली. १.  १४ वर्षे मुले: सर्वोदय Vs सुगाव, फायनल सर्वोदय […] - [शिक्षक दिन २०२५](https://www.svmrajur.com/teachers-day-2025/): September 05, 2025 गुरुवर्य रा.वि.पाटणकर सर्वोदय विद्या मंदिर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात आज ५ सप्टेंबर २०२५ रोजी भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीचे औचित्य साधून शिक्षकदिन उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त विद्यार्थ्यांच्या सक्रिय सहभागातून माध्यमिक व उच्च माध्यमिक दोन्ही विभागामध्ये स्वतंत्ररीत्या हा दिन साजरा करण्यात आला. सकाळच्या सत्रात उच्च माध्यमिक विभागातील विद्यार्थ्यांनी तसेच दुपारच्या सत्रात माध्यमिक विभागातील विद्यार्थ्यांनी प्राचार्य, उपप्राचार्य, शिक्षक व परिचर या भूमिका योग्यरित्या पार पाडून शाळेचे संपूर्ण व्यवस्थापन उत्तमरीत्या हाताळले. याप्रसंगी शेवटी आयोजित कार्यक्रमांची रूपरेषा विद्यार्थ्यांनी आखली. डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन करण्यात आले. विद्यार्थी-शिक्षकांनी आपल्याला आलेले अनुभव व आपली मनोगते […] - [गणेश विसर्जन](https://www.svmrajur.com/ganesh-visarjan/): September 02, 2025 गणरायाला निरोप… “गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या…” असा जयजयकार करत ढोल-ताशांच्या गजरात आणि फुलांची उधळण करत आज सर्वोदयच्या लाडक्या बाप्पाला निरोप देण्यात आला. याप्रसंगी काढण्यात आलेल्या शिस्तबद्ध अशा विसर्जन मिरवणुकीला राजूरकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत ठिकठिकाणी प्रचंड गर्दी केली होती. लेझीम पथक, झांझ पथक, बालकलाकारांचे ढोलपथक व रेकॉर्ड डान्स यांचे सदरीकरण करत विद्यार्थ्यांनी राजूर ग्रामस्थांची मने जिंकली. विसर्जन मिरवणुकीपूर्वी वसतिगृह अधीक्षक श्री.ढगे सर यांनी सपत्नीक पूजा करून गणरायाला विधिवत निरोप दिला. राजूर गावामध्ये विसर्जन मिरवणुकीचे ठिकठिकाणी गणपती मंडळांकडून स्वागत करण्यात आले. विद्यार्थ्यांना खाऊ व पाण्याचे वाटप करण्यात आले. राजूर ग्रामपंचायतीच्या वतीने विद्यालयाचा यथोचित सन्मान करण्यात आला. […] - [तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धा: २०२५](https://www.svmrajur.com/taluka-level-wrestling-competition/): August 29, 2025 ॲड.एम.एन.देशमुख महाविद्यालय संचलित ‘साई कुस्ती आखाडा’ व ‘गुरुवर्य रा.वि.पाटणकर सर्वोदय विद्या मंदिर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय’, राजूर, ता.अकोले यांचे संयुक्त विद्यमाने ॲड.एम.एन.देशमुख महाविद्यालयाच्या सुसज्ज अशा इनडोअर स्टेडीअममध्ये भव्य तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेचे दिनांक २९/०८/२०२५ रोजी आयोजन करण्यात आले. अकोले तालुक्याचे आमदार डॉ. किरणजी लहामटे यांचे शुभहस्ते व योगी केशव बाबा चौधरी यांचे प्रमुख उपस्थितीत या स्पर्धेचे उदघाटन करण्यात आले. सामर्थ्याचे प्रतिक असलेल्या श्री हनुमानजींच्या मूर्तीचे अनावरणही यावेळी प्रमुख अतिथींच्या शुभहस्ते करण्यात आले. याप्रसंगी सत्यनिकेतन संस्थेचे सचिव श्री. एम.एल.मुठे, श्री. एस.टी.येलमामे, श्री. रामशेठ पन्हाळे, श्री. विलासराव नवले, श्री. व्ही.टी.पाबळकर, प्राचार्य श्री. बी.वाय.देशमुख, प्राचार्य श्री. बी.के.बनकर, प्राचार्य श्री. एम.बी.मोखरे, […] - [तालुकास्तरीय बुद्धिबळ स्पर्धा: २०२५](https://www.svmrajur.com/taluka-level-chess-competition/): August 28, 2025 क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य पुणे, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, अहिल्यानगर व तालुका क्रीडा समिती, अकोले यांचे संयुक्त विद्यमाने अकोले महाविद्यालयात नुकतीच भव्य तालुकास्तरीय शालेय बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये सत्यनिकेतन संचलित गुरुवर्य रा.वि.पाटणकर सर्वोदय विद्या मंदिर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी नेत्रदीपक कामगिरी करत सुवर्णपदके पटकावत विद्यालयाचा लौकिक वाढविला. अतिशय महत्वाच्या समजल्या जाणा-या या स्पर्धेमध्ये खालील विद्यार्थ्यांनी सुवर्णपदके पटकावली- १. लहामटे गोरक्ष बाबुराव- इ. १२ वी विज्ञान (१९ वर्षे वयोगट) २. कुंदे चेतन खंडू- इ. ११ वी विज्ञान (१९ वर्षे वयोगट) ३. बारवकर सुदेष्णा संतराम- इ. ७ वी (१४ वर्षे […] - [गणेशोत्सव २०२५](https://www.svmrajur.com/ganeshotsav-2025/): August 27, 2025 गणरायाचे आगमन… भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला गणेश चतुर्थी साजरी केली जाते. अवघ्या देशभरात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या उत्सवाची समाप्ती अनंत चतुर्दशीला होते. ‘गणपती बाप्पा मोरया’ असा जयघोष करत आज गुरुवर्य रा.वि.पाटणकर सर्वोदय विद्या मंदिर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात मोठ्या उत्साहात गणरायाचे आगमन झाले. विद्यालयाच्या प्रवेशद्वारापासून ढोल ताशांच्या गजरात बाप्पाचे स्वागत करण्यात आले. यावेळी विद्यार्थी व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड उत्साह पहावयास मिळाला. रांगोळी व रंगीबेरंगी फुलांनी विद्यालय परिसराची सजावट करण्यात आली होती.  विद्यालयाचे शिक्षक श्री.संतराम बारवकर यांनी सपत्नीक पूजा करून गणरायाचे विधिवत स्वागत केले. श्री.धनंजय लहामगे यांनी या पूजेचे सुश्राव्य असे पौराहित्य […] - [‘राष्ट्रीय अंतराळ दिन’- National Space Day](https://www.svmrajur.com/national-space-day/): August 23, 2025 २३ ऑगस्ट २०२३ रोजी भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने चांद्रयान-३ चे लँडर आणि रोव्हर यशस्वीरित्या चंद्रावर उतरवून एक महत्त्वाचा टप्पा गाठला. या दिवशी भारताने चंद्रावर पाऊल ठेवून मोठा इतिहास रचला होता. भारत चंद्रावर उतरणारा चौथा आणि चंद्राच्या दक्षिण ध्रुवीय प्रदेशाजवळ उतरणारा पहिला देश बनला. सॉफ्ट-लँडिंगनंतर प्रज्ञान रोव्हरची यशस्वी तैनाती करण्यात आली. या कामगिरीची दखल घेत २३ ऑगस्ट हा दिवस भारतात “राष्ट्रीय अंतराळ दिन” म्हणून घोषित केला गेला. आज २३ ऑगस्ट २०२५ रोजी गुरुवर्य रा.वि.पाटणकर सर्वोदय विद्या मंदिर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात ‘राष्ट्रीय अंतराळ दिन’ विविध कार्यक्रम घेऊन साजरा करण्यात आला. एन.सी.सी., स्काऊट व विज्ञान विभागाच्या संयुक्त विद्यमाने […] - [स्वातंत्र्यदिन](https://www.svmrajur.com/independence-day/): August 15, 2025 गुरुवर्य रा.वि.पाटणकर सर्वोदय विद्या मंदिर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात आज १५ ऑगस्ट २०२५ रोजी देशाचा ७९ वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा करण्यात आला. माजी प्राचार्य श्री.एल.पी.पर्बत यांचे हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या देशभक्तीपर गीतांनी उपस्थितांमध्ये नवचैतन्य निर्माण केले. यावेळी NCC, Scout Guide व हरितसेना पथकांचे संचलन लक्ष वेधून घेणारे ठरले. विद्यालयाचे प्राचार्य श्री.बी.के.बनकर यांनी सर्वांचे आभार मानले. सर्व विद्यार्थी, पालक, माजी शिक्षक, माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागातील सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड उत्साह पहावयास मिळाला. ‘हर घर तिरंगा’ या शासनाच्या उपक्रमांतर्गत विद्यालयामध्ये ‘रांगोळी स्पर्धा’ व ‘निबंध स्पर्धा’ घेण्यात आल्या. या स्पर्धांमध्ये विद्यार्थी उत्स्फुर्तपणे सहभागी झाले होते. […] - ['पसायदान परिचय' उपक्रम](https://www.svmrajur.com/pasaydan-parichay-upkram/): August 13, 2025 सन २०२५ हे वर्ष संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज यांचे सप्तशतकोत्तर सुवर्णमहोत्सवी (७५०) जयंतीवर्ष आहे. १५ ऑगस्ट २०२५ रोजी गोकुळअष्टमीस संतश्रेष्ठ श्री ज्ञानदेवांची ७५० वी जयंती असल्याने दि. १४ ऑगस्ट २०२५ रोजी महाराष्ट्रातील प्रत्येक शाळेमध्ये पसायदान म्हणण्यात यावे, असा महाराष्ट्र शासनाने आदेश दिलेला आहे. त्याअनुषंगाने व त्या कार्यक्रमाच्या तयारीचा भाग म्हणून गुरुवर्य रा.वि.पाटणकर सर्वोदय ज्युनिअर कॉलेजमध्ये मराठी विषय शिक्षक प्रा. संतराम बारवकर यांच्या संकल्पनेतून ‘पसायदान परीचय’ हा उपक्रम सुरु करण्यात आला. या माध्यमातून पसायदानातील ९ ओव्यांचा भावार्थ तथा विश्लेषण नऊ दिवस खालील नऊ शिक्षकांनी केले. ओवी क्र.१- उपप्राचार्य श्री. बु-हाडे डी.जी. ओवी क्र.२- श्री. धतुरे ए.एफ. ओवी क्र.३- […] - [रक्षाबंधन उत्सव](https://www.svmrajur.com/rakshabandhan-utsav/): August 12, 2025 गुरुवर्य रा.वि.पाटणकर सर्वोदय विद्या मंदिर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात ‘रक्षाबंधन’ सण उत्साहात साजरा… रक्षाबंधन हा एक महत्वाचा भारतीय सण आहे, जो भाऊ-बहिणीच्या प्रेमळ आणि पवित्र नात्याचे प्रतीक आहे. हा सण श्रावण महिन्याच्या पौर्णिमेला साजरा केला जातो. या दिवशी बहिण आपल्या भावाच्या हातावर राखी बांधते आणि त्याच्या दीर्घायुष्याची आणि सुखाची कामना करते, तर भाऊ आपल्या बहिणीचे रक्षण करण्याचे वचन देतो.  गुरुवर्य रा.वि.पाटणकर सर्वोदय विद्या मंदिर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात ‘रक्षाबंधन’ सण उत्साहात साजरा करण्यात आला. माध्यमिक आणि उच्च माध्यमिक या दोन्ही विभागांमध्ये स्वतंत्ररीत्या रक्षाबंधन उत्सव साजरा करण्यात आला. सकाळच्या सत्रामध्ये उच्च माध्यमिक विभागामध्ये मराठी विषय शिक्षक श्री. एस.आर. […] - [९ ऑगस्ट २०२५: ‘जागतिक आदिवासी दिन’](https://www.svmrajur.com/9-august-2025-jagtik-adivasi-din/): August 09, 2025 गुरुवर्य रा.वि.पाटणकर सर्वोदय विद्या मंदिर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात ‘जागतिक आदिवासी दिन’ उत्साहात साजरा… अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले हा आदिवासीबहुल तालुका. तालुक्याच्या पश्चिमेला असलेल्या कळसुबाई शिखराच्या डोंगरदऱ्यांमध्ये वसलेले राजूर हे गाव शिक्षण व व्यापाराचे केंद्र म्हणून ओळखले जाते. १९५८ पासून राजूर गावातील गुरुवर्य रा.वि.पाटणकर सर्वोदय विद्या मंदिर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय हे आदिवासी समाजासाठी अखंडपणे शैक्षणिक कार्य करत आहे. आज दि. ९ ऑगस्ट २०२५ रोजी गुरुवर्य रा.वि.पाटणकर सर्वोदय विद्या मंदिर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, राजूर, ता. अकोले, जि. अहिल्यानगर या विद्यालयात ‘जागतिक आदिवासी दिन’ उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त आयोजित विविध कार्यक्रमांमध्ये विद्यार्थ्यांनी आपला सक्रिय […] - [इ. ११ वी ऑनलाईन प्रवेश २०२५](https://www.svmrajur.com/rvpatankar-junior-college-std-11-online-admission-2025-26/): शैक्षणिक वर्ष २०२५-२६ पासून संपूर्ण राज्यातील सर्व मान्यता प्राप्त उच्च माध्यमिक शाळा / कनिष्ठ महाविद्यालयातील इयत्ता ११ वीचे प्रवेश ऑनलाईन पध्दतीने व गुणवत्तेनुसार करण्यात येणार आहेत. यापूर्वी महापालिका क्षेत्रातील महाविद्यालयांचा ऑनलाईन प्रवेशामध्ये समावेश होता. यानंतर राज्यातील सर्वच कनिष्ठ महाविद्यालयांसाठी हा नियम लागू करण्यात आला असून आता अकरावीचे प्रवेश ऑनलाईन माध्यमातून होणार आहे. गुरुवर्य रा.वि.पाटणकर सर्वोदय विद्या मंदिर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षामध्ये इ. ११ वी ची प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने राबविण्यात येणार आहे. यासाठी आवश्यक सर्व तयारी शाळा प्रशासनाने पूर्ण केली आहे. दिनांक १९/०५/२०२५ व २०/०५/२०२५ या कालावधीत Demo Admission प्रक्रिया राबविण्यात आली. या माध्यमातून […] ## Pages - [१४ सितंबर: हिंदी दिवस](https://www.svmrajur.com/14-september-hindi-day/): १४ सितंबर: हिंदी दिवस हिंदी दिवस हर साल १४ सितंबर को मनाया जाता है। इसी दिन १९४९ में संविधान सभा ने हिंदी को देवनागरी लिपि में भारत की राजभाषा के रूप में स्वीकार किया था। यह दिन भारत के लिए बहुत महत्वपूर्ण है क्योंकि यह हिंदी भाषा के महत्व और सम्मान को दिखाता है। हिंदी दिवस न केवल हिंदी की प्रतिष्ठा का प्रतीक है, बल्कि यह हमारी सांस्कृतिक एकता का भी चिन्ह है। १९५३ से हर साल यह दिन मनाया जाता है ताकि हिंदी का प्रचार और प्रसार हो सके। हिंदी देश की एकता और सांस्कृतिक धरोहर का प्रतीक मानी […] - [गो. नी. दांडेकर](https://www.svmrajur.com/go-ni-dandekar/): गोपाल नीलकंठ दांडेकर गोपाल नीलकंठ दांडेकर, एक कलंदर फकिरी जगणे. अवघे जीवनच भटकणे झालेले. सहयाद्रीच्या कडेकपाऱ्या, गड-किल्ले यांच्या कुशीत रमलेले, पूर्णेपासून नर्मदेपर्यंत अवघ्या मुलखाचे पाणी चाखलेले, शिवबाच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या हरेक गडावरची धूळ मस्तकी धारण करणारेव्यक्तिमत्त्व. शिवरायांचे पदचिन्ह, हाताचा ठसा व अस्थिशेष आपल्यापाशी आहे, याची श्रीमंती बाळगणारा हा अस्सल मराठी मातीतला माणूस.या साऱ्या भटकण्याचेच अनुभव झाले. या अनुभवांतूनच साहित्य प्रसवले. त्यातून मराठी मातीशी नाते सांगणाऱ्या, छत्रपतींच्या काळात नेणाऱ्या कादंबऱ्या त्यांनी लिहिल्या. अखंड भ्रमंतीतून आलेले आगळेवेगळे अनुभवच शब्दरूप घेऊन आले. गोनीदां ऊर्फ अप्पांचा जन्म ८ जुलै १९१६ रोजी अमरावती जिल्ह्यातील अचलपूर तालुक्यातील परतवाडा येथे झाला. वयाच्या अवघ्या तेराव्या वर्षी त्यांनी घर […] - [कमल रणदिवे: कर्करोग संशोधनात क्रांती घडवणारी महिला](https://www.svmrajur.com/kamal-randive-cancer-research/): चित्रपटांमध्ये काम करणाऱ्यांव्यतिरिक्त तुम्ही कधी इतर नायिका ओळखल्या आहेत का? कमल रणदिवे या कर्करोगाच्या सुरुवातीच्या संशोधनातील भारतातील प्रणेत्यांपैकी एक होत्या. त्या एक भारतीय जीवशास्त्रज्ञ होत्या ज्यांच्या कर्करोग संशोधनातील कामामुळे त्यांना आंतरराष्ट्रीय ख्याती मिळाली. स्तनाचा कर्करोग आणि आनुवंशिकता यांच्यातील संबंध मांडणारी ती देशातील पहिली होती. पद्मभूषण विजेते आणि विज्ञानाचे उत्साही विद्यार्थी कमल रणदिवे यांनी केवळ इंडियन कॅन्सर रिसर्च सेंटर (ICRC) सारख्या प्रसिद्ध संस्थेचे नेतृत्व केले नाही तर भारतातील पहिली टिश्यू कल्चर लॅब देखील स्थापन केली. तिच्या वडिलांची इच्छा होती की तिने डॉक्टर व्हावे, परंतु तिच्या मनात तिच्या इतर योजना आणि आवड होती कारण नियतीने तिच्यासाठी काहीतरी वेगळेच योजले होते. तिचे जीवन […] - [Staff](https://www.svmrajur.com/staff/): Secondary Section Shri. Bankar B.K. Shri. Malunjkar G.B. Shri. Deshmukh K.V. Shri. Ghane S.V. Shri. Pagare D.B. Shri. Arote J.R. Shri. Hekare S.H. Shri. Pachpute D.M. Sou. Sanap R.P. Smt. Walunj K.S. Shri. Shinde G.L. Smt. Pichad M.N. Shri. Dinde M.S. Shri. Pande R.P. Shri. Shinde N.K. Shri. Deshmukh S.R. Shri. Benke K.S. Sou. Sonawane V.K. Sou. Kolhal S.A. Sou. Rathod R.R. Shri. Lahamage D.B. Shri. Ghule S.D. Miss. Kharate P.T. Miss. Bhangare G.D. Mrs. Khade K.D. Sou. Wayal M.T. Mrs. Mengal K.S. Shri. Karvande N.K. Shri. Ughade N.D. Higher Secondary Section Shri. Burhade D.G. Shri. Dhature A.F. Shri. Shendage […] - [Library](https://www.svmrajur.com/library/): Shri. S.D. Ghule Librarian GO TO HOME PAGE - [Departments](https://www.svmrajur.com/departments/): २०२५-२६ उच्च माध्यमिक विभाग: अ.नं. विभाग  विभाग प्रमुख १ परीक्षा विभाग श्री. तुपविहिरे एस.व्ही. श्री. आहेर एस.जे. २ कला मंडळ श्री. घिगे बी.एस. श्री. धतुरे ए.एफ. सौ. सावंत बी.व्ही. ३ वाङमय मंडळ श्री. शेंडगे आर.एन. श्री. बारवकर एस.आर. सौ. देशमुख ए.डी. ४ क्रीडा विभाग श्री. तारू व्ही.टी. ५ माहिती-तंत्रज्ञान कु. सोनार के.एस. कु. मदगे एन.व्ही. ६ शिक्षक-पालक संघ श्री. कोटकर एस.बी. श्री. जोरवर व्ही.एम. ७ शिक्षक प्रतिनिधी श्री. तारू व्ही.टी. ८ ऑनलाईन प्रणाली  श्री. तळेकर ए.डी. श्री. आहेर एस.जे. कु. सोनार के.एस. ९ शैक्षणिक सहल श्री. मढवई आर.आर. श्री. जोरवर व्ही.एम. श्री. शेंडगे आर.एन. १० विद्यार्थी पासेस  श्री. घिगे बी.एस. […] - [Administration](https://www.svmrajur.com/administration/): मुख्याध्यापक/प्राचार्य सूची अ.नं. नाव सेवाकाल १ श्री. सी.एस. वालझाडे ०९-०६-१९५८   ते   ०७-०६-१९५८ २ श्रीमती शकुंतला मोघे ०८-०७-१९५९   ते   ०३-०५-१९६० ३ श्री. पी.बी. चिटणीस ०१-०६-१९६०   ते   १२-०६-१९६१ ४ श्री. एस.के. भोमे १३-०६-१९६१   ते   ३०-०७-१९६१ ५ श्री. सी.एस. वालझाडे ०१-०८-१९६१   ते   ३०-०९-१९६१ ६ श्री. एस.बी. हारोलीकर ०१-१०-१९६१   ते   ३१-०३-१९६२ ७ श्री. सी.एस. वालझाडे ०१-०६-१९६२   ते   ३०-०६-१९६२ ८ श्री. व्ही.एन. मोघे ०१-०७-१९६२   ते   ०३-०८-१९६२ ९ श्री. जी.व्ही. वाडेकर ०४-०८-१९६२   ते   ०८-०७-१९६३ १० सौ. एस.सी. शिरसाव  ०९-०७-१९६३   ते   २९-०६-१९६४ ११ श्री. सी. शिरसाव  ३०-०६-१९६४   ते   १८-०९-१९६४ १२ श्री. जी.व्ही. वाडेकर १९-०९-१९६४   ते   ०६-०८-१९६४ १३ श्री. एल.डी. शिंदे ०६-०८-१९६४   ते   १०-०६-१९७२ १४ श्री. एन.के. अनगोळकर […] - [Examination](https://www.svmrajur.com/examination/): परीक्षार्थी विद्यार्थ्यांसाठी सूचना इयत्ता ११ वी ची २५ गुणांची घटक चाचणी क्र.२ व इयत्ता १२ वी ची ७०/८० गुणांची पूर्व परीक्षा सोमवार दिनांक ०५/०१/२०२६ पासून सुरु होत आहे.  विद्यार्थ्यांनी आपला बैठक क्रमांक लक्षात ठेवावा. बैठक क्रमांक बदलत नसतो. संपूर्ण वर्षभरासाठी तोच बैठक क्रमांक असतो. हजेरी क्रमांक व परीक्षा बैठक क्रमांक हे वेगळे असतात. परीक्षेसाठी विद्यार्थ्यांनी गैरहजर राहू नये. परीक्षेसाठी सर्व विद्यार्थ्यांनी गणवेशातच असावे. ओळखपत्र आवश्यक आहे. कुठल्याही प्रकारची कॉपी अथवा गैरप्रकार करणाऱ्या विद्यार्थ्यांवर योग्य ती कारवाई करण्यात येईल. विद्यार्थ्यांनी आपल्या सोबत मोबाईल फोन, स्मार्ट वॉच अथवा कुठल्याही प्रकारचे इलेक्ट्रॉनिक साहित्य बाळगू नये. पर्यवेक्षकांच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे.  तुमच्या प्रत्येक हालचालीवर […] - [About SVM](https://www.svmrajur.com/about/): School Name Guruvarya R.V.Patankar Sarvodaya Vidya Mandir Secondary & Higher Secondary School Institute Name ‘Satyaniketan’ President: Adv. M.N.Deshmukh Secretary: Shri. M.L.Muthe Treasurer: Shri. V.I.Madan School Address Rajur, Tal- Akole, Dist- Ahilyanagar, Maharashtra State, PIN- 422604 Tele. No. 02424-251028 Establishment May 1958 Regi. No. B4 AH, Date- 9 May 1958 UDISE Code 27260114008 Pay Unit No. 1107 School Index HSC J 12.01.002 School Index SSC S 12.01.002 Email svmrajur@gmail.com Website www.svmrajur.com Principal Shri. B.K.Bankar (M.Sc.,M.A.,B.Ed.Phy.,DSM) Mob: 9422266315 Vice-Principal (Jr. College) Shri. D.G.Burhade (M.A. English M.Ed.,DSM) Mob: 9921022163, 9421330500 Supervisor Shri. G.B.Malunjkar (M.A. English B.Ed.,DSM) Mob: 9325452051 Satyaniketan’s President Shri. M.N. Deshmukh […] - [Home](https://www.svmrajur.com/):   About School   Administration   Examination   Staff   Departments   Library Latest School Events माजी विद्यार्थी मेळावा: १९९९-२००० बॅच Read More… श्रीहर्षा बिडवे: तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन २०२५  Read More… वार्षिक स्नेहसंमेलन २०२५ Read More… श्री.एस.आर.देशमुख: NCC Award Read More… आरोग्य तपासणी शिबीर Read More… अग्निसुरक्षा (फायर सेफ्टी) मार्गदर्शन Read More… १ डिसेंबर: जागतिक एड्स दिन Read More… शैक्षणिक सहल २०२५: उच्च माध्यमिक विभाग Read More… कायदेविषयक जागरूकता शिबिर Read More… २६ नोव्हेंबर: संविधान दिन Read More… संस्थांतर्गत गणित-विज्ञान प्रदर्शन २०२५ Read More… वार्षिक क्रीडा महोत्सव: माध्यमिक Read More… वार्षिक क्रीडा महोत्सव: उच्च माध्यमिक Read More… महाविस्तार AI ॲप […] - [Contacts](https://www.svmrajur.com/contacts/): Guruvarya R.V.Patankar Sarvodaya Vidya Mandir Secondary & Higher Secondary School Address: At/Post- Rajur, Tal- Akole, Dist- Ahilyanagar, Maharashtra. PIN- 422604 Tele: 02424-251028 Mobile: 9422266315 (Principal), 9921022163 (Vice-Principal), 9325452051 (Supervisor) Email: svmrajur@gmail.com Website: www.svmrajur.com School Timings: High. Secondary: 7.30 am – 12.50 pm (Monday-Friday) 11.20 am – 2.30 pm (Saturday) Secondary: 12.20 pm – 5.00 pm (Monday-Friday) 7.30 am – 11.10 am (Saturday) Office Timing: 11.00 am – 5.00 pm (Monday-Saturday) Location: About School - [Privacy Policy](https://www.svmrajur.com/privacy-policy/): Who we are Suggested text: Our website address is: http://svmrajur.com. Comments Suggested text: When visitors leave comments on the site we collect the data shown in the comments form, and also the visitor’s IP address and browser user agent string to help spam detection. An anonymized string created from your email address (also called a hash) may be provided to the Gravatar service to see if you are using it. The Gravatar service privacy policy is available here: https://automattic.com/privacy/. After approval of your comment, your profile picture is visible to the public in the context of your comment. Media Suggested […] [comment]: # (Generated by Hostinger Tools Plugin)