November 14, 2025


देशभरात दरवर्षी १४ नोव्हेंबर हा दिवस स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जन्मदिनानिमित्त बालदिन म्हणून साजरा केला जातो. नेहरुजींना लहान मुलांबद्दल खूप प्रेम होते. मुले त्यांना प्रेमाने ‘चाचा नेहरू’ म्हणत असत. बालदिन हा केवळ मुलांचा सण नसून देशाच्या भविष्याचा उत्सव आहे.

गुरुवर्य रा.वि.पाटणकर सर्वोदय विद्या मंदिर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात आज १४ नोव्हेंबर रोजी पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीसोबतच बालदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी आयोजित कार्यक्रमामध्ये पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. ज्येष्ठ शिक्षक श्री.दीपक पाचपुते यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना नेहरूजींविषयी अतिशय अभ्यासपूर्ण माहिती दिली.

यानिमित्त विद्यार्थ्यांसाठी मनोरंजनात्मक खेळांचे आयोजन करण्यात आले. यामध्ये लिंबू-चमचा, क्रॉस-रनिंग, संगीत-खुर्ची, सॅक-रनिंग अशा विविध खेळांच्या इयत्ता पाचवी ते दहावीतील विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा घेण्यात आल्या. विद्यार्थ्यांनी या खेळांमध्ये उत्स्फूर्तपणे सहभाग घेऊन आज बालदिनाचा मनमुराद आनंद लुटला. प्रत्येक स्पर्धेत यशस्वी विदयार्थ्यांचे पेन व चॉकलेट देऊन कौतुक करण्यात आले.

ज्येष्ठ शिक्षक श्री.किशोर देशमुख यांनी गायलेल्या ‘हसा मुलांनो हसा’, कला शिक्षक श्री.आर.पी.पांडे यांनी केलेल्या अप्रतिम अशा फलक लेखनाने व ज्येष्ठ शिक्षक श्री.धनंजय पगारे यांनी केलेल्या सुश्राव्य अशा समालोचनाने सर्वांची मने जिंकली.

विद्यालयाचे क्रीडा शिक्षक श्री.जे.आर.आरोटे यांनी विद्यार्थ्यांना उत्कृष्ठ मार्गदर्शन केले. ज्येष्ठ शिक्षक श्री.एस.आर. देशमुख, श्री.एन.के. शिंदे, श्री.धनंजय पगारे, श्री.धनंजय लहामगे तसेच सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी खूप परिश्रम घेतले. विद्यालयाचे प्राचार्य श्री.बी.के.बनकर, उपप्राचार्य श्री.डी.जी.बु-हाडे व पर्यवेक्षक श्री.जी.बी.मालुंजकर यांनी बालदिनानिमित्त विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. विभागप्रमुख श्रीमती के.एस.वाळुंज व श्री.के.एस.बेणके यांनी या कार्यक्रमाचे अतिशय सुंदर नियोजन केले.

GO TO HOME PAGE