January 26, 2026


गुरुवर्य रा.वि.पाटणकर सर्वोदय विद्या मंदिर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये आज भारतीय प्रजासत्ताक दिनाचा ७७ वा वर्धापन दिन सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला. विद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक श्री.किशोर देशमुख यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. याप्रसंगी राष्ट्रगीत, ध्वजगीत, महाराष्ट्र गीत व स्काऊट गीताचे सामुहिक सुरेल गायन करण्यात आले. NCC, स्काऊट गाईड व राष्ट्रीय हरित सेना यांच्या पथकांनी अतिशय सुरेख संचलन सादर केले.

या कार्यक्रमासाठी सत्यनिकेतन संस्थेचे संचालक श्री.विजय पवार, श्री.रामशेठ पन्हाळे, श्री.विलास पाबळकर, श्री.रमाकांत डेरे, प्राचार्य श्री.भाऊसाहेब बनकर, उपप्राचार्य श्री.दिपक बुऱ्हाडे, पर्यवेक्षक श्री.गोरक्ष मालुंजकर, श्री.लहानू परबत, श्री.मनोहर लेंडे, श्री.सदाशिव गिरी, श्रीमती रजनी टिभे यांच्यासह माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, माजी शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

GO TO HOME PAGEDownload School PDF