November 26, 2025


संविधान दिन किंवा राष्ट्रीय विधी दिन हा २६ नोव्हेंबर रोजी भारतभर साजरा केला जातो. २९ ऑगस्ट १९४७ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संविधानाच्या निर्मितीसाठी मसूदा समिती स्थापन झाली. अनेक बैठका व चर्चासत्रांनंतर या समितीने सादर केलेला अंतिम मसुदा २६ नोव्हेंबर १९४९ रोजी संविधान सभेने स्वीकारला. त्यामुळे २६ नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा केला जातो. भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सन्मानार्थ भारतीय संविधान दिन साजरा केला जातो. संविधानाबाबत जनजगृती करण्यासाठी आणि आंबेडकरांच्या विचारांचा प्रसार करण्याच्या उद्देशाने देशभरात २६ नोव्हेंबर हा दिवस ‘संविधान दिन’ म्हणून साजरा केला जातो.

गुरुवर्य रा.वि.पाटणकर सर्वोदय विद्या मंदिर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये आज विविध उपक्रमांसह ‘संविधान दिन’ साजरा करण्यात आला. सकाळच्या व दुपारच्या दोन्ही सत्रांमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करून संविधानाप्रती विद्यार्थ्यांची जवळीक निर्माण केली गेली.

सकाळच्या सत्रामध्ये ज्येष्ठ वक्ते व शाहीर प्रा.तुळशीराम जाधव यांच्या संगीत मैफिलीने व संविधान गीतांनी उपस्थितांची मने जिंकली. अतिशय सुरेल स्वरामध्ये संगीत वाद्यांच्या सहाय्याने त्यांनी विद्यार्थ्यांमध्ये नवचैतन्य निर्माण केले. याप्रसंगी सत्यनिकेतन संस्थेचे ज्येष्ठ संचालक श्री.विजय पवार, प्राचार्य श्री.बी.के.बनकर, मुख्याध्यापक श्री.संजय व्यवहारे, श्री.भाऊसाहेब डोंगरे, उपप्राचार्य श्री.डी.जी.बुऱ्हाडे यांच्यासह उच्च माध्यमिक विद्यालयाचे सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व संविधानाची प्रतिमा असलेल्या ‘I Love Constitution’ या आकर्षक अशा Selfie Point चे मान्यवरांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले. सर्व विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी या Selfie Point वर जाऊन Selfie काढण्याचा आनंद लुटला व संविधानाप्रती आपली एकरूपता प्रकट केली.

दुपारच्या सत्रामध्ये माध्यमिक विभागाने विविध उपक्रमांनी संविधान साजरा केला. कला शिक्षक श्री.आर.पी.पांडे यांच्या मार्गदर्शनाखाली संविधानावर आधारित चित्रकला व पोस्टर स्पर्धेचे यशस्वी आयोजित करण्यात आले. ज्येष्ठ शिक्षक श्री.धनंजय पगारे यांच्या मार्गदर्शनाखाली संविधानावर आधारित प्रश्नमंजुषा स्पर्धा घेण्यात आली. विद्यार्थ्यांना भारतीय संविधान, राज्यघटना तसेच भारतीय संसद व प्रशासन यांसंबंधी विविध ज्ञानवर्धक प्रश्न विचारण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड उत्साह पहावयास मिळाला. विद्यार्थ्यांनी या स्पर्धेमध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. कार्यक्रमाची सुरुवात संविधानाच्या प्रस्ताविकेच्या वाचनाने करण्यात आली. या माध्यमातून विद्यार्थ्यांना भारतीय संविधानाचे महत्त्व, मूलभूत अधिकार, कर्तव्ये व राज्यघटनेबद्दल अधिक माहिती मिळाली.

गीतगायन

Selfie Point

प्रश्नमंजुषा स्पर्धा

GO TO HOME PAGE