February 28, 2026
भारतात दरवर्षी २८ फेब्रुवारी हा दिवस ‘राष्ट्रीय विज्ञान दिन’ म्हणून साजरा केला जातो. महान भारतीय शास्त्रज्ञ सर सी.व्ही.रमन यांनी १९२८ मध्ये याच दिवशी ‘रमन इफेक्ट’ (Raman Effect) या महत्त्वपूर्ण वैज्ञानिक घटनेचा शोध लावला होता. त्यांच्या या कार्यासाठी त्यांना १९३० मध्ये भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिक मिळाले. विज्ञान क्षेत्रामध्ये नोबेल मिळवणारे ते पहिले भारतीय आणि आशियाई व्यक्ती ठरले. या ऐतिहासिक घटनेची आठवण म्हणून आणि समाजात वैज्ञानिक दृष्टिकोन वाढवण्यासाठी भारत सरकारने १९८६ मध्ये २८ फेब्रुवारीला ‘राष्ट्रीय विज्ञान दिन’ म्हणून घोषित केले. या दिवशी शाळा, महाविद्यालये आणि विज्ञान संस्थांमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.
गुरुवर्य रा.वि.पाटणकर सर्वोदय विद्या मंदिर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये ‘राष्ट्रीय विज्ञान दिन’ विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. ज्येष्ठ विज्ञान शिक्षक श्री.रविंद्र मढवई यांच्या नियोजनाखाली शासन आदेशानुसार विविध उपक्रमांचे यशस्वी आयोजन करण्यात आले.
१. विज्ञान-सामान्यज्ञान स्पर्धा
२. वक्तृत्व स्पर्धा
३. चर्चासत्र/परिसंवाद
४. पोस्टर सादरीकरण
विज्ञानाबद्दल विद्यार्थ्यांमध्ये कुतूहल निर्माण करणे आणि त्यांच्यातील सुप्त गुणांना वाव देणे हा विज्ञान दिनानिमित्त विविध स्पर्धा आयोजित करण्याचा मुख्य उद्देश होता. विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन आणि तर्कशुद्ध विचार करण्याची क्षमता विकसित होऊन दैनंदिन जीवनातील समस्यांकडे विज्ञानाच्या नजरेतून पाहण्याची त्यांना सवय लागावी हादेखील यामागचा उद्देश होता.
विद्यालयाचे प्राचार्य श्री.बी.के.बनकर, उपप्राचार्य श्री.डी.जी.बुऱ्हाडे, पर्यवेक्षक श्री.जी.बी. मालुंजकर व सर्व विज्ञान विषय-शिक्षकांनी अथक परिश्रम घेऊन या दिनाचे यशस्वी आयोजन केले.

विज्ञान-सामान्यज्ञान स्पर्धा
निकाल:
प्रथम– तळपाडे प्रेम भीमा
द्वितीय– कु. येलमामे प्रांजल अशोक
तृतीय– कोंडार किरण दिलीप


वक्तृत्व/भाषण स्पर्धा
निकाल:
प्रथम– कु. कडू वैष्णवी राजू
द्वितीय– कु. पाल दिया जीतन
तृतीय– लहामगे आर्यन मदन



चर्चासत्र/परिसंवाद
निकाल:
प्रथम– कु. देठे अमृता प्रविण
द्वितीय– बांडे अविनाश बुधा
तृतीय– सदगीर सृष्टी शरद


पोस्टर सादरीकरण
निकाल:
प्रथम– वायाळ दिपक संजय
द्वितीय– केकरे पांडुरंग तुकाराम
तृतीय– कु. देठे अमृता प्रवीण










