January 30, 2026


३० जानेवारी १९४८ रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची हत्या करण्यात आली. महात्मा गांधीजींच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्याप्रती आदरभाव व्यक्त करण्यासाठी देशभर ३० जानेवारी हा दिवस राष्ट्रीय हुतात्मा दिन म्हणून पाळला जातो. महात्मा गांधी आणि स्वातंत्र्यलढ्यातील सर्व हुतात्म्यांना आदरांजली वाहण्यासाठी सकाळी ११.०० वाजता दोन मिनिटांचे मौन पाळून देशवासियांमध्ये देशप्रेम आणि बलिदानाची जाणीव निर्माण करून दिली जाते.

गुरुवर्य रा.वि.पाटणकर सर्वोदय विद्या मंदिर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये आज राष्ट्रीय हुतात्मा दिन संपन्न झाला. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या महान कार्याचे स्मरण करण्यासाठी आज उच्च माध्यमिक विभागामध्ये बापूजींना आदरांजली वाहण्यात आली. सकाळी ठीक ११.०० वाजता दोन मिनिट स्तब्धता पळून गांधीजींचे स्मरण करण्यात आले.

याप्रसंगी आयोजित कार्यक्रमामध्ये विद्यालयाचे प्राचार्य श्री.भाऊसाहेब बनकर, उपप्राचार्य श्री.दिपक बुऱ्हाडे, ज्येष्ठ शिक्षिका श्रीमती बीना सावंत, वसतिगृह अधीक्षिका श्रीमती श्रद्धा जोशी तसेच उच्च माध्यमिक विभागातील सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी व इयत्ता ११ वी चे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपप्राचार्य श्री.दिपक बुऱ्हाडे यांनी या कार्यक्रमाची रूपरेषा विषद केली. मराठी विषय-शिक्षक श्री.संतराम बारवकर यांनी राष्ट्रीय हुतात्मा दिनाचे महत्व व त्याचबरोबर गांधीजींच्या महान कार्याचा उल्लेख केला. सावित्रीबाई मदन कन्या निवासच्या मुलींनी सुश्राव्य अशा सर्वधर्मीय प्रार्थनेचे गायन केले.

GO TO HOME PAGE