गुरुवर्य रा.वि.पाटणकर सर्वोदय विद्या मंदिर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात ‘जागतिक आदिवासी दिन’ उत्साहात साजरा…
अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले हा आदिवासीबहुल तालुका. तालुक्याच्या पश्चिमेला असलेल्या कळसुबाई शिखराच्या डोंगरदऱ्यांमध्ये वसलेले राजूर हे गाव शिक्षण व व्यापाराचे केंद्र म्हणून ओळखले जाते. १९५८ पासून राजूर गावातील गुरुवर्य रा.वि.पाटणकर सर्वोदय विद्या मंदिर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय हे आदिवासी समाजासाठी अखंडपणे शैक्षणिक कार्य करत आहे.
आज दि. ९ ऑगस्ट २०२५ रोजी गुरुवर्य रा.वि.पाटणकर सर्वोदय विद्या मंदिर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, राजूर, ता. अकोले, जि. अहिल्यानगर या विद्यालयात ‘जागतिक आदिवासी दिन’ उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त आयोजित विविध कार्यक्रमांमध्ये विद्यार्थ्यांनी आपला सक्रिय सहभाग नोंदवला. या कार्यक्रमात विद्यार्थी आणि कर्मचारी दोघांचाही उत्साही सहभाग दिसून आला. अतिशय आनंददायी वातावरणात राजूर गावातून मिरवणूक काढण्यात आली. ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती दर्शवत बाळगोपाळांचे कौतुक केले.
विद्यार्थ्यांनी पारंपारिक आदिवासी पोशाख परिधान केला आणि विविध आदिवासी समाजांच्या रीतिरिवाजांचे प्रदर्शन करत आदिवासी समुदायांचे महत्त्व अधोरेखित करणारे विविध नृत्यप्रकार सादर केले. लेझीम पथक, झांझ पथक, आदिवासी नृत्य व रेकॉर्ड डान्स यांचे सदरीकरण करत विद्यार्थ्यांनी आदिवासी समाजाप्रती आपली एकरूपता प्रकट केली.
विद्यालयाचे प्राचार्य श्री. बी.के.बनकर, उपप्राचार्य श्री. डी.जी.बु-हाडे व पर्यवेक्षक श्री. जी.बी.मालुंजकर यांच्या नेतृत्वाखाली विभागप्रमुख श्री. शिंदे एन.के. व श्री. घिगे बी.एस. यांनी कार्यक्रमाचे प्रभावी नियोजन केले. त्याचबरोबर सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेऊन कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पाडला.
PHOTO GALLERY
VIDEO GALLERY