September 7, 2025
तालुकास्तरीय शालेय व्हॉलीबॉल स्पर्धेत सर्वोदयच्या मुला-मुलींनी रचला इतिहास…
क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य पुणे, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, अहिल्यानगर व तालुका क्रीडा समिती, अकोले यांचे संयुक्त विद्यमाने अकोले महाविद्यालयात नुकतेच भव्य तालुकास्तरीय शालेय व्हॉलीबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
या स्पर्धेमध्ये सत्यनिकेतन संचलित गुरुवर्य रा.वि.पाटणकर सर्वोदय विद्या मंदिर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी (मुले व मुली) निर्विवाद वर्चस्व मिळवित तालुक्याच्या इतिहासात पहिल्यांदाच अशा पराक्रमाची नोंद केली. अतिशय महत्वाच्या समजल्या जाणा-या या स्पर्धेमध्ये विद्यालयाच्या मुलांच्या व मुलींच्या तीनही संघांनी तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावत जिल्हास्तरावर धडक मारली.

| १. १४ वर्षे मुले: सर्वोदय Vs सुगाव, फायनल सर्वोदय विजयी २. १७ वर्षे मुले: सर्वोदय Vs अभिनव अकोले, फायनल सर्वोदय विजयी ३. १९ वर्षे मुले: सर्वोदय Vs एकलव्य मवेशी, फायनल सर्वोदय विजयी |

| १. १४ वर्षे मुली: सर्वोदय Vs सुगाव, फायनल सर्वोदय विजयी २. १७ वर्षे मुली: सर्वोदय Vs सुगाव, फायनल सर्वोदय विजयी ३. १९ वर्षे मुली: सर्वोदय Vs अकोले कॉलेज, फायनल सर्वोदय विजयी |
या सर्व स्पर्धकांनी तालुकास्तरावर नेत्रदीपक यश मिळवून त्यांची जिल्हा स्तरावर निवड झाली आहे. राजूरसारख्या आदिवासी भागातील विद्यार्थ्यांनी व्हॉलीबॉल खेळामध्ये अप्रतिम कामगिरी केल्याबद्दल सर्वांचे सर्वत्र कौतुक होत आहे. या खेळाडूंना क्रीडा शिक्षक श्री.तारू व्ही.टी. व श्री.आरोटे जे.आर. या दोघांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. जिल्हा व तालुक्यातील उपस्थित विविध मान्यवरांच्या हस्ते यशस्वी विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यात आले.
सत्यनिकेतन संस्थेचे अध्यक्ष ॲड.एम.एन.देशमुख, सचिव श्री.एम.एल.मुठे व कोषाध्यक्ष श्री.विवेकजी मदन यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. विद्यालयाचे प्राचार्य श्री.बनकर बी.के., उपप्राचार्य श्री.बु-हाडे डी.जी. व पर्यवेक्षक श्री.मालुंजकर जी.बी. यांनी यशस्वी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. सत्यनिकेतन संस्थेच्या वतीने यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला व त्यांना भावी कामगीरीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
















