September 11, 2025


तालुक्यापाठोपाठ सर्वोदयच्या विद्यार्थ्यांचा जिल्ह्यातही डंका….


क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य पुणे, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, अहिल्यानगर जिल्हा कुस्ती संघ व कोपरगाव तालुका क्रीडा समिती यांचे संयुक्त विद्यमाने कोपरगाव येथे भव्य जिल्हास्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या जिल्हास्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेत सत्यनिकेतन संचलित गुरुवर्य रा.वि.पाटणकर सर्वोदय विद्या मंदिर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील चार कुस्ती मल्लांनी सुवर्णपदक व दोन कुस्ती मल्लांनी रौप्यपदक पटकावले. या सर्व विद्यार्थ्यांची विभागीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
देशमुख अधिराज राधाकिसन ४५ किलो सुवर्णपदक
बोराडे जयेश गणेश ४८ किलो सुवर्णपदक
लोहरे निलेश गणपत ४८ किलो ग्रीकोरोमन सुवर्णपदक
जाधव ईश्वरी पोपट ४९ किलो सुवर्णपदक
मुर्तडक सूरज संजय ५५ किलो रौप्यपदक
तनपुरे श्रावणी अमोल ५१ किलो रौप्यपदक

सत्यनिकेतन संस्थेचे अध्यक्ष ॲड.एम.एन.देशमुख, सचिव श्री.एम.एल.मुठे, कोषाध्यक्ष श्री.विवेकजी मदन व प्राचार्य श्री.बी.के.बनकर यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. साई कुस्ती आखाड्याचे संचालक श्री. तान्हाजी नरके यांच्या अथक परिश्रमातून जिल्हापातळीवर विद्यालयाला हे यश प्राप्त झाले आहे. क्रीडा शिक्षक श्री.तारू व्ही.टी. व श्री.आरोटे जे.आर. यांचेही मोलाचे मार्गदर्शन या विद्यार्थ्यांना लाभले.