



विद्यार्थ्यांसाठी सूचना
- इयत्ता ११ वी व १२ वी ची प्रथम सत्र परीक्षा ही ९/१०/२०२५ ते १५/१०/२०२५ या कालावधीत होत आहे.
- बैठक व्यवस्था काच फलकामध्ये लावलेली आहे.
- विद्यार्थ्यांनी आपला बैठक क्रमांक लक्षात ठेवावा. बैठक क्रमांक बदलत नसतो. संपूर्ण वर्षभरासाठी तोच बैठक क्रमांक असतो. हजेरी क्रमांक व परीक्षा बैठक क्रमांक हे वेगळे असतात.
- प्रथम सत्र परीक्षा ही ५० गुणांची असून वेळ २.३० तास असेल.
- पेपरची वेळ ८.३० ते ११.०० असून पूर्ण वेळ पेपर सोडवायचा आहे. मधूनच कुणालाही सोडले जाणार नाही.
- विद्यार्थ्यांनी ८.२० वाजता वर्गामध्ये प्रवेश करायचा आहे.
- दररोज एकच पेपर असेल.
- परीक्षेसाठी विद्यार्थ्यांनी गैरहजर राहू नये.
- परीक्षेसाठी सर्व विद्यार्थ्यांनी गणवेशातच असावे.
- ओळखपत्र आवश्यक आहे.
- कुठल्याही प्रकारची कॉपी अथवा गैरप्रकार करणाऱ्या विद्यार्थ्यांवर योग्य ती कारवाई करण्यात येईल.
- विद्यार्थ्यांनी आपल्या सोबत मोबाईल फोन, स्मार्ट वॉच अथवा कुठल्याही प्रकारचे इलेक्ट्रॉनिक साहित्य बाळगू नये.
- पर्यवेक्षकांच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे.
- तुमच्या प्रत्येक हालचालीवर पर्यावेक्षकांबरोबरच CCTV चे देखील लक्ष असणार आहे.


| Department of Examination |
| Higher Secondary | Shri. Tupvihire S.V. |
| Shri. Aher S.J. | |
| Secondary | Shri. Dinde M.S. |
| Shri. Shinde N.K. |






