November 7, 2025
बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी १८७५ साली लिहिलेल्या “वंदे मातरम” या गीतास स्वातंत्र्यलढ्यात तसेच स्वातंत्र्योत्तर कालखंडातही अनन्यसाधारण महत्व प्राप्त आहे. ‘आनंदमठ’ या कादंबरीतील हे गीत भारतमातेच्या स्तुतीचे प्रतिक असून स्वातंत्र्यलढ्यातील असंख्य क्रांतीकारकांना प्रेराणादाई ठरलेले आहे. या गीतास आज ७ नोव्हेंबर २०२५ रोजी १५० वर्षे पूर्ण झाले.
गुरुवर्य रा.वि.पाटणकर सर्वोदय विद्या मंदिर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये आज माध्यमिक व उच्च माध्यमिक या दोन्ही विभागामध्ये “वंदे मातरम” या गीताचा १५० वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. याप्रसंगी आयोजित कार्यक्रमामध्ये ज्येष्ठ शिक्षक श्री.किशोर देशमुख यांच्यासह सर्व विद्यार्थी व शिक्षकांनी “वंदे मातरम” गीताचे अतिशय सुरेल असे सामुहिक गायन केले.
याप्रसंगी सत्यनिकेतन संस्थेचे संचालक श्री.विजय पवार उपस्थित होते. आपल्या मनोगतामध्ये श्री.विजय पवार यांनी “वंदे मातरम” गीताचे महत्व विषद केले. प्राचार्य श्री.बी.के.बनकर, उपप्राचार्य श्री.डी.जी.बु-हाडे व ज्येष्ठ शिक्षक श्री.दीपक पाचपुते यांनीही “वंदे मातरम” व भारतीय स्वातंत्र्यलढा यासंदर्भात विद्यार्थ्यांना माहिती दिली. या प्रसंगी दोन्ही विभागांचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

















