November 6 & 7, 2025
क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय रायगड-अलिबाग आयोजित ६ ते ७ नोव्हेंबर २०२५ रोजी पार पडलेल्या राज्यस्तरीय शालेय कुस्ती क्रीडा स्पर्धेमध्ये ४८ किलो वजनी गटामध्ये सत्यनिकेतन संचलित गुरुवर्य रा.वि.पाटणकर सर्वोदय विद्या मंदिर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थी जयेश गणेश बोऱ्हाडे याने नेत्रदीपक कामगिरी करत कांस्यपदक मिळविले.
राजूरसारख्या आदिवासी भागातील इयत्ता ११ वी वाणिज्य मध्ये शिकणाऱ्या जयेशने कुस्तीमध्ये अप्रतिम कामगिरी केल्याबद्दल सर्वत्र त्याचे कौतुक होत आहे. सत्यनिकेतन संस्थेचे अध्यक्ष ॲड.एम.एन.देशमुख, सचिव श्री.एम.एल.मुठे, कोषाध्यक्ष श्री.विवेकजी मदन, संचालक श्री.टी.एन.कानवडे, श्री.एस.टी.येलमामे, श्री.विजय पवार, प्राचार्य श्री.बी.वाय.देशमुख, प्राचार्य श्री.बी.के.बनकर व उपप्राचार्य श्री.डी.जी.बु-हाडे यांनी जयेशचे व त्याला साथ देणाऱ्या त्याच्या वडिलांचे कौतुक केले.
भारतीय खेल प्राधिकरण, नवी दिल्ली यांनी दत्तक घेतलेल्या सत्यनिकेतन संचलित साई कुस्ती आखाड्याचे संचालक श्री. तान्हाजी नरके यांच्या अथक परिश्रमातून राज्य पातळीवर विद्यालयाला हे यश प्राप्त झाले आहे. क्रीडा शिक्षक श्री.व्ही.टी. तारू व श्री.जे.आर.आरोटे यांचेही मोलाचे मार्गदर्शन जयेशला लाभले.















