November 18/19/20/21, 2025
गुरुवर्य रा.वि.पाटणकर सर्वोदय विद्या मंदिर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचा वार्षिक क्रीडा महोत्सव आजपासून सुरु झाला. १८ नोव्हेंबर ते २१ नोव्हेंबर या कालावधीत माध्यमिक व उच्च माध्यमिक या दोन्ही विभागांचा वार्षिक क्रीडा महोत्सव पार पडणार आहे. क्रीडा शिक्षक श्री.जे.आर.आरोटे व श्री.व्ही.टी.तारू यांनी या वार्षिक क्रीडा महोत्सवाचे उत्कृष्ठ नियोजन केलेले आहे.
१८ नोव्हेंबर रोजी माध्यमिक विभागाच्या क्रीडा महोत्सवाचा उदघाटन सोहळा पार पडला. विद्यालयाचे प्राचार्य श्री.बी.के. बनकर व पर्यवेक्षक श्री.जी.बी.मालुंजकर यांच्या हस्ते या स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. कलाशिक्षक श्री.फापाळे सर व श्री.मंडलिक सर हेदेखील उदघाटन प्रसंगी अतिथी म्हणून उपस्थित होते. माध्यमिक विभागाचे सर्व शिक्षक यावेळी उपस्थित होते. क्रीडा विभागाने संपूर्ण वार्षिक क्रीडा महोत्सवाचे अतिशय उत्कृष्ठ नियोजन केले आहे. प्रत्येक दिवशी वेगवेगळ्या स्पर्धांचे आयोजन करण्यात आलेले आहे.












