December 27, 2025
जुन्या आठवणींना उजाळा देण्यासाठी, शिक्षकांशी आणि मित्रांशी पुन्हा जोडले जाण्यासाठी, तसेच शाळेशी व संस्थेशी असलेले आपले नाते अधिकाधिक घट्ट करण्यासाठी माजी विद्यार्थी मेळावा (Alumni Meet) आयोजित केला जातो.
तब्बल २५ वर्षांपूर्वीच्या जुन्या आठवणींना उजाळा देत गुरुवर्य रा.वि.पाटणकर सर्वोदय विद्या मंदिर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या सन १९९९-२००० या वर्षातील इयत्ता १० वीच्या बॅचचा माजी विद्यार्थ्याचा स्नेहमेळावा विद्यालयात अतिशय उत्साहात पार पडला. या स्नेहमेळाव्यासाठी १९९९-२००० च्या बॅचचे ५० माजी विद्यार्थी हजर होते. मेळाव्याच्या निमित्ताने पुन्हा एकदा एकत्र आलेले सर्व माजी विद्यार्थी जुन्या आठवणीत हरवून गेले होते. प्रत्येकजण आपली शाळा कशी आहे हे डोळ्यांमध्ये साठवून घेत होता. वर्गमित्र-मैत्रिणी भेटल्याचा आनंद सर्वांच्याच चेहऱ्यावर दिसत होता.
याप्रसंगी आयोजित कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्यालयाचे प्राचार्य श्री.भाऊसाहेब बनकर होते. या स्नेहमेळाव्यासाठी १९९९-२००० च्या बॅचचे विद्यार्थी व त्यांना शिकविणारे माजी मुख्याध्यापक श्री.जाधव के.आर., श्री.देशमुख एस.आर., सौ.सोनवणे मॅडम, श्री.पाचपुते डी.एम. उपस्थित होते. याप्रसंगी श्री.जाधव के.आर., प्राचार्य श्री.बनकर सर, श्री.पाचपुते सर, सौ.सोनवणे मॅडम यांनी मनोगते व्यक्त केली. यावेळी प्राचार्यांनी या स्नेहमेळावा आयोजित करणाऱ्या विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
‘अशा प्रकारच्या मेळाव्याच्या अयोजनामुळे समाजाला व शाळेच्या विकासाला एक नवीन दिशा मिळणार आहे. माजी विद्यार्थी हे शाळेचे व संस्थेचे महत्वाचे आधारस्तंभ असून त्यांच्याकडून आजच्या पिढीला मोलाचे मार्गदर्शन आणि प्रेरणा मिळत असते. शाळेमध्ये माजी विद्यार्थी संघ निर्माण केला असून मोठ्या संख्येने माजी विद्यार्थी सहभागी होत आहेत. माजी विद्यार्थी हे पुन्हा नव्याने शाळेसोबत जोडले जात आहेत ही शाळेच्या दृष्टीने अभिमानास्पद बाब आहे. माजी विद्यार्थी मेळाव्यांच्या आयोजनातून जुन्या व नव्याचा चांगला मेळ घातला जातो. नवीन पिढीला जुन्या व अनुभवी लोकांच्या कामातून प्रेरणा मिळते. यामुळे आपल्या आयुष्याला एक नवीन दिशा मिळते’, असे मत माननीय प्राचार्यांनी याप्रसंगी व्यक्त केले.
माजी विद्यार्थ्यांच्या वतीने डॉ.अतुल आरोटे, रोहित लांडे, मनिषा देशमुख, काजल माळवे यांनी आपली मनोगत व्यक्त केले. गुरुवर्य रा.वि.पाटणकर यांच्या आशीर्वादाने तसेच सर्वोदयच्या शिस्त व संस्काराने आपण घडल्याची भावना माजी विद्यार्थ्यांनी यावेळी व्यक्त केली. सर्व माजी विद्यार्थ्यांचा माननीय प्राचार्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सर्व विद्यार्थ्यांनी सुद्धा आपल्या गुरुजनांना सन्मान चिन्ह, शाल व गुलाबपुष्प देऊन सन्मानित केले व विद्यालयासाठी प्रत्येक वर्गाला फिरता चषक व विविध स्पर्धांसाठी आकर्षक अशा ट्रॉफी दिल्या. विद्यालयाविषयी तसेच संस्थेविषयी सर्व माजी विद्यार्थ्यांनी कृतज्ञता व्यक्त करत एकमेकांच्या सुख-दुःखात सहभागी होण्याचा निर्धार यावेळी त्यांनी केला. शाळेचे बदललेले रूप व शाळेमध्ये झालेल्या सुधारणा पाहून माजी विद्यार्थ्यांनी समाधान व्यक्त केले.
डॉ.अतुल आरोटे, रोहित लांडे, मनिषा देशमुख, काजल माळवे, रुपाली हंगेकर, रत्नमाला रावते, अर्चना म्हसे, सायली अवसरकर, रोहिणी भांगरे, मनिषा देशमुख, सुरेश भालेराव, चंद्रशेखर आरोटे, सुरेश बांबळे, रोहित लांडे, संतोष चोथवे, अनिकेत शहा, गणेश भडांगे, सतिष पाबळकर, अमित कानकाटे, महेशकुमार आरोटे, निलेश कानकाटे, सागर कानकाटे, सागर शिंदे, सुरेश हिले, नागेश बांडे, प्रवीण पन्हाळे, रमेश कानकाटे, निलेश पाबळकर, किशोर येलमामे, विजय आरोटे, संतोष सपकाळ, बाळू नवाळी, प्रदीप पिचड व प्रशांत मुतडक हे सर्व माजी विद्यार्थी कार्यक्रमाला उपस्थित होते.
या कार्यक्रमासाठी श्री.एन.के.शिंदे, श्री.एस.बी.कोटकर, श्री.श्रीकांत घाणे, श्री.धनंजय लहामगे, श्री.शशिकांत हेकरे, श्री.आर.पी.पांडे, सौ.सानप मॅडम व विद्यालयातील सर्व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. माजी विद्यार्थ्यांच्या या अभिनव उपक्रमाचे सत्यनिकेतन संस्थेचे सचिव मा.श्री.एम.एल.मुठे, कोषाध्यक्ष मा.श्री.विवेकजी मदन, संचालक श्री.विजय पवार, प्राचार्य श्री.भाऊसाहेब बनकर, उपप्राचार्य श्री.दिपक बुऱ्हाडे व सर्व शिक्षकांनी कौतुक केले.















