January  08, 2026


डोंगरमाथ्यावर जलशोषक चर खोदून आपला वाढदिवस साजरा करणाऱ्या पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील पर्यावरणप्रेमी, वनरक्षक, जलनायक व माजी सैनिक श्री.रमेशजी खरमाळे यांनी आज गुरुवर्य रा.वि. पाटणकर सर्वोदय विद्या मंदिर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाला सदिच्छा भेट देऊन इयत्ता पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. पर्यावरण संवर्धन, पशुपक्षी संरक्षण, ग्लोबल वॉर्मिग, जलव्यवस्थापन व जंगल संरक्षण या विषयावर त्यांनी विद्यार्थ्यांशी अतिशय प्रभावीपणे प्रश्नोत्तराच्या माध्यमातून सुसंवाद साधत मनोरंजक पद्धतीने मार्गदर्शन केले.

विद्यालयाचे माजी विद्यार्थी व अकोले तालुक्यातील मवेशी येथील ‘आम्ही पर्यावरणप्रेमी’ या फौंडेशनचे अध्यक्ष श्री.राहुल राऊत यांच्या विशेष प्रयत्नातून विद्यार्थ्यांसाठी या माहितीपर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. विद्यालयाचे प्राचार्य श्री.भाऊसाहेब बनकर यांनी आपल्या प्रास्ताविकामध्ये अतिथींचा परिचय करून दिला व श्री.रमेशजी खरमाळे यांच्या पर्यावरणविषयक आदर्शवत अशा कार्याचे कौतुक केले.

विद्यालयाच्या वतीने श्री.रमेशजी खरमाळे यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी व्यासपीठावर अकोले पंचायत समितीचे केंद्रप्रमुख श्री.देवेंद्र अंबेटकर, प्राचार्य श्री.सुनिल धुमाळ, श्री.डगळे सर, श्री.राहुल राऊत, उपप्राचार्य श्री.दिपक बुऱ्हाडे, पर्यवेक्षक श्री.गोरक्ष मालुंजकर, श्री.शरद तुपविहिरे, श्री.संजय देशमुख व श्री.लहानू परबत उपस्थित होते.

श्री.श्रीकांत घाणे यांनी या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन केले व उपप्राचार्य श्री.दिपक बुऱ्हाडे यांनी आभार मानले.

भारतीय सैन्यदलामधून सन २०१२ मध्ये निवृत्त झाल्यानंतर रमेश खरमाळे यांना मिळालेले विविध क्षेत्रातील पुरस्कार-

१.  शिवनेरी भुषण शौर्य पुरस्कार, २०१८ 
२. ‘इंडीया बुक ऑफ रेकॉर्ड’, २०२१ (पर्यावरण संवर्धनासाठी)
३. महाराष्ट्र शासन वनविभाग रजत पदक, २०२१
४. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ विभाग EMMRC व्दारा चित्रित केलेली शैक्षणिक फिल्म “कपल फॉर इन्व्हारमेंटल” सिलॉंग येथे भारतातील विद्यापीठांत “बेस्ट शैक्षणिक फिल्म अवार्ड” २०२४
५. सैनिक कल्याण विभाग, महाराष्ट्र राज्य, पुणे- विशेष गौरव पुरस्कार, २०१९
६. भारतीय सेनादलाचा “वेटरन अचिवर अवार्ड” २०२५
७. मा. पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी “मन की बात” या कार्यक्रमात दखल घेतली, २०२५
८. मा.महामहिम राष्ट्रपती द्रोपदीजी मुर्मु यांचे १५ ऑगस्ट २०२५ रोजी जेवणाचे निमंत्रण
९. तेलुगू भाषेतील युवकभारती या पुस्तकात ११ वीच्या विद्यार्थांच्या अभ्यासक्रमात जुन्नरचा ऐतिहासिक वारसा सचित्र लेख व नावासहीत उल्लेख, २०१९
१०. सर्विस एक्सलेंस अवार्ड २०२३- रोटरी क्लब ऑफ नारायणगाव हायवे.
११. व्होकेशनल सर्विस एक्सिलेंस अवार्ड, २०२५- रोटरी क्लब ऑफ जुन्नर.
१२. लायन्स शिवनेरी भुषण पुरस्कार- लायन्स क्लब ऑफ जुन्नर शिवनेरी, २०१९
१३. लायन्स भुषण पुरस्कार २०२५- लायन्स क्लब ऑफ ओतुर
१४. अमेरिकन राजदूत माईक हॅंकी यांचे उत्कृष्ट ट्रेकर म्हणून सन्मानपत्र
१५. झी २४ तास कृषी सन्मान २०२५ पुरस्कार 
१६. सकाळ सन्मान पुरस्कार २०२४ व इतर विविध क्षेत्रातील शेकडो पूरस्कार

जय पर्यावरण….