गणरायाला निरोप…
“गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या…” असा जयजयकार करत ढोल-ताशांच्या गजरात आणि फुलांची उधळण करत आज सर्वोदयच्या लाडक्या बाप्पाला निरोप देण्यात आला. याप्रसंगी काढण्यात आलेल्या शिस्तबद्ध अशा विसर्जन मिरवणुकीला राजूरकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत ठिकठिकाणी प्रचंड गर्दी केली होती. लेझीम पथक, झांझ पथक, बालकलाकारांचे ढोलपथक व रेकॉर्ड डान्स यांचे सदरीकरण करत विद्यार्थ्यांनी राजूर ग्रामस्थांची मने जिंकली.
विसर्जन मिरवणुकीपूर्वी वसतिगृह अधीक्षक श्री.ढगे सर यांनी सपत्नीक पूजा करून गणरायाला विधिवत निरोप दिला. राजूर गावामध्ये विसर्जन मिरवणुकीचे ठिकठिकाणी गणपती मंडळांकडून स्वागत करण्यात आले. विद्यार्थ्यांना खाऊ व पाण्याचे वाटप करण्यात आले. राजूर ग्रामपंचायतीच्या वतीने विद्यालयाचा यथोचित सन्मान करण्यात आला.
विद्यालयाचे प्राचार्य श्री.बनकर बी.के., उपप्राचार्य श्री.बु-हाडे डी.जी., पर्यवेक्षक श्री.मालुंजकर जी.बी. तसेच सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यावेळी उपस्थित होते. कार्यक्रम प्रमुख श्री.घाणे एस.व्ही. व श्री.शेटे एस.जे. यांनी या कार्यक्रमाचे उत्कृष्ठ नियोजन केले. जेष्ठ शिक्षक श्री.धनंजय पगारे यांनी या संपूर्ण कार्यक्रमाचे सुत्रसंचलन केले. राजूर ग्रामपंचायतीच्या सरपंच श्रीमती पुष्पाताई निगळे व राजूर पोलीस स्टेशनचे पी.आय. श्री.सरोदे साहेब हेदेखील मिरवणुकीत सहभागी होते. अतिशय भक्तिमय वातावरणात बाप्पाला निरोप देण्यात आला.