svm rajur ganpati utsav

गणरायाचे आगमन…


भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला गणेश चतुर्थी साजरी केली जाते. अवघ्या देशभरात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या उत्सवाची समाप्ती अनंत चतुर्दशीला होते.

‘गणपती बाप्पा मोरया’ असा जयघोष करत आज गुरुवर्य रा.वि.पाटणकर सर्वोदय विद्या मंदिर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात मोठ्या उत्साहात गणरायाचे आगमन झाले. विद्यालयाच्या प्रवेशद्वारापासून ढोल ताशांच्या गजरात बाप्पाचे स्वागत करण्यात आले. यावेळी विद्यार्थी व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड उत्साह पहावयास मिळाला. रांगोळी व रंगीबेरंगी फुलांनी विद्यालय परिसराची सजावट करण्यात आली होती. 

विद्यालयाचे शिक्षक श्री.संतराम बारवकर यांनी सपत्नीक पूजा करून गणरायाचे विधिवत स्वागत केले. श्री.धनंजय लहामगे यांनी या पूजेचे सुश्राव्य असे पौराहित्य केले. गणरायाच्या स्थापनेनंतर मोठ्या जल्लोषात आरती करण्यात आली. विद्यालयाचे प्राचार्य श्री.बनकर बी.के., उपप्राचार्य श्री.बु-हाडे डी.जी., पर्यवेक्षक श्री.मालुंजकर जी.बी., सत्यनिकेतन संस्थेचे संचालक श्री.विलास पाबळकर तसेच सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यावेळी उपस्थित होते. कार्यक्रम प्रमुख श्री.घाणे एस.व्ही. व श्री.शेटे एस.जे. यांनी या कार्यक्रमाचे उत्कृष्ठ नियोजन केले. जेष्ठ शिक्षक श्री.धनंजय पगारे यांनी या संपूर्ण कार्यक्रमाचे सुत्रसंचलन केले.

PHOTO GALLERY


GO TO HOMEPAGE