August 15, 2025
गुरुवर्य रा.वि.पाटणकर सर्वोदय विद्या मंदिर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात आज १५ ऑगस्ट २०२५ रोजी देशाचा ७९ वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा करण्यात आला. माजी प्राचार्य श्री.एल.पी.पर्बत यांचे हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या देशभक्तीपर गीतांनी उपस्थितांमध्ये नवचैतन्य निर्माण केले. यावेळी NCC, Scout Guide व हरितसेना पथकांचे संचलन लक्ष वेधून घेणारे ठरले. विद्यालयाचे प्राचार्य श्री.बी.के.बनकर यांनी सर्वांचे आभार मानले. सर्व विद्यार्थी, पालक, माजी शिक्षक, माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागातील सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड उत्साह पहावयास मिळाला.
‘हर घर तिरंगा’ या शासनाच्या उपक्रमांतर्गत विद्यालयामध्ये ‘रांगोळी स्पर्धा’ व ‘निबंध स्पर्धा’ घेण्यात आल्या. या स्पर्धांमध्ये विद्यार्थी उत्स्फुर्तपणे सहभागी झाले होते.
















