August 15, 2026
गुरुवर्य रा.वि.पाटणकर सर्वोदय विद्या मंदिर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात आज १५ ऑगस्ट २०२६ रोजी देशाचा ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा करण्यात आला. सत्यनिकेतन संस्थेचे ज्येष्ठ सभासद आदरणीय विठ्ठलराव खाडे यांचे शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
याप्रसंगी सत्यनिकेतन संस्थेचे ज्येष्ठ संचालक श्री.विजय पवार, श्री.रामशेठ पन्हाळे, माजी प्राचार्य श्री.मनोहर लेंडे व श्री.लहानू पर्बत, विद्यालयाचे प्राचार्य श्री.बी.के.बनकर, उपप्राचार्य श्री.दिपक बुऱ्हाडे, पर्यवेक्षक श्री.संजय व्यवहारे, सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी तसेच माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागातील विद्यार्थी मोठ्या संच्येने उपस्थित होते.
सकाळच्या अतिशय प्रसन्न वातावरणामध्ये विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या देशभक्तीपर गीतांनी उपस्थितांमध्ये नवचैतन्य निर्माण केले. यावेळी राष्ट्रगीत, ध्वजगीत, महाराष्ट्र गीत, NCC गीत व Scout गीत सादर करण्यात आले. यावेळी NCC, Scout व हरितसेना पथकांचे संचलन लक्ष वेधून घेणारे ठरले. कार्यक्रमादरम्यान शासन आदेशानुसार १० वी १२ वी च्या विद्यार्थ्यांना आगामी २०२७ च्या बोर्ड परीक्षेसाठी कॉपीमुक्तीची शपथ देण्यात आली.
एन.सी.सी. प्रमुख श्री.संजय देशमुख, स्काऊट गाईड प्रमुख श्री.धनंजय लहामगे व श्रीमती रीना राठोड व हरितसेना प्रमुख श्री.श्रीकांत घाणे यांनी आपापल्या विभागाच्या संचलनाचे शिस्तबद्ध नियोजन करून कार्यक्रमाची शोभा वाढविली. ज्येष्ठ शिक्षक श्री.धनंजय पगारे यांनी संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचलन केले.
‘हर घर तिरंगा’ हे अभियान भारताच्या स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून राबवले जाणारे एक अत्यंत महत्त्वाचे राष्ट्रव्यापी अभियान आहे. या अभियानाचा मुख्य उद्देश प्रत्येक नागरिकाच्या मनात राष्ट्रभक्तीची भावना अधिक दृढ करणे आणि आपल्या राष्ट्रध्वजाबद्दल म्हणजेच तिरंग्याबद्दल आदर वाढवणे हा आहे. या अभियानाअंतर्गत राजूर गावामधून तिरंगा रॅली, नशामुक्ती रॅली व टी.बी. मुक्त रॅली चे आयोजन करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड उत्साह व आनंद दिसून आला.

















