September 19, 2025


गुरुवर्य रा.वि. पाटणकर सर्वोदय विद्या मंदिर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या उच्च-माध्यमिक विभागाच्या कला मंडळ व वाङमय मंडळाचा उदघाटन सोहळा आज लोकप्रिय कवी व ‘दंगल’कार श्री.नितीन चंदनशिवे यांचे शुभहस्ते पार पडला.

यावेळी विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड उत्साह दिसून आला. अत्यंत साध्या व ओघवत्या शैलीमध्ये श्री.नितीन चंदनशिवे यांनी अनेक प्रसंग विनोदी शैलीमध्ये सांगत उपस्थितांना अक्षरशः पोट धरून हसविले. अधून-मधून आपल्या कविता सादर करताना त्यांनी उपस्थितांची मने जिंकली. आपल्या आयुष्यातील अनेक घटना व अनुभव सांगताना त्यांनी विद्यार्थ्यांना जीवनाचा खरा अर्थ उलगडून सांगितला. कला व वाङमय या दोन्ही गोष्टींनी आपले व्यक्तिमत्व कसे घडते हे त्यांनी अनेक उदाहरणे देऊन स्पष्ट केले. बदलत्या सामाजिक परिस्थितीमध्ये मुलींनी आपला आत्मविश्वास कसा वाढविला पहिले याबद्दल श्री.नितीन चंदनशिवे यांनी मार्गदर्शन केले. आपली कविता अमेरिकेतील एका पुस्तकाच्या मुखपृष्ठावर छापून आल्याची बातमी जेव्हा त्यांना कळाली तेव्हा ते एका बांधकाम गवंड्याच्या हाताखाली पाट्या उचलण्याचे काम करत होते, हा अनुभव विषद करताना त्यांनी सांगितले की घाम गाळून मेहनत केल्याशिवाय यश मिळत नाही.

या कार्यक्रमप्रसंगी सत्यनिकेतन संस्थेचे सचिव श्री.एम.एल.मुठे व संचालक श्री.व्ही.डी.पवार हे उपस्थित होते. विद्यालयाचे प्राचार्य श्री.बी.के.बनकर हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. उपप्राचार्य श्री.डी.जी.बु-हाडे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. ज्येष्ठ शिक्षक व कार्यक्रमाचे संयोजक श्री.एस.व्ही.तुपविहिरे यांनी पाहुण्यांचे स्वागत व परिचय करून दिला. कला मंडळ प्रमुख श्री.बी.एस.घिगे यांनी आभार मानले. श्री.एस.आर.बारवकर यांनी या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन केले.

उच्च-माध्यमिक विभागातील सर्व शिक्षकवृंद तसेच शिक्षकेतर कर्मचारी यांच्या अथक परिश्रमामुळे हा कार्यक्रम यशस्वीरीत्या संपन्न झाला.

GO TO HOME PAGE