November 13, 2025


जागतिक शांतता ही काळाची गरज आहे. युद्ध, हिंसाचार व दहशतवाद यामुळे आज संपूर्ण जगात भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे व त्याचबरोबर असुरक्षिततेचे सावट पसरलेले आहे. जागतिक शांतता ही केवळ युद्ध टाळण्यासाठीच नव्हे, तर मानवजातीच्या सर्वांगीण विकासासाठी आणि भविष्यातील पिढ्यांसाठी एक सुरक्षित आणि समृद्ध जग निर्माण करण्यासाठी अत्यावश्यक आहे.

हेच उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेऊन लायन्स क्लब पुणे फ्युचर यांनी नुकतीच ‘पीस पोस्टर चित्रकला स्पर्धा (Peace Poster Drawing Competition)’ आयोजित केली. गुरुवर्य रा.वि.पाटणकर सर्वोदय विद्या मंदिर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील ११ ते १३ वयोगटातील १३० स्पर्धकांनी या स्पर्धेत सहभाग घेतला. ‘जागतिक शांतता (World Peace)’ ही या स्पर्धेची मुख्य थीम होती. सत्यनिकेतन संस्थेचे संचालक श्री.अशोक मिस्त्री यांच्या प्रेरणेने व कला शिक्षक श्री.आर.पी.पांडे यांच्या उत्कृष्ठ नियोजनाखाली ही स्पर्धा यशस्वीरीत्या पार पडली.

१३० सहभागी स्पर्धकांमधून प्रथम चार स्पर्धकांची निवड करण्यात आली. ज्येष्ठ शिक्षिका सौ.बिना सावंत, उपप्राचार्य श्री. डी.जी.बु-हाडे व कला शिक्षक श्री.आर.पी.पांडे यांनी परीक्षक म्हणून काम पाहत प्रथम चार विजेत्यांची निवड केली.


प्रथम क्रमाक- कु. भांगरे केतकी भाऊराव (६ वी ब)
द्वितीय क्रमांक- कु. घिगे प्रज्ञा रविंद्र (७ वी क) 
तृतीय क्रमांक- कु. पिचड गौरी प्रदीप (६ वी ब)
चतुर्थ क्रमांक- कु. राठोड आरोही राजू (६ वी क)


विद्यालयाचे प्राचार्य श्री.बी.के.बनकर, पर्यवेक्षक श्री.जी.बी.मालुंजकर व कला शिक्षक श्री.आर.पी.पांडे यांच्या हस्ते सर्व विजेत्यांचा सत्कार करण्यात आला. सत्यनिकेतन संस्थेचे सचिव श्री.एम.एल.मुठे, कोषाध्यक्ष श्री.विवेकजी मदन तसेच  सत्यनिकेतन संस्थेच्या संचालकांनी व सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. 

GO TO HOME PAGE