October 02, 2026
गुरुवर्य रा.वि.पाटणकर सर्वोदय विद्या मंदिर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात २ ऑक्टोबर २०२६ रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
याप्रसंगी दोन्ही महापुरुषांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. विद्यालयातील ज्येष्ठ शिक्षक श्री.किशोर देशमुख व श्री.बाळासाहेब घिगे यांच्या सुरेल संगीत साथीने सावित्रीबाई मदन कन्या निवासच्या मुलींनी सौ.बिना सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली सुश्राव्य अशा सर्वधर्मीय प्रार्थनांचे गायन केले. विद्यालयाचे प्राचार्य श्री.बी.के. बनकर, उपप्राचार्य श्री.डी.जी. बु-हाडे, उपमुख्याध्यापक श्री.एस.पी. व्यवहारे, वसतिगृह अधीक्षक श्री.ढगे सर, माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागाचे सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी याप्रसंगी उपस्थित होते.
ज्येष्ठ शिक्षक श्री.धनंजय पगारे यांनी या कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. विद्यालयाचे प्राचार्य श्री.बी.के.बनकर यांनी महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री या दोन्ही महापुरुषांच्या कार्याचा उल्लेख केला व विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.











