October 02, 2025
गुरुवर्य रा.वि.पाटणकर सर्वोदय विद्या मंदिर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात आज २ ऑक्टोबर २०२५ रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
याप्रसंगी दोन्ही महापुरुषांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. विद्यालयातील ज्येष्ठ शिक्षक श्री.किशोर देशमुख व श्री.संतराम बारवकर यांच्या सुरेल संगीत साथीने सावित्रीबाई मदन कन्या निवासच्या मुलींनी सुश्राव्य अशा सर्वधर्मीय प्रार्थनांचे गायन केले. विद्यालयाचे प्राचार्य श्री.बी.के.बनकर, उपप्राचार्य श्री.डी.जी.बु-हाडे, पर्यवेक्षक श्री.जी.बी.मालुंजकर, वसतिगृह अधीक्षिका श्रीमती जोशी मॅडम, अधीक्षक श्री.ढगे सर, माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागाचे सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी याप्रसंगी उपस्थित होते.
कार्यक्रमप्रमुख व ज्येष्ठ शिक्षक श्री.दिपक पाचपुते यांनी या कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. विद्यालयाचे प्राचार्य श्री.बी.के.बनकर यांनी महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री या दोन्ही महापुरुषांच्या कार्याचा उल्लेख केला व विद्यार्थ्यांना विजयादशमीच्या शुभेच्छा दिल्या. स्काऊट गाईडच्या विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमाचे उत्कृष्ठ नियोजन केले.














