November 15 & 17, 2025


राज्य शासनाच्या कृषी विभागाने नुकतेच महाविस्तार AI ॲप विकसित केले आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक शेतकऱ्यास डिजिटल सेवेच्या माध्यमातून शास्त्रशुद्ध आणि रिअल-टाइम कृषिविषयक सल्ला देऊन त्यांचे सक्षमीकरण करणे हा महाविस्तार AI ॲप विकसित करण्यामागचा उद्देश आहे.

राज्य शासनाच्या कृषी विभागाने विकसित केलेल्या या प्लॅटफॉर्मवर हवामान, माती, कृषी सल्ला, खाद-बियाणे, किड-रोग नियोजन, बाजारभाव, बाजारपेठ व त्याचबरोबर विविध शासकीय योजनांची माहिती एकत्रितपणे उपलब्ध आहे. मराठी तसेच इंग्रजी भाषेतील चॅटबॉटमार्फत शेतकऱ्यांना स्थानिक आणि त्यांच्या गरजेनुसार सल्ला अत्यंत सहज मिळू शकतो. क्लिष्ट माहिती आणि शेतीतील व्यवहार्य निर्णय यातील दरी दूर करण्याचे काम महाविस्तार करते. महाविस्तार हे शाश्वत शेती, डिजिटल सक्षमीकरण आणि समृद्ध गावे यादिशेने एक महत्त्वाचे पाऊल आहे.

या अनुषंगाने अकोले तालुका कृषि विभागाच्या वतीने गुरुवर्य रा.वि.पाटणकर सर्वोदय विद्या मंदिर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये आज विद्यार्थ्यांना महाविस्तार AI ॲप बद्दल मार्गदर्शन करण्यात आले. या ॲपचा वापर करून उत्पादन खर्चात कपात होऊन उत्पन्नात जास्तीत जास्त वाढ कशी होईल यासंदर्भात शास्त्रशुद्ध माहिती देण्यात आली. विद्यार्थ्यांना महाविस्तार AI ॲप Install व प्रत्यक्षात ॲपमधील मेनुंचा वापर करण्यासंदर्भात मंडळ कृषी-अधिकारी श्री.यशवंत खोकले यांनी विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन केले.

200 विद्यार्थ्यांना व 20 शिक्षकांना महाविस्तार AI ॲप त्यांच्या मोबाईलमध्ये Install करून देण्यात आले.


याप्रसंगी मंडळ कृषी-अधिकारी श्री.यशवंत खोकले, उप कृषी-अधिकारी श्री.मीनानाथ गाभाले, सहाय्यक कृषी-अधिकारी श्री.रुपेश सुपे, श्री.संतोष साबळे, श्री.विनायक तळपाडे, श्री.प्रवीण तळपाडे, श्री.समिर देशमुख, सौ.संध्या बांबळे, श्री.सचिन साबळे व योगेश्वर सारोक्ते उपस्थित होते. उपप्राचार्य श्री.दिपक बुऱ्हाडे यांनी कृषी विभागाच्या या सर्व अधिकाऱ्यांचे स्वागत करत त्यांचा सत्कार केला. याप्रसंगी ज्येष्ठ शिक्षिका सौ.बिना सावंत, श्री.एस.आर.देशमुख व उच्च माध्यमिक विभागाचे सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

स्वतः मंडळ कृषी-अधिकारी श्री.यशवंत खोकले साहेब व त्यांचा स्टाफ विद्यार्थ्यांना App install करून देताना…

‘महाविस्तार AI ॲप’ आपल्या मोबाईलवर Install करा:

GO TO HOME PAGE