January 22, 2026
February 14, 2026


केलवड येथील श्री नरेश राऊत फाउंडेशन व Eos Power India Pvt. Ltd. यांच्या सीएसआर निधीतून आज गुरुवर्य रा.वि. पाटणकर सर्वोदय विद्या मंदिर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये मोफत ‘लेडी लोटस’ सॅनिटरी पॅडचे वितरण करण्यात आले. त्याचबरोबर विद्यालयासाठी अत्याधुनिक वेंडिंग व डिस्पोजल मशीनही वितरित करण्यात आले. विद्यालयातील किशोरवयीन मुलींच्या आरोग्य व स्वच्छतेबाबत जनजागृती व्हावी या उद्देशाने सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. सत्यनिकेतन संस्थेचे ज्येष्ठ संचालक श्री.विजय पवार यांच्या अध्यक्षतेखाली अतिशय प्रसन्न वातावरणामध्ये हा कार्यक्रम पार पडला. 

या कार्यक्रमास श्री नरेश राऊत फाउंडेशनचे अध्यक्ष माननीय श्री.नरेश राऊत यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच संस्थेचे सचिव प्रा.श्री.लक्ष्मण गोर्डे, संचालक श्री.विलास महाले, राहता येथील शारदा कन्या विद्या मंदिरच्या शाळा समितीचे अध्यक्ष श्री.रमेश शिंदे, संस्थेचे व्यवस्थापक श्री.सचिन वाघे, संस्थेचे प्रकल्प अधिकारी श्री.नवनाथ राजपूत, लेखापाल श्री.अंकुश बत्तासे, प्रसिद्धी प्रमुख श्री.अमोल कहांडळ, श्री.संतोष यादव, सत्यनिकेतन संस्थेचे ज्येष्ठ संचालक श्री.एस.टी.येलमामे, पत्रकार श्री.प्रकाश महाले, मुख्याध्यापिका श्रीमती कर्पे मॅडम, मुख्याध्यापिका श्रीमती वैद्य मॅडम, मुख्याध्यापक श्री.बोऱ्हाडे सर हे सर्व मान्यवर उपस्थित होते.

यावेळी एकूण ६५२ मुलींना सॅनिटरी पॅडचे वाटप करण्यात आले. या उपक्रमामुळे आदिवासी व ग्रामीण भागातील किशोरवयीन मुलींच्या आरोग्यविषयक सवयी सुधारण्यास तसेच वैयक्तिक स्वच्छता आणि आत्मविश्वास वृद्धिंगत होण्यासाठी महत्त्वपूर्ण हातभार लागेल, तसेच महिलांच्या आरोग्यविषयक जाणीवेत वाढ होऊन समाजात सकारात्मक संदेश पोहोचेल, असा विश्वास याप्रांगी बोलताना श्री.नरेश राऊत यांनी व्यक्त केला. फाउंडेशनचे सचिव प्रा.श्री.लक्ष्मण गोर्डे यांनी फाउंडेशनच्या माध्यमातून संपूर्ण राज्यामध्ये राबविण्यात येणाऱ्या विविध सामाजिक, शैक्षणिक व आरोग्यविषयक उपक्रमांची माहिती दिली.

गुरुवर्य रा.वि. पाटणकर सर्वोदय विद्या मंदिर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य श्री.भाऊसाहेब बनकर यांनी आपल्या प्रास्ताविकामध्ये मान्यवरांना सत्यनिकेतन संस्थेमध्ये व विद्यालयामध्ये राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली. कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री.विजय पवार, श्री.एस.टी.येलमामे, श्री.रमेश शिंदे व श्री.विलास महाले यांनीही याप्रसंगी आपली मनोगते व्यक्त केली.

श्री.शरद तुपविहिरे यांनी या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन केले. उपप्राचार्य श्री.दिपक बुऱ्हाडे यांनी आभार व्यक्त केले. माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागाच्या सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी खूप मेहनत घेतली.

February 14, 2026


वेंडिंग व डिस्पोजल मशीन वितरण