२३ ऑगस्ट २०२३ रोजी भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने चांद्रयान-३ चे लँडर आणि रोव्हर यशस्वीरित्या चंद्रावर उतरवून एक महत्त्वाचा टप्पा गाठला. या दिवशी भारताने चंद्रावर पाऊल ठेवून मोठा इतिहास रचला होता. भारत चंद्रावर उतरणारा चौथा आणि चंद्राच्या दक्षिण ध्रुवीय प्रदेशाजवळ उतरणारा पहिला देश बनला. सॉफ्ट-लँडिंगनंतर प्रज्ञान रोव्हरची यशस्वी तैनाती करण्यात आली. या कामगिरीची दखल घेत २३ ऑगस्ट हा दिवस भारतात “राष्ट्रीय अंतराळ दिन” म्हणून घोषित केला गेला.
आज २३ ऑगस्ट २०२५ रोजी गुरुवर्य रा.वि.पाटणकर सर्वोदय विद्या मंदिर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात ‘राष्ट्रीय अंतराळ दिन’ विविध कार्यक्रम घेऊन साजरा करण्यात आला. एन.सी.सी., स्काऊट व विज्ञान विभागाच्या संयुक्त विद्यमाने हा दिन साजरा करण्यात आला. याप्रसंगी आयोजित कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्यालयाचे प्राचार्य श्री.बनकर बी.के. होते. यावेळी पर्यवेक्षक श्री. मालुंजकर जी.बी., ज्येष्ठ शिक्षक श्री.शिंदे एन के., एन.सी.सी. विभागाचे प्रमुख श्री.देशमुख एस.आर., कला शिक्षक श्री.पांडे आर.पी., श्रीमती खराटे मॅडम, श्रीमती वाळुंज मॅडम हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.लहामगे डी.बी. यांनी केले. ज्येष्ठ शिक्षक श्री.पगारे डी.बी. यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.
याप्रसंगी विद्यार्थ्यांना चांद्रयान-३ च्या चंद्रावरील यशस्वी लँडिंगचा व्हिडीओ दाखवण्यात आला. विज्ञान शिक्षिका श्रीमती सानप मॅडम यांनी सर्व विद्यार्थ्यांना अवकाश यान व ऑर्बिटल याविषयी माहिती सांगून आजच्या दिवसाचे महत्त्व सांगितले.
चांद्रयान-३ लँडिंग व्हिडीओ