October 31, 2025


सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त ३१ ऑक्टोबर हा दिवस दरवर्षी राष्ट्रीय एकता दिवस म्हणून देशभर साजरा केला जातो. भारतातील राष्ट्रीय आणि राजकीय एकात्मता व एकता वाढविण्याच्या दृष्टीने वल्लभभाई पटेल यांनी बजावलेल्या महत्त्वपूर्ण भूमिकेचा सन्मान करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो.

अहिल्यानगर जिल्हा पोलीस दल, राजूर पोलीस स्टेशन, गुरुवर्य रा.वि.पाटणकर सर्वोदय विद्या मंदिर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय NCC विभाग, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, राजूर व सत्वशील करिअर अकॅडमी, राजूर यांचे संयुक्त विद्यमाने आज सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त राजुरमध्ये एकता दौड (Run For Unity) आयोजित करण्यात आली. आय.टी.आय. कॉलेज पासून निघालेल्या या एकता दौडमध्ये विद्यार्थी, शिक्षक, पोलीस कर्मचारी व ग्रामस्थ या सर्वांनी उत्स्फुर्तपणे सहभाग घेऊन ख-या अर्थाने एकता व एकात्मतेचे दर्शन घडविले. संपूर्ण राजूर शहरातून निघालेल्या या दौडमधून राजूरकरांना एकता व एकात्मतेचा संदेश देण्यात आला.

आमदार डॉक्टर किरण लहामटे, सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री.दिपक सरोदे, पोलीस उपनिरीक्षक श्री.विलास माळोदे, पोलीस उपनिरीक्षक श्री.अनिल मोरे, सर्वोदयचे उपप्राचार्य श्री.दिपक बु-हाडे व NCC प्रमुख श्री.संजय देशमुख, सत्वशील करिअर अकॅडमीचे संचालक श्री.गोरक्ष सदगीर, आय.टी.आय. कॉलेजचे गटनिदेशक श्री.अर्जुन नागरे, उपसरपंच श्री.संतोष बनसोडे, पत्रकार श्री.विलास तुपे, सर्वोदय जुनिअर कॉलेजचे सर्व शिक्षक व विद्यार्थी, सर्वोदयचे NCC छात्र, राजूर पोलीस स्टेशनचे सर्व पोलीस कर्मचारी, सत्वशील करिअर अकॅडमीचे सर्व शिक्षक व विद्यार्थी, आय.टी.आय. कॉलेजचे सर्व शिक्षक व विद्यार्थी या एकता दौडमध्ये सक्रियपणे सहभागी झाले होते.

तत्पूर्वी आमदार डॉक्टर किरण लहामटे यांनी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला. सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री.दिपक सरोदे यांनी या उपक्रमाचे महत्व विषद केले.

GO TO HOME PAGE