September 08 & 09, 2025
गुरुवर्य रा.वि.पाटणकर सर्वोदय विद्या मंदिर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात उच्च माध्यमिक विभागाचा (११ वी व १२ वी कला, वाणिज्य व विज्ञान) पालक मेळावा (विद्यार्थी-पालक-शिक्षक सहविचार सभा) मोठ्या उत्साहात पार पडला. दिनांक ८/९/२०२५ रोजी वाणिज्य व विज्ञान शाखेचा व दिनांक ९/९/२०२५ रोजी कला शाखेचा पालक मेळावा घेण्यात आला. या दोन्ही पालक मेळाव्यांना पालकांची उपस्थिती ही लक्षणीय होती.
विद्यार्थी गुणवत्ता वाढ व विकास, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक समस्या सोडवणे, घटक चाचणी परीक्षा निकाल, विद्यार्थी उपस्थिती, शाळेतील विविध उपक्रम इत्यादी मुद्द्यांवर या सहविचार सभेमध्ये खेळीमेळीच्या वातावरणात चर्चा झाली. सत्यनिकेतन संस्थेचे सचिव श्री.एम.एल.मुठे यांच्या अध्यक्षतेखाली या सहविचार सभा पार पडल्या. नाशिक पदवीधर मतदारसंघाचे महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य आ.सत्यजितदादा तांबे, उपसरपंच श्री.संतोष बनसोडे, श्री.गोकुळशेठ कानकाटे, श्री.संतोष मुतडक, सत्यनिकेतन संस्थेचे संचालक श्री.टी.एन.कानवडे, श्री.एस.टी.येलमामे, श्री.विजयजी पवार, श्री.मिलिंदशेठ उमराणी, शासकीय मुलींच्या वसतिगृहाच्या अधीक्षिका श्रीमती मंदाडे मॅडम व ॲड.एम.एन.देशमुख महाविद्यालयाचे प्राचार्य श्री. बी.वाय.देशमुख यावेळी उपस्थित होते.
यावेळी उपस्थित सर्व मान्यवरांनी मनोगते व्यक्त केली. एकत्रित काम करून आदर्श विद्यार्थी घडवण्याचं काम आपण करूया आणि यासाठी प्रत्येकाने आपले योगदान द्यावे असे आवाहन सत्यनिकेतन संस्थेचे सचिव श्री.एम.एल.मुठे यांनी केले. गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी सत्यनिकेतन हे कायम प्रगतीपथावर आहे. आदर्श विद्यार्थी घडवण्यासाठी शिक्षक, पालक आणि विद्यार्थी यांची एकत्रित सांगड घालणे ही काळाची गरज आहे असे प्रतिपादन आ.सत्यजितदादा तांबे यांनी यावेळी केले. प्राचार्य श्री.बी.के.बनकर व उपप्राचार्य श्री.डी.जी.बु-हाडे यांनी शाळेतील विविध उपक्रम व शाळेच्या प्रगतीविषयी उपस्थितांना माहिती दिली.
यावेळी शिक्षक-पालक संवाद घडून सकारात्मक चर्चा झाली. पालकांपैकी अनेकांनी आपली मनोगते व्यक्त केली. विद्यार्थी-पालक संघाचे प्रमुख श्री.एस.बी. कोटकर यांनी प्रास्ताविक करताना या सहविचार सभेची उद्दिष्ट्ये विषद केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन श्री.एस.व्ही. तुपविहिरे यांनी केले. उच्च माध्यमिक विभागाच्या सर्व शिक्षकांनी, वर्गशिक्षकांनी व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी हा पालक मेळावा यशस्वी होण्यासाठी प्रचंड मेहनत घेतली.














