September 13, 2025


गुरुवर्य रा.वि. पाटणकर सर्वोदय विद्या मंदिर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या माध्यमिक विभागाचा (इयत्ता ५ वी ते १० वी) पालक मेळावा (विद्यार्थी-पालक-शिक्षक सहविचार सभा) शनिवार दिनांक १३ सप्टेंबर २०२५ रोजी आयोजित करण्यात आला. या मेळाव्याला पालकांची उपस्थिती लक्षणीय होती.     

या सहविचार सभेत विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढ व सर्वांगीण विकास, शैक्षणिक समस्या, घटक चाचणी परीक्षा निकाल, विद्यार्थी उपस्थिती तसेच शाळेतील विविध उपक्रम या विषयांवर विचारविनिमय झाला. इयत्ता ५ वी ते १० वी च्या विद्यार्थ्यांना व पालकांना वर्गवार बसवून पालकांना आपल्या पाल्याच्या प्रगतीविषयी माहिती देण्यात आली.

प्राचार्य श्री.बी.के.बनकर व पर्यवेक्षक श्री.जी.बी.मालुंजकर यांनी शाळेतील उपक्रम व शाळेच्या प्रगतीविषयी सविस्तर माहिती दिली. या प्रसंगी पालक व शिक्षक यांच्यात थेट संवाद साधला गेला व सकारात्मक चर्चा घडली. पालकांनी आपल्या अपेक्षा व मते व्यक्त केली.

विद्यार्थी-पालक संघाचे प्रमुख श्री.डी.बी.पगारे यांनी प्रास्ताविक करून सहविचार सभेची उद्दिष्टे स्पष्ट केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.एस.व्ही.घाणे यांनी केले. माध्यमिक विभागातील सर्व शिक्षकवृंद, वर्गशिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचारी यांच्या अथक परिश्रमामुळे हा पालक मेळावा यशस्वीरीत्या संपन्न झाला.

GO TO HOME PAGE