सन २०२५ हे वर्ष संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज यांचे सप्तशतकोत्तर सुवर्णमहोत्सवी (७५०) जयंतीवर्ष आहे. १५ ऑगस्ट २०२५ रोजी गोकुळअष्टमीस संतश्रेष्ठ श्री ज्ञानदेवांची ७५० वी जयंती असल्याने दि. १४ ऑगस्ट २०२५ रोजी महाराष्ट्रातील प्रत्येक शाळेमध्ये पसायदान म्हणण्यात यावे, असा महाराष्ट्र शासनाने आदेश दिलेला आहे.
त्याअनुषंगाने व त्या कार्यक्रमाच्या तयारीचा भाग म्हणून गुरुवर्य रा.वि.पाटणकर सर्वोदय ज्युनिअर कॉलेजमध्ये मराठी विषय शिक्षक प्रा. संतराम बारवकर यांच्या संकल्पनेतून ‘पसायदान परीचय’ हा उपक्रम सुरु करण्यात आला. या माध्यमातून पसायदानातील ९ ओव्यांचा भावार्थ तथा विश्लेषण नऊ दिवस खालील नऊ शिक्षकांनी केले.
ओवी क्र.१- उपप्राचार्य श्री. बु-हाडे डी.जी.
ओवी क्र.२- श्री. धतुरे ए.एफ.
ओवी क्र.३- श्री. शेंडगे आर.एन.
ओवी क्र.४- श्री. कोटकर एस.बी.
ओवी क्र.५- श्री. तळेकर ए.डी.
ओवी क्र.६- श्री. बारवकर एस.आर.
ओवी क्र.७- कु. सोनार के.एस.
ओवी क्र.८- कु. पवार एम.बी.
ओवी क्र.९- प्राचार्य श्री. बनकर बी.के.
ओवी क्र.९- प्राचार्य श्री. बनकर बी.के.
शासन आदेशाचे पालन करत आज १४ ऑगस्ट २०२५ रोजी विद्यालयामध्ये सामुहिक पसायदान म्हणण्यात आले. याप्रसंगी श्री. संतराम बारवकर यांनी पसायदान जीवनात कशा प्रकारे आचरणात आणावे व त्यामुळे आपले दैनंदिन जीवन सुकर कसे होईल हे विषद केले. याप्रसंगी विद्यालयाचे प्राचार्य श्री.बी.के.बनकर, उपप्राचार्य श्री. बु-हाडे डी.जी. तसेच सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.