October 07/08/09, 2025
पुणे येथे नुकत्याच पार पडलेल्या विभागीय कुस्ती स्पर्धेमध्ये सत्यनिकेतन संचलित गुरुवर्य रा.वि.पाटणकर सर्वोदय विद्या मंदिर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी नेत्रदीपक कामगिरी करत इतिहास घडविला.
या स्पर्धेमध्ये सुवर्णपदक मिळविलेल्या जयेश गणेश बोऱ्हाडे याची रायगड येथे होणा-या राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
१. जयेश गणेश बोऱ्हाडे (११ वी वाणिज्य), ४८ किलो वजनी गट
सुवर्णपदक
२. निलेश गणपत लोहरे (११ वी विज्ञान), ४८ किलो वजनी गट
रौप्यपदक
३. अधिराज राधाकिसन देशमुख (११ वी विज्ञान) ४८ किलो वजनी गट
कांस्यपदक
राजूरसारख्या आदिवासी भागातील विद्यार्थ्यांनी कुस्तीमध्ये अप्रतिम कामगिरी केल्याबद्दल सर्वांचे सर्वत्र कौतुक होत आहे. सत्यनिकेतन संस्थेचे अध्यक्ष ॲड.एम.एन.देशमुख, सचिव श्री.एम.एल.मुठे, कोषाध्यक्ष श्री.विवेकजी मदन व प्राचार्य श्री.बी.के.बनकर यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. साई कुस्ती आखाड्याचे संचालक श्री. तान्हाजी नरके यांच्या अथक परिश्रमातून विभागीय पातळीवर विद्यालयाला हे यश प्राप्त झाले आहे. क्रीडा शिक्षक श्री.तारू व्ही.टी. व श्री.आरोटे जे.आर. यांचेही मोलाचे मार्गदर्शन या विद्यार्थ्यांना लाभले.
विद्यालयातील सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले व राज्यस्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.













