November 14, 2025


‘आम्ही पर्यावरण प्रेमी’ फौंडेशन, महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ, राजूर आगार व गुरुवर्य रा.वि.पाटणकर सर्वोदय विद्या मंदिर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, राजूर यांचे संयुक्त विद्यमाने आज राजूर बस स्थानक परिसरामध्ये वृक्षारोपण व स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.

याप्रसंगी राजुरचे ज्येष्ठ ग्रामस्थ श्री.किरणशेठ माळवे, आगार प्रमुख श्री.रखमा देशमुख, गुरुवर्य रा.वि.पाटणकर सर्वोदय विद्या मंदिर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक श्री.शरद तुपविहिरे व श्री.संतोष कोटकर, ‘आम्ही पर्यावरण प्रेमी’ फौंडेशनचे राहूल राऊत, रमेश लेंभे, किसन पिचड, दत्ता कोंडार, सुनिल बांडे व प्रवासी उपस्थित होते.

आगार प्रमुख श्री.रखमा देशमुख, ‘आम्ही पर्यावरण प्रेमी’ फौंडेशनचे अध्यक्ष श्री.राहूल राऊत व गुरुवर्य रा.वि.पाटणकर सर्वोदय विद्या मंदिर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य श्री.भाऊसाहेब बनकर व उपप्राचार्य श्री.दिपक बुऱ्हाडे या सर्वांनी हे अभियान यशस्वी होण्यासाठी विशेष परिश्रम घेतले.