September 19, 2025
कै.रा.वि. पाटणकर स्मृतिचषक आंतरविद्यालयीन तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा: २०२५-२६
सत्यनिकेतन संस्थेच्या वतीने शुक्रवार दि. १९/०९/२०२५ रोजी कै.रा.वि. पाटणकर स्मृतिचषक आंतरविद्यालयीन तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा गुरुवर्य रा.वि. पाटणकर सर्वोदय विद्या मंदिर येथे आयोजित करण्यात आली. या स्पर्धेमध्ये इ. ५ वी ते ७ वी गटात ३१ विद्यार्थी तर इ. ८ वी ते १० वी गटात ४२ अशा एकूण ७३ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. स्पर्धेचे हे अकरावे वर्ष होते.
स्पर्धेचे उद्घाटन सत्यनिकेतन संस्थेचे सचिव मा.श्री. मुठे एम. एल. साहेब यांनी केले. दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. कै.सावित्रीबाई मदन कन्या निवास अधिक्षिका जोशी मॅडम यांनी स्वागतगीताचे सादरीकरण केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे जेष्ठ संचालक श्री.विजय पवार यांनी केले. अध्यक्षिय भाषणात श्री मुठे साहेब यांनी विद्यार्थी, पालक व शिक्षकांचे कौतुक केले व विद्यार्थ्यांना स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. या प्रसंगी प्राचार्य श्री.बी.के. बनकर, उपप्राचार्य श्री.डी.जी. बु-हाडे, पर्यवेक्षक श्री.जी.बी. मालुंजकर, श्री.प्रकाशजी महाले, श्री.पर्बत सर, श्री.गिरी सर, श्री.लेंडे सर व त्याचबरोबर सर्व सहभागी शाळांचे मुख्याध्यापक, मार्गदर्शक शिक्षक व पालक उपस्थित होते. श्री.पाचपुते डी.एम. यांनी विद्यार्थ्यांना सूचना देऊन स्पर्धेचे नियम समजावून सांगितले. उदघाटन व पारितोषिक वितरण अशा दोन्ही कार्यक्रमांचे सूत्रसंचलन श्रीमती के.एस. वाळुंज यांनी केले.
श्री.दत्तात्रय गुंजाळ, श्री.संजय आव्हाड, श्री.बाळासाहेब कडू व श्री. बाळासाहेब जाधव या संगमनेर तालुक्यातील शिक्षकांनी परीक्षक म्हणून निरपेक्ष काम केले. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी श्री.डी.एम. पाचपुते, श्री.जी.एल. शिंदे, श्री.एन.के. शिंदे, श्री.आर.एन. शेंडगे, श्री.एस.आर. बारवकर, श्री.आर.डी. साबळे, श्री.यु.व्ही. गभाले, श्री.बी.एन. विटकर, सौ.एस.ए. कोल्हाळ, सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी वृंद व विद्यार्थी या सर्वांनी विशेष परिश्रम घेतले.

स्पर्धेचा निकाल:
गट १ :- (इ. ५ वी ते ७ वी)
मा.मधुकररावजी पिचड विद्यालय, राजूर

गट २ :- (इ. ८ वी ते १० वी)
वरील दोन्ही गटातील पहिल्या क्रमांकाच्या विद्यार्थ्यांना सांघिक चषक प्राप्त झाला आहे.
























