शैक्षणिक वर्ष २०२५-२६ पासून संपूर्ण राज्यातील सर्व मान्यता प्राप्त उच्च माध्यमिक शाळा / कनिष्ठ महाविद्यालयातील इयत्ता ११ वीचे प्रवेश ऑनलाईन पध्दतीने व गुणवत्तेनुसार करण्यात येणार आहेत. यापूर्वी महापालिका क्षेत्रातील महाविद्यालयांचा ऑनलाईन प्रवेशामध्ये समावेश होता. यानंतर राज्यातील सर्वच कनिष्ठ महाविद्यालयांसाठी हा नियम लागू करण्यात आला असून आता अकरावीचे प्रवेश ऑनलाईन माध्यमातून होणार आहे.
गुरुवर्य रा.वि.पाटणकर सर्वोदय विद्या मंदिर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षामध्ये इ. ११ वी ची प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने राबविण्यात येणार आहे. यासाठी आवश्यक सर्व तयारी शाळा प्रशासनाने पूर्ण केली आहे. दिनांक १९/०५/२०२५ व २०/०५/२०२५ या कालावधीत Demo Admission प्रक्रिया राबविण्यात आली. या माध्यमातून विद्यार्थी व पालकांना प्रवेशप्रक्रियेसंदर्भात सविस्तर माहिती देण्यात आली. दिनांक २६/०५/२०२५ पासून प्रत्यक्ष प्रवेशप्रक्रिया सुरु झाली आहे.
नोंदणी वेळ: | सकाळी ९.०० ते ४.०० |
नोंदणी कालावधी | २१/०५/२०२५ ते २८/०५/२०२५ |
ठिकाण: | सर्वोदय विद्या मंदिर IT Lab |
संपर्क: |
SHRI. AHER S.D. (9049622732) |
SHRI. TALEKAR A.D. (9604997014) | |
SHRI. BURHADE D.G., Vice-Principal (9921022163) | |
SHRI. BANKAR B.K., Principal (9422266315) |
इयत्ता अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया संदर्भात महत्वाचे मुद्दे

- ऑनलाईन वेळापत्रक संपूर्ण महाराष्ट्र राज्यासाठी एकच असेल.
- विद्यार्थ्याला एकाच ठिकाणी सर्व कॉलेज व त्या कॉलेज मधील सर्व शाखांची माहिती मिळेल तसेच संबधित कॉलेजमध्ये उपलब्ध विषयांची माहिती मिळेल.
- विद्यार्थ्याला ऑनलाईन अर्ज फक्त एकदाचं भरावा लागेल. त्यात तो दहा कॉलेजचे नावे पसंतीक्रमानुसार प्रवेशासाठी टाकू शकतो. कमीत कमीत एक कॉलेज व जास्तीत जास्त दहा कॉलेजेसची नावे टाकता येतील.
- विद्यार्थी स्वतःच्या मोबाईलवरुन अकरावी प्रवेशसाठी ऑनलाईन अर्ज भरू शकेल. संगणकावर देखील अर्ज भरता येतील. मात्र सायबर कॅफेवरुन अर्ज भरु नयेत.
- विदयार्थ्यांना किंवा पालकांना अकरावी प्रवेशासंदर्भातील माहीतीपुस्तीका डाऊनलोड करता येईल. ती माहितीपुस्तिका वाचूनच अर्ज भरावा.
- विद्यार्थी वैयक्तीक माहिती नाव, पत्ता तसेच मागील शाळेची माहिती, दहावीचे विषय, त्यांचे माध्यम, जात-संवर्ग, क्रीडा स्पर्धा व दिव्यांग असेल तर ती माहिती भरावी.
- विद्यार्थ्यांनी आवश्यक कागदपत्रे अपलोड कारावयाचे आहेत. ते व्हेरीफाईड करुनच कॉलेज विदर्यार्थ्यांचा प्रवेश निकषांच्या आधारे निश्चित करेल.
- अर्जातील भाग एक परीपुर्ण भरुन लॉक / प्रमाणीत करण्यासाठी कॉलेजमध्ये किंवा एखादे उपलब्ध मार्गदर्शन केंद्र निवडा. तेथे व्हेरीफिकेशन (प्रमाणीत) केले जाईल. भाग एक च्या डॅशबोर्डवर व्हेरिफाईड असणे आवश्यक आहे.असे नसल्यास असे अर्ज प्रवेश प्रक्रियेसाठी ग्राह्य धरले जाणार नाहीत.
- भाग- एक मधील माहीतीची दुरुस्ती शाळेतुन किंवा मार्गदर्शन केंद्रातून करता येईल.
- अर्जाची प्रिंट काढावी.
- विद्यार्थ्यांना ऑनलाईन अर्ज सादर केल्याबाबतची पोच पावती म्हणून SMS मिळेल.
- सर्व विद्यार्थ्यांना सर्वं कॉलेजचा गुणांचा कट ऑफ पहाता येईल.

- अकरावीला कोणत्याही प्रकारे ऑफलाईन प्रवेश होणार नाहीत. घेतल्यास कार्यवाही होईल.असे घेतलेले प्रवेश संचमान्यतेसाठी व बोर्ड फॉर्म भरणेसाठी पात्र राहणार नाही.
- (MCVC) किमान कौशल्य (HSVC) विभागाचे प्रवेश ऑफलाईन होतील.
- विद्यार्थ्यांचा दहावीचा सीट नंबर हाच त्याचा login id राहील. तो ओपन केल्यावर Get data बटणार क्लिक करुन विद्यार्थ्यांची बोर्ड परीक्षेच्या संदर्भातील माहिती मिळेल. ती व्हेरीफाईड करावी लागेल.
- प्रवेश अर्जाचा पहीला भाग व्हेरीफाईड झाल्यावरच अर्जाच्या भाग दोन मधील पसंतीक्रम व इतर माहीती भरता येईल. यात बेस्ट ऑफ फाईव्ह चे विद्यार्थ्यांचे गुण व शेकडा गुण आपोआप दिसतील. परंतु इतर मंडळाच्या CBSE / ICSE किंवा इतर राज्यातल्या विद्यार्थ्यांना गुण स्वतः भरावे लागतील. यात आय. टी. सारखे विषय वगळून उरलेल्या विषयांचे गुण भरावे लागतील.
- ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी रु 100/- नोंदणी शुल्क विदयार्थी ऑनलाईन पद्धतीने भरतील. ही रक्कम शासनाला मिळेल.
- विद्यार्थ्यांनी जर मेरीट यादी नुसार लागलेल्या कॉलेजला राऊंड मध्ये दिलेल्या तारखांना प्रवेश घेतला नाही तर त्यास रांऊड 3 (R3) पर्यन्त कोठेही प्रवेश घेता घेणार नाही. मात्र अतिरीक्त विशेष फेरी मध्ये त्याला प्रवेश घेता येईल. त्यावेळी त्या कॉलेजला जागा शिल्लक असावयास पाहीजे. नसेल तर अन्य कॉलेज निवडावे लागेल.
- विद्यार्थ्यांनी सायबर कॅफेबर फॉर्म भरु नयेत.
- भरलेला ऑनलाईन अर्ज व्हेरीफाईड करणे, डॅशबोर्ड तपासणे अत्यावश्यक आहे. त्याशिवाय अर्ज ग्राह्य धरला जाणार नाही.
- विद्यार्थी राऊंड चार पर्यंत घेतलेली शाखा मेरीट नुसार बदलवू शकतो.
- विद्यार्थी प्रत्येक राउंड ला कॉलेजचा पसंती क्रम बदलवू शकतो.(पहील्या वेळेस एका पेक्षा जास्त कॉलेज घेतलेले असणे आवश्यक)
- एका मोबाईल / संगणाकावर एकच ऑनलाईन अर्ज भरता येईल अशी सूचना आहे.
- चार राऊंड झाल्यावरच अकरावी कॉलेज अध्ययन कामकाज चालू होईल.

- Zero Round- कोटा प्रवेश इन हाउस व मॅनेजमेन्ट कोटा व इतर कोटा प्रमाणे प्रवेश होतील.
- R1, R2, R3 राऊंड (तीन प्रवेश फेऱ्या)- गुणवत्ता, प्राध्यान्यक्रम व आरक्षण धोरणानुसार प्रवेश होतील.
- अतिरीक्त विशेष फेरी- प्रवेश न मिळालेल्या सर्वांसाठी खुली, गुणवत्ता व प्राध्यान्यक्रम यानुसार प्रवेश फेरी (Open To All) राहील, यात उर्वरीत सर्व प्रवेश तसेच ATKT चे प्रवेश होतील, येथे आरक्षण लागू राहणार नाही.