November 24, 2025
सत्यनिकेतन संस्थेच्या अंतर्गत असणाऱ्या सर्व माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालये, वरिष्ठ महाविद्यालय, आश्रम शाळा या सर्व विभागांचे एकत्रित गणित-विज्ञान प्रदर्शन भरविण्याची संकल्पना सत्यनिकेतन संस्थेचे माजी सचिव श्री.टी.एन.कानवडे यांनी ७ वर्षापूर्वी मांडली होती. सालाबादाप्रमाणे आज २४ नोव्हेंबर रोजी सत्यनिकेतन संस्थांतर्गत ७ व्या गणित-विज्ञान प्रदर्शनाचे यशस्वीरीत्या आयोजन करण्यात आले.
या गणित-विज्ञान प्रदर्शनाच्या उदघाटन प्रसंगी सत्यनिकेतन परिवारातील सर्व शाळा-महाविद्यालयांतील स्पर्धक, संस्था पदाधिकारी, प्राचार्य-उपप्राचार्य, मुख्याध्यापक, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, वसतिगृह कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. संस्थेचे ज्येष्ठ संचालक श्री.विजय पवार यांच्या अध्यक्षतेखाली या गणित-विज्ञान प्रदर्शनाचा उदघाटन सोहळा पार पडला.
यावेळी व्यासपीठावर सत्यनिकेतन संस्थेचे ज्येष्ठ संचालक श्री.व्ही.टी.पाबळकर, अॅड.एम.एन.देशमुख महाविद्यालयाचे प्राचार्य श्री.भाऊसाहेब देशमुख, गुरुवर्य रा.वि.पाटणकर सर्वोदय विद्या मंदिर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य श्री.बी.के.बनकर, सर्वोदय विद्या मंदिर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय खिरवीरेचे प्राचार्य श्री.एम.बी.मोखरे, शेणीत आश्रम शाळेचे मुख्याध्यापक श्री.गभाले सर, नानासाहेब विठोबा देशमुख सर्वोदय विद्या मंदिर कातळापूरचे प्रभारी मुख्याध्यापक श्री.संजय व्यवहारे व ज्येष्ठ शिक्षक श्री.अनिल पवार, गणित-विज्ञान प्रदर्शनासाठी निमंत्रित परीक्षक श्री.वाकचौरे सर व श्री.तेल्लोरे सर, उपप्राचार्य श्री.डी.जी.बुऱ्हाडे, पर्यवेक्षक श्री.जी.बी.मालुंजकर, गणित-विज्ञान प्रदर्शन संस्था-समन्वयक श्री.आर.आर.मढवई व श्रीमती वाळूंज मॅडम, श्रीमती सानप मॅडम, श्री.परबत सर, श्री.गिरी सर व सर्व गणित-विज्ञान विषय शिक्षक उपस्थित होते.
उपप्राचार्य श्री.डी.जी.बुऱ्हाडे यांनी सर्व उपस्थितांचे स्वागत केले व कार्यक्रमाची रूपरेषा विषद केली. गणित-विज्ञान प्रदर्शन संस्था-समन्वयक श्री.आर.आर.मढवई यांनी या प्रदर्शनाचा उद्देश सांगितला. अॅड.एम.एन.देशमुख महाविद्यालयाचे प्राचार्य श्री.भाऊसाहेब देशमुख यांनी आपल्या मनोगतामध्ये आजच्या बदलत्या परिस्थितीमध्ये विज्ञानाचे महत्व स्पष्ट केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री.विजय पवार यांनी विज्ञान व अंधश्रद्धा यातील फरक उदाहरणांसह विषद केला. कार्यक्रमाची अध्यक्षीय सूचना श्री.शशिकांत हेकरे यांनी मांडली व त्यास श्री.अमोल तळेकर यांनी अनुमोदन दिले. श्रीमती वाळूंज मॅडम यांनी या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन केले. गुरुवर्य रा.वि.पाटणकर सर्वोदय विद्या मंदिर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य श्री.बी.के.बनकर यांनी शेवटी सर्वांप्रती ऋण व्यक्त केले.
त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते गणित-विज्ञान प्रदर्शनाच्या दालनांचे फीत कापून व श्रीफळ वाढवून उदघाटन करण्यात आले. मान्यवरांनी विद्यार्थ्यांनी बनविलेल्या प्रत्येक मॉडेलची माहिती समजून घेत विद्यार्थ्यांच्या विज्ञानाप्रती असलेल्या या निष्ठेचे कौतुक केले. सत्यनिकेतन संस्थेच्या अंतर्गत असणाऱ्या सर्व विभागांचे एकूण १२० मॉडेल्स या प्रदर्शनात मांडण्यात आले होते. गुरुवर्य रा.वि.पाटणकर सर्वोदय विद्या मंदिर उच्च माध्यमिक विद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक श्री.शरद तुपविहिरे व श्री.सुरेश शेटे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या तक्ता दालनामध्ये जवळपास ५० तक्ते प्रदर्शानासाठी मांडण्यात आले होते. यावेळी विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड उत्साह पहावयास मिळाला.
सकाळच्या सत्रामध्ये उच्च माध्यमिक विद्यालयातील व दुपारचा सत्रामध्ये माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांना रांगेमध्ये हे गणित-विज्ञान प्रदर्शन दाखविण्यात आले. राजूर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी प्रदर्शनास भेट दिली. विद्यार्थ्यांसोबत आलेले श्री.फलके सर, श्रीमती नंदा भांगरे मॅडम व श्रीमती सरिता आहेर मॅडम यांचा विद्यालयाच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील या बालगोपाळांमध्ये प्रचंड उत्सुकता व आनंद पहावयास मिळाला. 












