October 25, 2025


सत्यनिकेतन संस्थेच्या संस्थापक कोषाध्यक्षा तथा थोर गांधीवादी कार्यकर्त्या कै.सावित्रीबाई मदन यांना २९ व्या पुण्यतिथीनिमित्ताने शनिवार दिनांक २५ ऑक्टोबर २०२५ रोजी सत्यनिकेतन संस्थेतील त्यांच्या स्मृतीस्थळी अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी सत्यनिकेतन परिवारातील सर्व पदाधिकारी, संचालक, सभासद, प्राध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या निमित्ताने सर्वधर्मीय प्रार्थनेचे गायन करण्यात आले. उपस्थित मान्यवरांनी आपल्या मनोगतांमध्ये सावित्रीबाईंच्या पवित्र स्मृतींना उजाळा देत त्यांच्या कार्यकर्तुत्वाचा इतिहास सांगितला. गुरुवर्य रा.वि. पाटणकर, बापूसाहेब शेंडे व सावित्रीबाई मदन या त्रिमुर्तींचा सत्यनिकेतन संस्थेच्या उभारणीमध्ये असलेल्या योगदानाचा मान्यवरांनी उल्लेख केला.

सत्यनिकेतन संस्थेचे जेष्ठ संचालक श्री.प्रकाश टाकळकर, श्री.विजय पवार, श्री.मिलिंद उमराणी, श्री.एस.टी.येलमामे, प्राचार्य श्री.बी.वाय. देशमुख, प्राचार्य श्री.बी.के.बनकर, प्राचार्य श्री.मधुकर मोखरे, मुख्याध्यापक श्री.संपत धुमाळ, पर्यवेक्षक श्री.जी.बी.मालुंजकर, श्री.विनय सावंत, श्रीमती रजनी टिभे, ज्येष्ठ पत्रकार श्री.प्रकाश महाले व त्याचबरोबर सत्यनिकेतन संस्थेच्या सर्व विभागांतील कर्मचारीवर्ग याप्रसंगी मोठ्या संख्येने उपस्थित होता. प्राचार्य श्री.बी.के.बनकर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. श्रीमती सावंत मॅडम यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले.