December 6, 2025


सत्यनिकेतन संस्था आयोजित ‘कै.सावित्रीबाई मदन स्मृतीचषक आंतरविद्यालयीन तालुकास्तरीय मॅरेथॉन स्पर्धा’ अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात पार पडल्या.

‘मैदानी खेळ हे एक उत्तम शिक्षण आहे, जे आपल्याला निरोगी, आनंदी आणि यशस्वी जीवन जगण्यासाठी आवश्यक गुण शिकविते. म्हणून दररोज किमान थोडा वेळ तरी खेळणे महत्वाचे आहे कारण मैदानी खेळातूनच विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होतो’ असे प्रतिपादन सत्यनिकेतन संस्थेचे कोषाध्यक्ष श्री. विवेकजी मदन यांनी याप्रसंगी आयोजित पारितोषिक वितरण समारंभप्रसंगी केले.

याप्रसंगी राजूर पोलीस स्टेशनचे ए.पी.आय. श्री.किशोर पवार, हवालदार शंकर साठे, मेजर मच्छिंद्र पोटकुले, सत्यनिकेतन संथेचे ज्येष्ठ संचालक श्री.मिलिंद उमराणी, श्री.विजय पवार, श्री.श्रीराम पन्हाळे, प्राचार्य श्री.भाऊसाहेब बनकर, पर्यवेक्षक श्री.गोरक्ष मालुंजकर, श्री.विजय काळे, श्री.पप्पू टिंगीया, श्री.दत्ता परते, श्री.सचिन मुंढे, श्री.किरण होलगीर, श्री.रोहिदास लहामगे, श्री.लहानू परबत, श्री.मनोहर लेंडे, श्री.सदाशिव गिरी तसेच सत्यनिकेतन परिवारातील सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. ज्येष्ठ शिक्षक श्री.धनंजय पगारे यांनी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

प्राचार्य श्री.भाऊसाहेब बनकर यांच्या मार्गदर्शनाखाली क्रीडा शिक्षक श्री.विनोद तारू व श्री.जालिंदर आरोटे यांनी या स्पर्धेचे उत्कृष्ठ नियोजन केले होते. या मॅरेथॉन स्पर्धेसाठी राजूर पोलीस स्टेशनच्या सर्व कर्मचाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. प्राथमिक आरोग्य केंद्र राजूर व विठे यांनी रुग्णवाहिका तैनात ठेऊन सर्व स्पर्धकांची चांगली काळजी घेतली.


तालुकास्तरीय मॅरेथॉन स्पर्धेचा निकाल-

मुले
प्रथम  भोजणे वैष्णव सखाराम न्यू हायस्कूल, लिंगदेव
द्वितीय  भांगरे कृष्णा वसंत मा.मधुकरराव पिचड विद्यालय, पाडोशी
तृतीय  साबळे प्रवीण दत्तू मा.मधुकरराव पिचड विद्यालय, पाडोशी
चतुर्थ  नवाळी निर्भय सोमनाथ सर्वोदय विद्या मंदिर, राजूर
उत्तेजनार्थ पथवे वेदांत शिवाजी सर्वोदय विद्या मंदिर, राजूर

मुली
प्रथम  साबळे कोमल सुरेश मा.मधुकरराव पिचड विद्यालय, पाडोशी
द्वितीय  नाडेकर माधुरी आनंदा मा.मधुकरराव पिचड विद्यालय, पाडोशी
तृतीय  साबळे जयश्री कैलास मा.मधुकरराव पिचड विद्यालय, पाडोशी
चतुर्थ  तळपाडे अंकिता काळू मा.मधुकरराव पिचड विद्यालय, पाडोशी
उत्तेजनार्थ कोंडार ऋतुजा रोहिदास समर्थ माद्यामिक विद्यालय, मवेशी
उत्तेजनार्थ धोंगडे कार्तिकी हरिदास सर्वोदय विद्या मंदिर, राजूर

GO TO HOME PAGE