September 15-18, 2025
Mandatory Biometric Updation (MBU) Camp
‘अकोले गट साधन केंद्र, अकोले’ करिता तीन आधार कार्ड युनिट सुरु झालेले असून अकोले तालुक्यातील सर्व माध्यमाचे सर्व व्यवस्थापन शाळेतील इयत्ता १ ली ते १२ वी च्या विद्यार्थ्यांची आधार कार्ड नोंदणी व दुरुस्ती करायची आहे.
या अनुषंगाने शिक्षण विभाग, पंचायत समिती अकोले, भारतीय डाक विभाग व गुरुवर्य रा.वि. पाटणकर सर्वोदय विद्या मंदिर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, राजूर यांचे संयुक्त विद्यमाने आजपासून विद्यालयामध्ये मोफत आधार कार्ड नोंदणी व दुरुस्ती शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे. दिनांक १५ सप्टेंबर २०२५ ते १८ सप्टेंबर २०२५ या कालावधीमध्ये चार दिवस ही सुविधा विद्यार्थ्यांसाठी सुरु राहणार आहे. या सुवर्णसंधीचा संबंधित शाळांनी अवश्य लाभ घ्यावा असे आवाहन शिक्षण विभागामार्फत करण्यात आलेले आहे.
आज दिनांक १५ सप्टेंबर २०२५ रोजी विद्यालयामध्ये ‘आधार कार्ड नोंदणी व दुरुस्ती’ सेवा सुरु झाली. विद्यालयाचे प्राचार्य श्री.बी.के.बनकर, उपप्राचार्य श्री.डी.जी.बु-हाडे व पर्यवेक्षक श्री.जी.बी.मालुंजकर यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व शिक्षकांना या संदर्भात अवगत करण्यात आले. यावेळी भारतीय डाक विभागाच्या कर्मचाऱ्यांनी उपस्थित सर्व शिक्षकांना या प्रक्रियेसंदर्भात मार्गदर्शन केले. विद्यालयातर्फे भारतीय डाक विभागाच्या कर्मचाऱ्यांचे स्वागत करण्यात आले.












