October 01, 2025


राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीदिनाच्या पूर्वसंध्येला आज दिनांक १ ऑक्टोबर २०२५ रोजी गुरुवर्य रा.वि.पाटणकर सर्वोदय विद्या मंदिर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात स्वच्छता मोहीम राबविली गेली. विद्यार्थ्यांमध्ये स्वच्छतेबद्दल जागरूकता निर्माण करणे व त्यांच्यातील जबाबदारीच्या मूल्यांना प्रोत्साहन देणे हा या मोहिमेमागचा मुख्य उद्देश होता. याच मूल्यांचे स्वतः महात्मा गांधी यांनी समर्थन केले होते.

सकाळच्या सत्रात उच्च माध्यमिक विभागाच्या व दुपारच्या सत्रात माध्यमिक विभागाच्या विद्यार्थ्यांनी या स्वच्छता मोहीमेमध्ये सक्रियपणे व उत्साहाने सहभाग घेतला होता. या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांनी शालेय परिसर स्वच्छ करून शाळेप्रती असलेली आपली निष्ठा व तळमळ व्यक्त केली.

हा उपक्रम म्हणजे विद्यार्थ्यांमध्ये शाळेबद्दल तसेच पर्यावरणाबद्दल जागरूकता वाढवण्याच्या दृष्टीने टाकलेले एक पाऊल आहे. त्याचबरोबर विद्यार्थ्यांमध्ये नागरी जबाबदारीची भावना निर्माण करण्याच्या व्यापक प्रयत्नांचा एक भाग आहे असे प्रतिपादन याप्रसंगी विद्यालयाचे प्राचार्य श्री.बी.के.बनकर यांनी केले. उपप्राचार्य श्री.डी.जी.बु-हाडे व पर्यवेक्षक श्री.जी.बी.मालुंजकर यांनीही विद्यार्थ्यांना या उपक्रमाबद्दल माहिती दिली. विद्यार्थ्यांबरोबरच माध्यमिक व उच्च माध्यमिक या दोन्ही विभागाच्या शिक्षकांनी देखील या उपक्रमामध्ये सक्रिय सहभाग घेतला होता.

GO TO HOME PAGE