ॲड.एम.एन.देशमुख महाविद्यालय संचलित ‘साई कुस्ती आखाडा’ व ‘गुरुवर्य रा.वि.पाटणकर सर्वोदय विद्या मंदिर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय’, राजूर, ता.अकोले यांचे संयुक्त विद्यमाने ॲड.एम.एन.देशमुख महाविद्यालयाच्या सुसज्ज अशा इनडोअर स्टेडीअममध्ये भव्य तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेचे दिनांक २९/०८/२०२५ रोजी आयोजन करण्यात आले.

अकोले तालुक्याचे आमदार डॉ. किरणजी लहामटे यांचे शुभहस्ते व योगी केशव बाबा चौधरी यांचे प्रमुख उपस्थितीत या स्पर्धेचे उदघाटन करण्यात आले. सामर्थ्याचे प्रतिक असलेल्या श्री हनुमानजींच्या मूर्तीचे अनावरणही यावेळी प्रमुख अतिथींच्या शुभहस्ते करण्यात आले. याप्रसंगी सत्यनिकेतन संस्थेचे सचिव श्री. एम.एल.मुठे, श्री. एस.टी.येलमामे, श्री. रामशेठ पन्हाळे, श्री. विलासराव नवले, श्री. व्ही.टी.पाबळकर, प्राचार्य श्री. बी.वाय.देशमुख, प्राचार्य श्री. बी.के.बनकर, प्राचार्य श्री. एम.बी.मोखरे, प्राचार्य श्री. एस.आर.धुमाळ, प्राचार्य श्री. किरण भागवत, उपप्राचार्य श्री. डी.जी.बुऱ्हाडे, श्री. सतिष काळे, श्री. एल.पी.पर्बत व श्री. एस.आर.गिरी आदी मान्यवर उपस्थित होते.

अतिशय प्रतिष्ठित अशा समजल्या जाणा-या या स्पर्धेमध्ये तालुक्यातील इतर शाळांच्या विद्यार्थ्यांबरोबरच सत्यनिकेतन संचलित गुरुवर्य रा.वि.पाटणकर सर्वोदय विद्या मंदिर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांनीदेखील घवघवीत यश मिळविले-


14 वर्षे मुले
1. शेळके साईराज लक्ष्मण- 35 Kg प्रथम
2. शेख अबुजर मोहम्मद शरीफ- 44 Kg प्रथम


17 वर्षे मुले (फ्री स्टाईल)
1. देशमूख आधिराज राधाकिसन- 45 Kg प्रथम
2. बोऱ्हाडे जयेश गणेश- 48 Kg प्रथम
3. चौधरी सार्थक बाळासाहेब- 51 Kg प्रथम
4. मुर्तडक सुरज संजय- 55 Kg प्रथम
5. येलमामे युवराज जालिंदर- 65 Kg प्रथम
6. देशमुख करण काळू- 65 Kg द्वितीय
7. चौगले संस्कार बाळासाहेब- 80 Kg प्रथम


17 वर्ष मुले (ग्रीको रोमन)
1. देशमूख विराज नामदेव- 45 Kg प्रथम
2. लोहरे निलेश गणपत- 48 Kg प्रथम
3. लेंडे आयूष श्रीराम- 51 Kg द्वितीय
4. सोनुले राहूल दिगंबर- 55 Kg प्रथम


17 वर्षे मुली (फ्री स्टाईल)
1. जाधव ईश्वरी पोपट- 49 Kg प्रथम
2. तनपुरे श्रावणी अमोल-  53 Kg प्रथम


19 वर्ष मुले (फ्री स्टाईल)
1. वाळेकर अनिकेत संपत- 57 Kg प्रथम
2. भांगरे अनिकेत काळू- 61 Kg द्वितीय
3. सोडनर दौलत बळीराम- 65 Kg प्रथम


सत्यनिकेतन संस्थेचे अध्यक्ष ॲड.एम.एन.देशमुख, सचिव श्री.एम.एल.मुठे, कोषाध्यक्ष श्री.विवेकजी मदन व प्राचार्य श्री.बी.के.बनकर यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. साई कुस्ती आखाड्याचे संचालक श्री.तान्हाजी नरके, क्रीडा शिक्षक श्री.तारू व्ही.टी., श्री.आरोटे जे.आर., श्री.विकासराव नवले व तालुक्यातील सर्व क्रीडा शिक्षकांनी व क्रीडा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी स्पर्धेच्या यशस्वितेसाठी विशेष परिश्रम घेतले.


GO TO HOME PAGE