SVM Teacher's Day 2025

गुरुवर्य रा.वि.पाटणकर सर्वोदय विद्या मंदिर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात आज ५ सप्टेंबर २०२५ रोजी भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीचे औचित्य साधून शिक्षकदिन उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त विद्यार्थ्यांच्या सक्रिय सहभागातून माध्यमिक व उच्च माध्यमिक दोन्ही विभागामध्ये स्वतंत्ररीत्या हा दिन साजरा करण्यात आला.

सकाळच्या सत्रात उच्च माध्यमिक विभागातील विद्यार्थ्यांनी तसेच दुपारच्या सत्रात माध्यमिक विभागातील विद्यार्थ्यांनी प्राचार्य, उपप्राचार्य, शिक्षक व परिचर या भूमिका योग्यरित्या पार पाडून शाळेचे संपूर्ण व्यवस्थापन उत्तमरीत्या हाताळले.

याप्रसंगी शेवटी आयोजित कार्यक्रमांची रूपरेषा विद्यार्थ्यांनी आखली. डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन करण्यात आले. विद्यार्थी-शिक्षकांनी आपल्याला आलेले अनुभव व आपली मनोगते व्यक्त केली. विद्यार्थ्यांनी आपल्या गुरूंच्या प्रति आदर दाखवत त्यांचा सत्कार केला.

विद्यालयाचे प्राचार्य श्री.बी.के.बनकर, उपप्राचार्य श्री.डी.जी.बु-हाडे, पर्यवेक्षक श्री.जी.बी.मालुंजकर तसेच सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यावेळी उपस्थित होते. माध्यमिक विभाग कार्यक्रम प्रमुख श्री.एस.एच.हेकरे व सौ.आर.पी.सानप तसेच उच्च-माध्यमिक विभाग कार्यक्रम प्रमुख श्रीमती एस.डी.नवाळी व कुमारी मधुमंजीरी पवार यांनी या कार्यक्रमाचे उत्कृष्ठ नियोजन केले. कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थी-शिक्षकांना अल्पोपहार देण्यात आला.

GO TO HOMEPAGE