December 17, 2025
मुंबई असोसिएट एन.सी.सी. ऑफिसर वेल्फेअर बोर्ड, महाराष्ट्र राज्य यांच्या पुढाकाराने राष्ट्रीय छात्र सेना अधिकारी सन्मान सोहळा नुकताच कुर्ला, मुंबई येथे दिमाखात झाला. हा सोहळा ब्रिगेडिअर शिरीष ढोबळे, कॅप्टन मनोज भामरे, कॅप्टन आशिष दामले, मिस सुमनसिंग यांच्या हस्ते दिमाखात पार पडला. एनसीसीच्या माध्यमातून तरुण पिढीला शिस्तबद्ध, जबाबदार व देशप्रेमी घडवणाऱ्या अधिकारी वर्गाच्या कार्याचा गौरव करण्यासाठी या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
गुरुवर्य रा.वि.पाटणकर सर्वोदय विद्या मंदिर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक, फर्स्ट ऑफिसर श्री. संजय रामचंद्र देशमुख तसेच अॅड.एम.एन.देशमुख महाविद्यालयाचे प्रा. कॅप्टन रोहित मुठे यांना राज्यस्तरीय बेस्ट एनसीसी ऑफिसर अवॉर्ड देऊन सन्मानित करण्यात आले. विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्वगुण, आत्मविश्वास, सामाजिक बांधिलकी आणि राष्ट्रभक्ती रुजवण्याचे कार्य एनसीसी अधिकारी करत असल्याचे मान्यवरांनी सांगितले.
एनसीसी अधिकारी, कॅडेट्स आणि नागरिकांच्या उपस्थितीत हा सन्मान सोहळा प्रेरणादायी आणि उत्साही वातावरणात यशस्वीरीत्या झाला. यानिमित्ताने संजय देशमुख तसेच रोहीत मुठे यांचे सर्वत्र कौतुक होत असून सत्यनिकेतन संस्थेचे अध्यक्ष अॅड. मनोहरराव देशमुख, सचिव एम.एल. मुठे, कोषाध्यक्ष विवेकजी मदन, माजी सचिव टी.एन. कानवडे, संचालक मिलिंदशेठ उमराणी, प्रकाश टाकळकर, विजय पवार, एस. टी. येलमामे, श्रीराम पन्हाळे, विलासराव नवले, प्रकाश महाले यांसह प्राचार्य डॉ. भाऊसाहेब देशमुख, प्राचार्य भाऊसाहेब बनकर, मधुकर मोखरे, उपप्राचार्य दिपक बुऱ्हाडे तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी यांनी त्यांचे अभिनंदन केले.














