December 22,23 & 24, 2025
विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी, त्यांच्यातील आत्मविश्वास वाढवण्यासाठी, सांघिक भावना निर्माण करण्यासाठी, संस्कृती आणि परंपरा जतन करण्यासाठी व त्याचबरोबर शैक्षणिक वर्षातील यशाचा आनंद साजरा करण्यासाठी शाळा कॉलेजेसमध्ये वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा आयोजित केला जातो. हा सोहळा म्हणजे केवळ एक मनोरंजन नसून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि शाळेच्या सकारात्मक वातावरणासाठी एक महत्त्वाचा उपक्रम आहे.
याच अनुषंगाने गुरुवर्य रा.वि.पाटणकर सर्वोदय विद्या मंदिर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये तीन दिवस वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा पार पडला. दिनांक २२ डिसेंबर रोजी उच्च माध्यमिक विभागाचा व दिनांक २३ डिसेंबर रोजी माध्यमिक विभागाचा विविध गुणदर्शन कार्यक्रम अतिशय उत्साहात व यशस्विरीत्या पार पडला. विद्यार्थ्यांच्या उत्कृष्ट शैक्षणिक, क्रीडा आणि इतर सांस्कृतिक कामगिरीची दखल घेण्यासाठी, त्यांचे कौतुक करण्यासाठी आणि त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी दिनांक २४ डिसेंबर रोजी वार्षिक पारितोषिक वितरण सोहळा आयोजित करण्यात आला. प्राचार्य श्री.बी.के.बनकर व उपप्राचार्य श्री.डी.जी.बुऱ्हाडे यांच्या नेतृत्वाखाली तसेच विभाग प्रमुख श्री.बाळासाहेब घिगे व श्रीमती कविता वाळुंज यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यालयातील सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी हे वार्षिक स्नेहसंमेलन यशस्वी करण्यासाठी प्रचंड मेहनत घेतली.

उदघाटन व विविध गुणदर्शन: उच्च माध्यमिक
शुभहस्ते: मा.श्री.के.जी.पवार साहेब, पोलीस निरीक्षक राजूर पोलीस स्टेशन
प्रमुख उपस्थिती: मा.श्री.भास्कर येलमामे व मा.श्री.विलास पाबळकर
परीक्षक: मा.श्री.विलास गोसावी व मा.प्रा.श्री.सुदाम शिंदे
सूत्रसंचलन: श्री.सचिन लगड






उदघाटन व विविध गुणदर्शन: माध्यमिक
शुभहस्ते: मा.श्री.संतोष बनसोडे- उपसरपंच ग्रामपंचायत राजूर
प्रमुख उपस्थिती: मा.श्री.गोकुळशेठ कानकाटे, मा.श्री.विवेकजी मदन, मा.श्री.एम.एल.मुठे, मा.श्री.विजय पवार, मा.श्री.कचरे साहेब, मा.श्री.काशिनाथ भडांगे, मा.श्री.रामभाऊ मुतडक, मा.श्री.श्रीकांत वालतुले, मा.श्री.जयराम धादवड, मा.श्री.गौरवशेठ माळवे, मा.श्री.बाळासाहेब चोथवे, मा.श्री.योगेशशेठ वाकचौरे, श्रीमती जाधव ताई, श्रीमती माळवे ताई
परीक्षक: श्रीमती बिना सावंत व श्रीमती स्मिता हासे
सूत्रसंचलन: श्रीमती वाळुंज मॅडम, श्रीमती सानप मॅडम, श्रीमती मेंगाळ मॅडम, श्री.घाणे सर








वार्षिक पारितोषिक वितरण
शुभहस्ते: मा.श्री.पंकज एम.मुठे, ‘आयर्नमॅन कॅलिफोर्निया’ विजेते
प्रमुख उपस्थिती: मा.आ.डॉ.किरणजी लहामटे, मा.श्री.सतीशजी भांगरे, मा.श्री.विवेकजी मदन, मा.श्री.एम.एल.मुठे, मा.श्री.विलासजी नवले, मा.श्री.निलेशशेठ देशमुख, मा.श्री.कचरे साहेब, मा.श्रीमती मैड ताई, मा.श्री.प्रकाशजी महाले, मा.श्री.विजय पवार, मा.श्री.टी.एन.कानवडे, मा.श्री.पी.पी.टाकळकर, मा.श्री.एस.टी.येलमामे, मा.श्री.विलास पाबळकर, मा.डॉ.बी.वाय.देशमुख, मा.श्री.संपत धुमाळ, मा.श्री.बादशाह ताजणे, मा.श्री.लहानू परबत, मा.रजनी टिभे, मा.श्री.तान्हाजी नरके
सूत्रसंचलन: श्री.संतराम बारवकर व श्री.दीपक पाचपुते



















