December 12, 2025
आग लागण्याची शक्यता कुठेही नाकारता येत नाही. अग्निसुरक्षा (फायर सेफ्टी) म्हणजे आग रोखण्यासाठी व आगीशी संबंधित अपघातांचा धोका कमी करण्यासाठी आणि आग लागल्यास व्यक्ती आणि मालमत्तेची सुरक्षितता करण्यासाठी घेतलेली खबरदारी व प्रक्रिया.
गुरुवर्य रा.वि.पाटणकर सर्वोदय विद्या मंदिर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये मुंबई महानगरपालिकेतील अग्निशामक श्री.पंढरीनाथ मुठे यांनी विद्यार्थ्यांना आपत्कालीन परिस्थितीत अग्नीशमन व्यवस्थेचा वापर कसा करायचा यासंदर्भात माहीती दिली. Fire Extinguisher चा वापर कसा करावा याचे प्रात्यक्षिक त्यांनी विध्यार्थ्यांना दाखविले.
श्री.पंढरीनाथ मुठे हे विद्यालयाचे माजी विद्यार्थी असून गेल्या १५ वर्षांपासून मुंबई महानगरपालिकेच्या अतिशय आव्हानात्मक अशा अग्निशमन दलामध्ये अग्निशामक पदावर कार्यरत आहेत. त्यांचा विद्यालयाच्या वतीने यथोचित सन्मान करण्यात आला. याप्रसंगी व्यासपीठावर उपप्राचार्य श्री.दिपक बुऱ्हाडे, ज्येष्ठ शिक्षक श्री.आण्णासाहेब धतुरे, श्री.रमेश शेंडगे, श्री.शरद तुपविहिरे, खाडे मॅडम, पवार मॅडम, मंगळा देशमुख उपस्थित होते.











