February 20, 2026


Naoroji Godrej Centre for Plant Research (नौरोजी गोदरेज सेंटर फॉर प्लांट रिसर्च), Shirwal आणि Maharashtra Gene Bank (महाराष्ट्र जनुक कोश विभाग) यांच्या संयुक्त विद्यमाने आज हॉटेल रविराज, अकोले येथे तालुकास्तरीय पोस्टर प्रेझेंटेशन स्पर्धा आयोजित केली गेली.

या स्पर्धेमध्ये गुरुवर्य रा.वि.पाटणकर सर्वोदय विद्या मंदिर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील १५ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. यातील इयत्ता नववीच्या विद्यार्थिनी कु.आचल संतोष मुठेकु.समीना मोहम्मद शेख यांना उत्तेजनार्थ असलेले विशेष बक्षिस देऊन गौरविण्यात आले.

विद्यार्थ्यांमध्ये जैवविविधता व पर्यावरणविषयक जागृती करणे, ग्रामीण भारतीय संस्कृतीची ओळख करून देणे, औषधी तथा दुर्मिळ वनस्पतींविषयी विद्यार्थ्यांना अवगत करणे, शेतीविषयक नवनवीन तंत्रज्ञान समजावून सांगणे, सेंद्रिय शेतीला प्राधान्य देणे, स्थानिक बी-बियाणांचे संवर्धन करणे यासारखे प्रमुख उद्दिष्ट्ये डोळ्यासमोर ठेऊन या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. अकोले तालुक्यातील १५ शाळा मिळून जवळपास १५० स्पर्धकांनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता.

याप्रसंगी आयोजित समारंभात विद्यालयाचे प्राचार्य श्री.बी.के.बनकर, उपप्राचार्य श्री.डी.जी.बुऱ्हाडे, पर्यवेक्षक श्री.जी.बी. मालुंजकर, श्री.दीपक पाचपुते, श्री.धनंजय पगारे, श्री.अमोल तळेकर व श्री.तातळे सर उपस्थित होते. प्राचार्य श्री.बी.के.बनकर व उपप्राचार्य श्री.डी.जी.बुऱ्हाडे यांनी आपल्या मनोगतामध्ये गोदरेज कंपनीच्या या स्तुत्य उपक्रमाचे कौतुक केले. आपल्या विद्यालयाच्या परसबागेसाठी गोदरेज कंपनीकडून बियाणे व रोपे देण्यात आली होती. या बियाणांचे व रोपांचे यशस्वीरीत्या संवर्धन केल्याबद्दल कंपनीच्या वतीने विद्यालयाचा विशेष सत्कार करण्यात आला.

पुणे विद्यापीठातील सेवानिवृत्त प्राध्यापिका श्रीमती डॉ.झेलम कान्हेरे, भारती विद्यापीठातील पर्यावरणशास्त्र विभागाच्या प्राध्यापिका श्रीमती डॉ.अर्चना कल्याणी, नौरोजी गोदरेज सेंटर फॉर प्लांट रिसर्चच्या जेष्ठ संशोधक श्रीमती डॉ.क्रांती यार्डी, महाराष्ट्र जनुक कोश विभागाचे प्रकल्प अधिकारी श्री.रोहित कुंभार, प्रतिक देसाई, ज्योती भोये व बाळकृष्ण आवळे हे सर्व मान्यवर या कार्यक्रमासाठी उपस्थित होते.


या स्पर्धेमध्ये विद्यालयातील खालील विद्यार्थी सहभागी झाले होते. या सर्व विद्यार्थ्यांना सहभागाचे प्रमाणपत्र व भेटवस्तू देण्यात आली.

1. आचल वाल्मिक लहामगे- 8 वी
2. साहिल सागर उंबरे- 8 वी
3. नेहान वसीम तांबोळी- 8 वी
4. शौर्या शशिकांत हेकरे- 8 वी
5. समीना मोहम्मद शेख- 9 वी
6. अलिशा अश्पाक मनियार- 9 वी
7. कृष्णा प्रकाश दहीतुले- 9 वी
8. आचल संतोष मुठे- 9 वी
9. पलक जगदीश महाले- 9 वी
10. प्रमीला बाळू मुठे- 9 वी
11. साई आनंद नवाळी- 9 वी
12. मैड अथर्व रविंद्र- 9 वी
13. हमजा असीफ तांबोळी- 9 वी
14. ओंकार अशोक भांगरे- 9 वी
15. कार्तिक अनिल देशमुख- 9 वी

GO TO HOME PAGE