July 21, 2025 to
July 25, 2025
ॲबॅकस हे मण्यांच्या सहाय्याने गणना करण्यासाठी वापरले जाणारे एक पारंपारिक गणितीय साधन आहे. यामध्ये एका चौकटीत असलेल्या उभ्या सळ्यांमधील मणी सरकवून बेरीज, वजाबाकी, गुणाकार आणि भागाकार यांसारख्या क्रिया केल्या जातात. जरी हे साधन मोजणीसाठी वापरले जात असले, तरी आधुनिक काळात याचा मुख्य वापर मुलांच्या मेंदूच्या विकासासाठी केला जातो, ज्यामुळे त्यांना संख्यांचे दृश्यीकरण करून अत्यंत वेगाने आकडेमोड करण्यास मदत होते. ॲबॅकसच्या सरावामुळे मेंदूच्या डाव्या आणि उजव्या दोन्ही भागांना चालना मिळते, ज्यामुळे मुलांची एकाग्रता, स्मरणशक्ती आणि गणितातील आत्मविश्वास लक्षणीयरीत्या वाढतो.
गुरुवर्य रा.वि.पाटणकर सर्वोदय विद्या मंदिर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये शिक्षण विभाग जिल्हा परिषद, अहिल्यानगर व एवरेस्ट अबॅकस अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमानाने ‘माझी शाळा – माझे अबॅकस’ या नावीन्यपूर्ण उपक्रमांतर्गत दि. 27/07/2025 ते 25/7/2025 या कालावधीत पाच दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना बेरीज-वजाबाकी या क्रिया जलद कशा कराव्यात यासाठी विद्यार्थ्यांच्या स्पर्धा घेण्यात आल्या. या स्पर्धेतून यशस्वी विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली-
१. कु. चौधरी मयुरी भगवंता, (इ.५ वी- ब)
२. बोटे श्रावणी विठ्ठल (इ.५ वी- ब)
३. सोनुले मनीष भाऊसाहेब (इ.६ वी- अ)
४. भांगरे शरण्या विनायक (इ.६ वी- ब)
५. मुतडक सिया निलेश (इ.६ वी- क)
वरील सर्व स्पर्धकांना ‘एव्हरेस्ट अबॅकस अकॅडमी’ मार्फत मेडल देऊन त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. याप्रसंगी आयोजित कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्यालयाचे प्राचार्य श्री.जी.बी. मालुंजकर होते. उपप्राचार्य श्री.डी.जी. बुऱ्हाडे हेदेखील या कार्यक्रमास उपस्थित होते. शिक्षक मनोगतामध्ये सौ.झोळेकर मॅडम व सौ.कांचन गुजर मॅडम यांनी आपली मनोगते व्यक्त केली. काही विद्यार्थ्यांनी या कार्यशाळेविषयीचा आपला अनुभव सांगितला. श्री.धनंजय लहामगे, सौ..वंदना सोनवणे, सौ.सिमा बिडवे व सौ.रीना राठोड यांनी या कार्यशाळेचे उत्कृष्ठ नियोजन केले.












