Unmukt- Poetry Collection-Ghane Sir Poems_1

April 1, 2026


इन्कलाब पब्लिकेशन्स (Inkalab Publications) ही मुंबईतील एक उदयोन्मुख आणि लोकप्रिय साहित्यिक पुस्तक प्रकाशन संस्था आहे. या प्रकाशनाने आपल्या दर्जेदार साहित्यिक सेवांमुळे वाचकांमध्ये आणि लेखकांमध्ये अल्पावधीतच चांगली ओळख निर्माण केली आहे. हे प्रकाशन प्रामुख्याने काव्यसंग्रह आणि कथासंग्रह यांसारख्या विविध साहित्यिक कलाकृतींवर लक्ष केंद्रित करते आणि नवोदित लेखकांना त्यांचे साहित्य जागतिक स्तरावर नेण्यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध करून देते. त्यांच्या उपक्रमांमध्ये अनेकदा विविध विषयांवरील काव्य-संग्रहांचा समावेश असतो आणि उत्कृष्ट योगदानासाठी ते लेखकांना सन्मानीतही करतात. आधुनिक काळात ही संस्था Amazon आणि Flipcart सारख्या ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून आपली पुस्तके जगभरातील वाचकांपर्यंत पोहोचवत आहे.

हिंदी कवी श्री.रविंद्र कुमार यांचा ‘उन्मुक्त’ हा एक अतिशय लोकप्रिय काव्यसंग्रह आहे. यामध्ये विविध कवींच्या कवितांचे संकलन करण्यात आले आहे. या संग्रहाचे संपादन स्वतः श्री.रविंद्र कुमार यांनी केले आहे. ते साहित्य विश्वात कवी आणि लेखक म्हणून सक्रिय आहेत. ‘उन्मुक्त’ या शब्दाचा अर्थ ‘बंधनांपासून मुक्त’ असा होतो. या संग्रहातील कविता मानवी संवेदना, स्वातंत्र्य, समाज आणि समकालीन जीवनाच्या विविध पैलूंवर आधारित आहेत.

एखाद्या नामवंत साहित्यिकाच्या मार्गदर्शनाखाली आणि प्रतिष्ठित प्रकाशकाच्या संग्रहात आपली रचना समाविष्ट होणे, ही कोणत्याही कवीच्या प्रतिभेला मिळालेली सर्वोच्च पावती आणि त्याच्या साहित्यिक प्रवासातील अत्यंत अभिमानास्पद बाब असते.

गुरुवर्य रा.वि. पाटणकर सर्वोदय विद्या मंदिर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील ज्येष्ठ हिंदी विषय-शिक्षक श्री.श्रीकांत घाणे यांच्या ‘किनारा’ व ‘असलीयत’ या दोन कविता कवी रविंद्र कुमार यांच्या ‘उन्मुक्त’ या काव्य संग्रहामध्ये नुकत्याच प्रकाशित झाल्या. संपूर्ण शिक्षण क्षेत्रासाठी आणि आपल्या विद्यालयासाठी ही अत्यंत भूषणावह बाब आहे. श्री.श्रीकांत घाणे यांनी आपल्या शब्दसामर्थ्याने साहित्याच्या दरबारात विद्यालयाचा नावलौकिक उंचावला असून, त्यांच्या या कामगिरीमुळे शिक्षक म्हणून असलेल्या त्यांच्या सर्जनशील प्रतिभेवर शिक्कामोर्तब झाले आहे.

श्री.श्रीकांत घाणे त्यांच्या या उत्तुंग यशाबद्दल विद्यालयाच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. सत्यनिकेतन संस्थेचे सचिव श्री.एम.एल.मुठे, कोषाध्यक्ष श्री.विवेकजी मदन, विद्यालयाचे प्राचार्य श्री.भाऊसाहेब बनकर, उपप्राचार्य श्री. दिपक बुऱ्हाडे, पर्यवेक्षक श्री.गोरख मालुंजकर व त्याचबरोबर सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी त्यांचे कौतुक करत अभिनंदन केले व त्यांना भावी काव्यप्रवासासाठी अनंत शुभेच्छा दिल्या.

GO TO HOME PAGE