May 3, 2026
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या HSC बोर्ड परीक्षा २०२६ चा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला. अकोले तालुक्यातील आदिवासी विभागातील राजूरमधील मुख्य शैक्षणिक केंद्र असलेल्या सत्यनिकेतन संचलित गुरुवर्य रा.वि.पाटणकर सर्वोदय विद्या मंदिर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाने याही वर्षी उत्कृष्ठ निकालाची परंपरा कायम राखली.
कॉपीमुक्त व तणावमुक्त वातावरणात पार पडलेल्या या परीक्षेमध्ये सर्वोदयच्या विद्यार्थ्यांनी मिळवलेले हे यश खरोखरच कौतुकास्पद व अभिमानास्पद आहे.
विशेष बाब म्हणजे यावर्षीच्या निकालामध्ये सर्वोदयच्या विद्यार्थ्यांनी नेत्रदीपक कामगिरी करत अकोले तालुक्यामध्ये आपला दबदबा व शैक्षणिक गुणवत्ता सिद्ध केली.
विद्यालयाचा एकूण निकाल 81.93%
| कला शाखा निकाल- 83.04% |
| प्रथम– कु. पुजा कैलास भांगरे- 87.50 % |
| द्वितीय– कु. सारीका लक्ष्मण मुंढे- 82.33% |
| तृतीय– साहील शंकर सोनवणे- 82.17% |
| वाणिज्य शाखा निकाल- 85.96% |
| प्रथम– जालिंदर भगवंता हिले- 88.17 % |
| द्वितीय– अरुण रामदास लेंडे- 81.50% |
| तृतीय– कु. आकांक्षा ज्ञानेश्वर बोऱ्हाडे- 74.17% |
| विज्ञान शाखा निकाल- 79.22% |
| प्रथम– कु. प्रिया विजय हेकरे- 80.00 % |
| द्वितीय– कु. पूर्वा मंगेश लहामगे- 74.17% |
| तृतीय– अल्फैज अश्पाक खाटीक- 72.83% |

तालुक्यातील कामगिरी
• वाणिज्य शाखेचा विद्यार्थी जालिंदर भगवंता हिले हा 88.17% गुण मिळवून अकोले तालुक्यात वाणिज्य शाखेमध्ये प्रथम…
• कला शाखेची विद्यार्थीनी कु. पूजा कैलास भांगरे ही 87.50% गुण मिळवून अकोले तालुक्यात कला शाखेमध्ये द्वितीय व शिक्षणशास्त्र या विषयात 100 पैकी 99 गुण मिळवून अकोले तालुक्यात प्रथम…

सत्यनिकेतन संस्थेचे अध्यक्ष ॲड.एम.एन.देशमुख, सचिव श्री.एम.एल.मुठे, कोषाध्यक्ष श्री.विवेकजी मदन, प्राचार्य श्री.बी.के.बनकर, उपप्राचार्य श्री.डी.जी.बुऱ्हाडे, पर्यवेक्षक श्री.जी.बी. मालुंजकर यांच्यासह संस्थेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी व सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक केले व त्यांना भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.















