May 1, 2026
१ मे हा दिवस महाराष्ट्रात महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन म्हणून साजरा केला जातो. १ मे १९६० रोजी संयुक्त महाराष्ट्र आंदोलनानंतर मुंबईसह स्वतंत्र महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आले, त्या आठवणीत महाराष्ट्र दिन साजरा होतो. तसेच, कामगारांच्या हक्कासाठी आणि ८ तासांच्या कामासाठी केलेल्या संघर्षाची आठवण म्हणून याच दिवशी जागतिक कामगार दिन पाळला जातो.
गुरुवर्य रा.वि.पाटणकर सर्वोदय विद्या मंदिर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, राजूर, ता. अकोले, जि.अहिल्यानगर येथे महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन उत्साहात साजरा केला गेला. सकाळच्या अतिशय प्रसन्न अशा वातावरणामध्ये विद्यालयातील शिपाई कर्मचारी श्री.महेंद्र पवार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. NCC, स्काऊट गाईड व राष्ट्रीय हरित सेनेच्या वतीने संचलन करण्यात आले. राष्ट्रगीत, ध्वजगीत व महाराष्ट्र गीताचे यावेळी गायन करण्यात आले.
याप्रसंगी सत्यनिकेतन संस्थेचे ज्येष्ठ संचालक श्री.विजय पवार व श्री.विलास पाबळकर हे उपस्थित होते. विद्यालयाचे प्राचार्य श्री.भाऊसाहेब बनकर, उपप्राचार्य श्री.दिपक बुऱ्हाडे, पर्यवेक्षक श्री.गोरख मालुंजकर, वसतिगृह अधीक्षक श्री.ढगे सर, सेवानिवृत्त प्राचार्य श्री.लेंडे सर व श्री.परबत सर यांचेसह माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.











