June 14, 2026
नालंदा फाउंडेशन आयोजित ‘राज्यस्तरीय सह्याद्रीरत्न पुरस्कार’ हा महाराष्ट्रातील एक अत्यंत प्रतिष्ठित पुरस्कार सोहळा असून, याद्वारे चित्रकला, लेखन, नृत्य, अभिनय, कृषी आणि सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय व कौतुकास्पद कामगिरी करणाऱ्या गुणवंत व्यक्तींचा गौरव केला जातो. कला, शैक्षणिक आणि चित्रपट क्षेत्रातील दिग्गजांच्या उपस्थितीत पार पडणारा हा सोहळा समाजातील खऱ्या कर्तृत्वाला प्रोत्साहन देणारे एक महत्त्वाचे व्यासपीठ ठरला आहे.
गुरुवर्य रा.वि. पाटणकर सर्वोदय विद्या मंदिर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील ज्येष्ठ हिंदी विषय-शिक्षक श्री.श्रीकांत घाणे यांचा नुकताच नालंदा फाऊंडेशनचा ‘राज्यस्तरीय सह्याद्रीरत्न पुरस्कार’ देऊन गौरव करण्यात आला. १४ जून रोजी पत्रकार भवन पुणे येथे हा पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. राज्यातील एकूण ६४ जणांना हा पुरस्कार सिनेअभिनेते सुनिल गोडबोले, दिग्दर्शक दिपक जाधव, सौ.गांधी, उद्योजिका ॲड.धावने या मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. श्री.श्रीकांत घाणे यांना ‘साहित्य प्रतिभा व पर्यावरण संवर्धन’ साठी हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
श्री.श्रीकांत घाणे त्यांच्या या उत्तुंग यशाबद्दल विद्यालयाच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. सत्यनिकेतन संस्थेचे सचिव श्री.एम.एल.मुठे, कोषाध्यक्ष श्री.विवेकजी मदन, विद्यालयाचे प्राचार्य श्री.भाऊसाहेब बनकर, उपप्राचार्य श्री. दिपक बुऱ्हाडे, पर्यवेक्षक श्री.संजय व्यवहारे व त्याचबरोबर सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी त्यांचे कौतुक करत अभिनंदन केले व त्यांना भावी कार्यासाठी अनंत शुभेच्छा दिल्या.



![]() |
![]() |












